Foods To Avoid With High Cholesterol : आजकाल हाय कोलेस्टेरॉल ही एक सामान्य समस्या बनली आहे, पण ती दुर्लक्षित करणं मोठ्या धोक्याचं कारण ठरू शकतं. अनेकदा आपल्याला वाटतं की फक्त लठ्ठपणा हाच आजारांचं मूळ आहे, पण सडपातळ लोकांच्याही रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा बॅड कोलेस्टेरॉल जमा होऊ शकतं. जर आपल्या रिपोर्टमध्ये कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढलेली दिसत असेल किंवा आपल्याला हृदयविकारापासून बचाव करायचा असेल, तर आजपासूनच तुमच्या ताटातून या ३ गोष्टी तात्काळ काढून टाका. चला जाणून घेऊया.
१) ट्रान्स फॅट्स
सर्वात आधी टाळायची गोष्ट म्हणजे बाजारात मिळणारे तळलेले पदार्थ. समोसे, कचोरी, फ्रेंच फ्राइज, पॅकेटमधले चिप्स यामध्ये ट्रान्स फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे फॅट्स शरीरासाठी विषासारखे आहेत. हे बॅड कोलेस्टेरॉल वाढवतात आणि चांगलं कोलेस्टेरॉल कमी करतात. हृदय निरोगी ठेवायचं असेल तर या पदार्थांना आजच ‘नाही’ म्हणा.
२) प्रोसेस्ड मीट आणि रेड मीट
जर आपण नॉनव्हेज नेहमीच आवडीने खात असाल, तर थोडं सावध व्हा. रेड मीट (मटण, बीफ, पोर्क) मध्ये सॅच्युरेटेड फॅट खूप जास्त असतं, जे थेट कोलेस्टेरॉल वाढवतं. याहूनही धोकादायक म्हणजे प्रोसेस्ड मीट सॉसेज, सलामी, हॉटडॉग्स. यामध्ये जास्त मीठ आणि केमिकल्स असतात, जे हृदयासाठी नुकसानकारक ठरतात.
३) गोड पदार्थ आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी
गोड पदार्थांचा कोलेस्टेरॉलचा काय संबंध? असा प्रश्न पडू शकतो, पण यांचा खूप खोल संबंध आहे. जास्त साखर, मिठाया, कोल्डड्रिंक्स, मैद्यापासून बनवलेली व्हाईट ब्रेड, पास्ता, बिस्किटं खाल्ल्याने लिव्हर ते ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करतो. ट्रायग्लिसराइड्स वाढले की कोलेस्टेरॉल नियंत्रणाबाहेर जातं. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर गोडावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे.
मग काय खावं?
आहारात फायबर वाढवा. ओट्स, हिरव्या भाज्या, फळं आणि ड्रायफ्रूट्स (बदाम, अक्रोड) हे तुमचे चांगले मित्र आहेत. हे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं अतिरिक्त फॅट शोषून बाहेर टाकण्यास मदत करतात.
Web Summary : High cholesterol requires avoiding trans fats, processed/red meats, and sugary/refined foods. Increase fiber intake with oats, greens, fruits and nuts to help lower cholesterol.
Web Summary : हाई कोलेस्ट्रॉल होने पर ट्रांस फैट, प्रोसेस्ड/रेड मीट और शर्करा/परिष्कृत खाद्य पदार्थों से बचें। कोलेस्ट्रॉल कम करने में मदद के लिए ओट्स, साग, फल और नट्स के साथ फाइबर का सेवन बढ़ाएं।