Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी सोपे ३ उपाय, लो हिमोग्लोबिन म्हणजे गंभीर त्रासांना आमंत्रण

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी सोपे ३ उपाय, लो हिमोग्लोबिन म्हणजे गंभीर त्रासांना आमंत्रण

3 easy ways to increase low hemoglobin, home remedies, easy way to stay fit : रक्ताभिसरण छान व्हावे यासाठी करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 17:13 IST2025-09-05T17:12:31+5:302025-09-05T17:13:42+5:30

3 easy ways to increase low hemoglobin, home remedies, easy way to stay fit : रक्ताभिसरण छान व्हावे यासाठी करा हे उपाय.

3 easy ways to increase low hemoglobin, home remedies, easy way to stay fit | शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी सोपे ३ उपाय, लो हिमोग्लोबिन म्हणजे गंभीर त्रासांना आमंत्रण

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी सोपे ३ उपाय, लो हिमोग्लोबिन म्हणजे गंभीर त्रासांना आमंत्रण

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवणे हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहणे, सगळ्या अवयवांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होणे, चांगले रक्ताभिसरण होणे फार गरजेचे असते.त्यासाठी हिमोग्लोबिन व्यवस्थित राहणे गरजेचे असते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा, डोकेदुखी, थकवा, दमा यांसारखे त्रास सुरु होतात. (3 easy ways to increase low hemoglobin, home remedies, easy way to stay fit )रक्त कमी होण्याची कारणे अनेक असू शकतात. पौष्टिक आहाराचा अभाव, लोहाची कमतरता, अनियमित जीवनशैली, महिलांमध्ये मासिक पाळीतील अतिरक्तस्त्राव, गर्भधारणा, दीर्घकालीन आजार, अपचन किंवा काही वेळा पचनसंस्थेतील रक्तस्त्राव यामुळेही रक्त कमी होऊ शकते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दैनंदिन कामे करणेही कठीण जाते.

१. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. आहार फार महत्त्वाचा ठरतो. हिरव्या पालेभाज्या जसे की मेथी, पालक, आदी यामध्ये लोह मुबलक असते. रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी लोह फार महत्त्वाचे असते. 

२. फळे खा. डाळिंब खाणे उपयुक्त ठरते. तसेच खजूर, मनुका, जांभूळ यातही रक्त वाढवण्यास उपयुक्त घटक असतात. गूळ आणि तीळ यांचे सेवन देखील फायदेशीर असते. जीवनसत्त्व 'सी' लोह वाढवण्यास मदत करते. हे जीवनसत्त्व  संत्री, मोसंबी, लिंबू यात भरपूर असते. या पदार्थांचा आहारात समावेश असावा. 

३. चांगली झोप, तणाव कमी ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे हीसुद्धा महत्त्वाची सवय आहे. अनियमित आहार टाळून संतुलित व वेळेवर आहार घ्यावा. पुरेसे पाणी पिणे आणि मद्यपान, धूम्रपान यासारख्या सवयी टाळणे रक्त निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

हिमोग्लोबिन कमी होणे ही किरकोळ गोष्ट नाही, कारण ते दीर्घकाळ राहिल्यास अॅनिमिया सारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य आहार, आरोग्यदायी सवयी आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कायमच हिमोग्लोबिन कमी राहत असेल तर ते गंभीर त्रासाचे लक्षण असू शकते. 

Web Title: 3 easy ways to increase low hemoglobin, home remedies, easy way to stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.