Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिराईड तपासता; पण 'या' तपासण्यांकडे दुर्लक्ष करता? हार्ट ॲटॅकचा धोका टाळायचा असेल तर.. 

कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिराईड तपासता; पण 'या' तपासण्यांकडे दुर्लक्ष करता? हार्ट ॲटॅकचा धोका टाळायचा असेल तर.. 

Heart Attack Risk: हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड अशा चाचण्या तर करून घ्यायलाच हव्या, पण त्यासोबतच इतरही काही तपासण्या करणं खूप गरजेचं आहे...(2 most important indicators for heart attack risk other than cholesterol and trygliceride)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 12:25 IST2025-12-22T12:25:04+5:302025-12-22T12:25:49+5:30

Heart Attack Risk: हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड अशा चाचण्या तर करून घ्यायलाच हव्या, पण त्यासोबतच इतरही काही तपासण्या करणं खूप गरजेचं आहे...(2 most important indicators for heart attack risk other than cholesterol and trygliceride)

2 most important indicators for heart attack risk other than cholesterol and trygliceride, symptoms, risk for heart attack  | कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिराईड तपासता; पण 'या' तपासण्यांकडे दुर्लक्ष करता? हार्ट ॲटॅकचा धोका टाळायचा असेल तर.. 

कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिराईड तपासता; पण 'या' तपासण्यांकडे दुर्लक्ष करता? हार्ट ॲटॅकचा धोका टाळायचा असेल तर.. 

हल्ली हृदयरोगाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. अगदी तिशी- पस्तिशीच्या तरुणांनाही हार्ट ॲटॅक आल्याच्या कित्येक घटना आपण आजुबाजुला पाहातो. हृदयरोगाचं प्रमाण एवढं जास्त वाढण्यामागचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. हल्ली कामानिमित्त प्रत्येकाचेच बैठ्या कामाचे तास वाढलेले आहेत. बैठं काम वाढल्यामुळे शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत. व्यायाम करण्यासाठी अनेकांना वेळच नसतो. कारण १०- १२ तास वर्किंग अवर्स असल्याने घड्याळ्याच्या काट्यावरच चालावं लागतं. त्यातच आहारातलं तेल, तूप, मैदा, गोड, जंकफूड यांचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे. हे असं सगळं असल्याने त्याचा खूप वाईट परिणाम हृदयावर होत असून हृदय रोगाचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे.(2 most important indicators for heart attack risk other than cholesterol and trygliceride) 

 

कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईडसोबतच 'या' तपासण्याही गरजेच्या 

हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी काही जण नियमितपणे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड तपासून घेतात. रक्तातले हे दोन घटक वाढलेले असतील तर साहजिकच हृदयरोगाचा धोका वाढलेला असतो.

नवरी नटली!! माधुरी दीक्षित ते आलिया भट, पाहा बॉलीवूड तारकांचे लग्नातले लूक-सुंदर मोहक रुप

पण फक्त तेवढ्यावरच थांबू नका. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड प्रमाणेच अन्य २ चाचण्याही नियमितपणे करून घ्या असा सल्ला डॉ. प्रियांका शेरावत यांनी दिला आहे. याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये त्या Apolipoprotein B आणि Lipoprotein(a) या दोन चाचण्या करण्याविषयी सांगत आहेत.

 

Apolipoprotein B ही चाचणी केल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की आपल्या रक्तामध्ये कोलेस्टेरॉल कॅरी करणारे किती पार्टिकल्स आहेत. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या कोलेस्टेरॉलची मोजणी केली जाते.

टाकून द्या घरातले कळकट गाऊन, पाहा स्टायलिश कफ्तान गाऊनचे ७ प्रकार-कम्फर्टसोबत मिळतो स्मार्ट लूक

या पार्टिकल्सची संख्या जास्त वाढली की ते रक्तवाहिन्यांना चिटकून बसतात आणि त्यामुळे मग रक्त गोठून हृदयविकार येण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात हृदयविकाराची हिस्ट्री आहे, त्यांच्यासाठी Lipoprotein(a) ही तपासणी खूप महत्त्वाची ठरते. कारण यामध्ये हृदयरोगाची जेनेटिक रिस्क किती आहे, हे लक्षात येते. म्हणूनच कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड यांच्यासोबतच Apolipoprotein B आणि Lipoprotein(a) या दोन चाचण्याही करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. 
 

Web Title : कोलेस्ट्रॉल से आगे: हृदयघात के खतरे को रोकने के लिए परीक्षण

Web Summary : कोलेस्ट्रॉल और ट्राइग्लिसराइड्स के अलावा, एपोलिपोप्रोटीन बी और लिपोप्रोटीन(ए) परीक्षण हृदय स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण हैं। वे कोलेस्ट्रॉल ले जाने वाले कणों और आनुवंशिक हृदय रोग के जोखिम का आकलन करते हैं, जो रोकथाम के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Beyond Cholesterol: Tests to prevent heart attack risk.

Web Summary : Besides cholesterol and triglycerides, Apolipoprotein B and Lipoprotein(a) tests are vital for heart health. They assess cholesterol-carrying particles and genetic heart disease risk, crucial for prevention.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.