Join us

हार्ट अटॅकचा धोका कमी करणाऱ्या ६ सवयी- बघा यापैकी किती गोष्टी तुम्ही गांभीर्याने करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 17:04 IST

Healthy Habits For Healthy Heart : कमी वयातच हार्ट अटॅकचा धोका वाढत चालला आहे. त्यासाठी काही गोष्टी रोजच्यारोज करायला हव्या आणि काही पुर्णपणे टाळाव्या...(what to eat and what to avoid for heart health?)

ठळक मुद्दे हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे

बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. कारण सध्याच्या काळात प्रत्येकाचेच कामाचे स्वरुप बदलले असून शारिरीक मेहनत कमी झाली आहे. बैठे काम वाढले, व्यायामही नियमितपणे केला जात नाही. याचा परिणाम म्हणून बीपी, मधुमेह असे अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. अनेकांचे कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिसराईड वाढत असून हृदयविकाराचे प्रमाणही वाढले आहे. कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कित्येक उदाहरणे आपण आपल्या सभोवती पाहातो (Healthy Habits For Healthy Heart). त्यामुळेच हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे (3 habits for reducing risk of heart attack). त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(what to eat and what to avoid for heart health?)

 

हार्ट अटॅकचा धोका कमी करणाऱ्या ३ सवयी

हृदयविकाराचा धोका कमी करून हृदय मजबूत ठेवायचे असेल तर काेणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या टाळल्या पाहिजेत, याविषयीची माहिती डॉ. अशोक सेठ यांनी इंडिया टीवी स्पीड न्यूज वेलनेस वीकेंड या कार्यक्रमात दिली आहे. यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे...

मे महिन्यात कुंडीत लावा ‘ही’ रोपं, वर्षभर रंगबिरंगी फुलांनी बहरुन जाईल तुमची गॅलरी!

१. दिवसाची सुरुवात ब्रेड, बिस्किटे अशा पदार्थांनी करणे पुर्णपणे सोडून द्या. पिझ्झा, बर्गर असे पदार्थ तुमच्या आहारात अजिबात नको. नियमितपणे सकस, पौष्टिक आहार घ्या.

२. तेल, साखर, फॅट्स, जास्त कॅलरी असणारे पदार्थ, तळलेले तेलकट पदार्थ कमीतकमी प्रमाणात खा. त्या तुलनेत मात्र आहारातले प्रोटीन्सचे, हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा. चहाचे प्रमाणही कमी करा. 

 

३. एकदम पोटभर जेवण्यापेक्षा थोडं थोडं करून दिवसातून ३- ४ वेळेला खा. ते पचायला आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त चांगलं असतं.

डॉक्टर सांगतात बेदाणे खाण्याच्या २ योग्य पद्धती! हिमाेग्लोबिन वाढेल, कित्येक आजार होतील छुमंतर..

४. रोजच्या स्वयंपाकासाठी मोहरीचं तेल अधिक चांगलं असतं असं डाॅक्टर सांगतात. शिवाय कोणतंही तेल वापरत असाल तरी ते कमीतकमी प्रमाणात खा. रिफाईंड तेल खाणं टाळा. तसेच आहारातून गव्हाचे प्रमाणही कमी करा.

 

५. दिवसातून ३० ते ४० मिनिटे चालण्याचा व्यायाम करणे हृदयासाठी अधिक चांगले ठरते. शरीर जास्तीतजास्त ॲक्टीव्ह ठेवा. 

बटाटे २- ३ महिने साठवून ठेवण्यासाठी टिप्स- कोंब फुटून बटाटे अजिबात खराब होणार नाहीत 

६. जास्त ताण घेऊ नका. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन करा. नियमितपणे व्यायाम केल्यानेही मानसिक, शारिरीक ताण कमी होतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगव्यायाम