Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली? पोषणतज्ज्ञांचा सल्ला- २ गोष्टी करा, काळजी नको उपाय करा...

थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली? पोषणतज्ज्ञांचा सल्ला- २ गोष्टी करा, काळजी नको उपाय करा...

2 Simple ways to treat thyroid problems at home : Natural treatments and home remedies for thyroid problems : Home Remedies for Thyroid : Cure Thyroid Problem Naturally : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी थायरॉईडच्या समस्येवर सांगितले असरदार घरगुती उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 18:43 IST2025-06-17T18:43:23+5:302025-06-17T18:43:51+5:30

2 Simple ways to treat thyroid problems at home : Natural treatments and home remedies for thyroid problems : Home Remedies for Thyroid : Cure Thyroid Problem Naturally : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी थायरॉईडच्या समस्येवर सांगितले असरदार घरगुती उपाय..

2 Simple ways to treat thyroid problems at home Natural treatments and home remedies for thyroid problems Home Remedies for Thyroid Cure Thyroid Problem Naturally | थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली? पोषणतज्ज्ञांचा सल्ला- २ गोष्टी करा, काळजी नको उपाय करा...

थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली? पोषणतज्ज्ञांचा सल्ला- २ गोष्टी करा, काळजी नको उपाय करा...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना थायरॉईडचा त्रास सतावतो. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे काम न केल्यास शरीरातील हॉर्मोन्सचे (2 Simple ways to treat thyroid problems at home) संतुलन बिघडते आणि त्याचे परिणाम वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे, त्वचेचा कोरडेपणा, चिडचिड यांसारख्या स्वरूपात दिसून येतात. थायरॉईड ही महिलांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या (Natural treatments and home remedies for thyroid problems) असल्याचे दिसते. हार्मोन्समध्ये झालेल्या (Home Remedies for Thyroid) बदलामुळे थायरॉईड होतो. वेळीच थायरॉईड झाल्याचे लक्षात न आल्यास ही समस्या वाढते आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. थायरॉईडची (Cure Thyroid Problem Naturally) समस्या ही किरकोळ न समजता वेळीच त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

थायरॉईडची समस्या असेल आणि याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही तर, गळ्याला सूज येणे, गळ्यात वेदना होणे अशा इतरही समस्या सतावतात. थायरॉईडमुळे गळ्याला आलेली सूज आणि वेदना नकोशा वाटतात, यासाठीच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांनी थायरॉईडच्या समस्येवर घरगुती उपाय म्हणून खास २ गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे थायरॉईडच्या समस्येपासून आपल्याला घरगुती उपायांमुळे लगेच आराम मिळू शकतो.

थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सांगतात खास उपाय...  

थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट सांगतात, एका भांड्यात १०० मि. ली पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून धणे, प्रत्येकी ४ ते ५ तुळशीची पाने आणि पुदिन्याची पाने घालावीत. आता गॅसच्या मंद आचेवर हे भांड ठेवून पाणी थोडे आटवून घ्यावे, पाण्याला हलकी उकळी येऊ द्यावी. त्यानंतर हे पाणी आटवून जवळपास अर्धे झाल्यावर गाळणीने पाणी गाळून घ्यावे. हे पाणी थोडे कोमट गरम असतानाच प्यावे.

धणे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. तुळस नैसर्गिकपणे हॉर्मोनल संतुलन ठेवण्यास मदत करते , शरीरातील सूज कमी करते व थायरॉईडची समस्या हळुहळु कमी होण्यास मदत होते. पुदिना मेटाबॉलिजम सुधारतो आणि थकवा दूर करतो जो हायपोथायरॉईडमध्ये सामान्यतः जाणवतो.

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते? ५ सोप्या गोष्टी करा, दुखणं पळेल कायमचं...

हा थायरॉईड स्पेशल चहा नियमितपणे सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास थायरॉईडचे कार्य सुधारण्यास मदत होते आणि इम्युनिटीही वाढते. थायरॉईडचे इतर लक्षणे जसे वजन वाढणे, थकवा, केसगळती यांसारख्या समस्यांवरही चांगला परिणाम दिसून येतो.

दुसऱ्या उपायांमध्ये, न्यूट्रिशनिस्ट यांनी थायरॉडमुळे आलेली गळ्याची सूज कमी करण्यासाठी एक खास घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वातआधी एका स्वच्छ सुती कापडावर हलके गरम करुन घेतलेले एरंडेल तेल ओतावे. आता हा कपडा आल्या गळ्याभोवती गोलाकार पद्धतीने हलकेच बांधून ठेवून द्यावा. किंवा ज्या भागात जास्त सूज आलेली असेल त्या भागात आपण हे तेल लावलेले कापड ठेवू शकता.

पालथं झोपण्याची सवय घातक, ठरु शकते हृदयविकाराचेही कारण- डॉक्टर सांगतात झोपण्याची योग्य पद्धत...

हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करु शकतो. गळ्यावर १५ ते २० मिनिटे अशा प्रकारे एरंडेल तेल लावलेले कापड ठेवल्यास, गळ्यावरील सूज कमी करण्यात मदत होते आणि थायरॉईडच्या कार्यास नैसर्गिकरित्या आधार मिळतो. यामुळे आराम मिळतो आणि थायरॉईड फंक्शन हळूवारपणे सुधारते.


Web Title: 2 Simple ways to treat thyroid problems at home Natural treatments and home remedies for thyroid problems Home Remedies for Thyroid Cure Thyroid Problem Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.