Join us

अंथरुणावर पडूनही बराच वेळ झोप येत नाही? बघा ३-२-१ चा नियम, चटकन शांत झोप लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2025 12:33 IST

3-2-1 Rule For Sound Sleep: अंथरुणावर  पडूनही झोप येत नसेल किंवा झोप लागली तरी लगेचच झोप मोड होत असेल तर हा एक नियम स्वत:च्या बाबतीत लागू करून पाहा..(what to do for better sleep?)

ठळक मुद्दे भूक लागल्यासारखं वाटलंच तर काजूसारखे पदार्थ खावेत ज्यातून चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळेल. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्याचा झोपेवर चांगला परिणाम होतो.

काही जण असे असतात ज्यांना अंथरुणावर पडताक्षणीच लगेच झोप लागते. शिवाय ती झोपही एवढी गाढ असते की पुढच्या काही मिनिटांतच त्यांचे घोरणेही सुरू होते. त्याउलट काही लोक असे असतात जे रात्र झाल्यावर अंथरुणावर तर पडतात. पण पुढे कित्येक तास त्यांना अजिबातच झोप लागत नाही. किंवा झोप लागली तरी लगेचच ती मोडते. मध्यरात्री कधीतरी उशिरा त्यांचा डोळा लागतो. असं जेव्हा रोजच व्हायला लागतं तेव्हा अपुऱ्या झोपेचे सगळे वाईट परिणाम तब्येतीवर दिसून यायला लागतात. म्हणूनच आरोग्य उत्तम राहण्यासाठी रात्रीची झोप पुर्ण होणे गरजेचे आहे (3-2-1 Rule For Sound Sleep). तुम्हालाही रात्री लवकर झोप येत नसेल तर हा ३-२-१ चा नियम फॉलो करून पाहा (what to do for better sleep?). शांत झोप येण्यासाठी नक्कीच त्याची मदत होईल.(Struggling to fall asleep or wake up feeling tired?)

 

शांत झोप येण्यासाठी ३-२-१ चा नियम

शांत झोप येण्यासाठी उपयुक्त ठरणारा ३-२-१ चा नियम नेमका कसा आहे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ dt.lavleen यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आलिया भट-कियारा अडवाणीची साडी ड्रेप करणारी एक्सपर्ट सांगतेय ५ टिप्स, साडी सुंदरच दिसणार!

यामध्ये त्या सांगतात की तुमची रात्री झोपण्याची जी कोणती वेळ आहे, त्याच्या ३ तास आगोदर तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे आणि त्यानंतर शक्यतो काहीही खाणं किंवा पिणं टाळावं. जर तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटलंच तर काजूसारखे पदार्थ खावेत ज्यातून चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळेल. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्याचा झोपेवर चांगला परिणाम होतो.

 

या नियमामधली दुसरी गोष्ट अशी की झोपण्याच्या वेळेच्या २ तास आगोदर तुमचं काम थांबवावं. जेव्हा तुम्ही तुमचं काम थांबवाल तेव्हाच मेलॅटोनिन हार्मोन शरीरात स्त्रवू लागेल जो चांगली झोप येण्यासाठी मदत करतो.

स्लायडिंग विंडो ट्रॅकसह घरातला कानाकोपरा स्वच्छ करणारा ब्रश- १४० रुपयांत सगळं घर होईल चकाचक.. 

तिसरी गोष्ट अशी की झोपण्यापुर्वी १ तास कोणतीही स्क्रिन पाहणं पुर्णपणे टाळावं. स्क्रिन पाहिल्यामुळे मेंदू अधिक उत्तेजित होतो आणि त्यामुळे मग पुढे बराच वेळ झोपत लागत नाही. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी