Join us

शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:15 IST

Signs and Symptoms of Cancer: शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हे बदल कॅन्सरच्या लक्षणांपैकी असू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे गांभिर्याने पाहा, असं तज्ज्ञ सांगत आहेत....(These 3 could be the early signs of Cancer)

ठळक मुद्दे शरीर सुचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग थेट हा आजार तिसऱ्या किंवा चाैथ्या स्टेजला गेल्यावर लक्षात येतो

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक वेगवेगळे आजार जन्माला आलेले आहेत. कॅन्सर हा आजारही त्यापैकीच एक. सध्या तर कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त वाढले आहेत. या आजारावर आता अनेक उपचार निघाले आहेत. कॅन्सर झालेला व्यक्ती त्यातून पुर्णपणे बरा होऊन उत्तम निरोगी आयुष्य जगू शकतो हे सुद्धा आपण अनेक उदाहरणांमधून पाहिले आहे. तरीही कॅन्सरची भीती प्रत्येकालाच आहे. हा आजार झाल्यावर तो जेवढा लवकर आपल्या लक्षात येतो तेवढ्या लवकर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे कॅन्सरची लक्षणं अगदी लवकर ओळखू यायला हवी. पण बहुतांश लोकांचं इथेच चुकतं. शरीर सुचना देऊनही त्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग थेट हा आजार तिसऱ्या किंवा चाैथ्या स्टेजला गेल्यावर लक्षात येतो (Signs and Symptoms of Cancer). म्हणूनच तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती वाचा आणि कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा...(These 3 could be the early signs of Cancer)

 

शरीरात होणारे 'हे' बदल कॅन्सरची लक्षणं असू शकतात

शरीरात होणाऱ्या कोणत्या बदलांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये याविषयीची माहिती सांगणारी पोस्ट डॉक्टरांनी dr.sugandha07 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एकूण ३ लक्षणं सांगितली आहेत. ती नेमकी कोणती ते पाहूया..

मुलींना कमी वयातच पाळी सुरू होतेय! तज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ लेकीला खाऊ घालणं बंद करा..

१. अचानक वजन कमी व्हायला सुरुवात होणे हे सुद्धा कॅन्सरचं एक लक्षण आहे. जर तुम्ही कोणतीही शारिरीक मेहनत न घेता किंवा कोणताही डाएट, व्यायाम न करता एक ते दोन महिन्यात तुमचं वजन ७ ते ८ किलोने कमी होत असेल तर याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.

 

२. तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये जर नेहमीच दुखत असेल किंवा त्याठिकाणी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं होत आहे, असं तुम्हाला जाणवत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना मीठ का देऊ नये? तज्ज्ञ सांगतात ३ महत्त्वाची कारणं

३. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरावर नाक, डोळे, कान असे जे काही ओपनिंग असतात त्यातून जर पाणी येणे, रक्त येणे असा कोणत्याही प्रकारचा स्त्राव यायला सुुरुवात झाली असेल आणि ते वारंवार होत असेल तरी याबाबतीत लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वर सांगितलेली सगळी लक्षणं कॅन्सरमधेच दिसून येतात असं नाही. काही वेगळे आजारही तुम्हाला असू शकतात. म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अजिबातच योग्य नाही. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोगकॅन्सर जनजागृती