रोजच्या रूटीनमध्ये आपण डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ऐन तारूण्यात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. डोळ्यांची काळजी घेणं खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार नाही. नेहमी बाहेर पडताना सनग्लासेस लावूनच बाहेर पडायला हवं. तसंच डोळ्यांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. (10 Habbits That Harm Your Eyes)
केसांच्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी घातक ठरतात?
1) आपल्या दैनंदीन जीवनातील काही सवयींचा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर नकळत मोठा परिणाम होत असतो. ज्यामुळे दृष्टी कमकुवत होणं आणि इतर समस्या उद्भवतात. मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही स्क्रीनकडे सलग तासनतास पाहिल्यामुळे डोळ्यांवर अति ताण येतो.
2) यामुळे डोळे कोरडे पडतात. डोकेदुखी आणि अंधुक दिसण्यासारखे त्रास होतात.
3) डोळ्यांना पुरेसा आराम मिळण्यासाठी किमान ७ ते ८ तासांची गाढ झोप हवी. झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यांची जळजळ होणं, लाल होणं आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळ येणं अशा समस्या उद्भवतात.
4) डोळ्यात खाज सुटल्यास आपण अनेकदा जोरात डोळे चोळतो. यामुळे डोळ्यांच्या नाजूक रक्त वाहिन्यांना इजा पोहोचू शकते आणि दृष्टीवर चुकीचचा परिणाम होतो.
5) कमी प्रकाशात किंवा अंधारात वाचन करणं किंवा मोबाईल वापरणं यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर प्रचंड ताण येते ज्यामुळे डोळे लवकर थकतात.
6) डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटामीन ए, ओमेगा-३ आणि एंटी ऑक्सिडेटंसची गरज असते. जंक फूड, जास्त साखर आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे डोळ्यांच्या नसांना पुरेशी पोषक तत्व मिळत नाही.
7) शरीरात पाण्याची कमरता असल्यास डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. ज्यामुळे डोळे कोरडे आणि चिडचिडे वाटू लागतात.
8) अमेरिकन एकेडमी ऑफ ऑप्थल्मोलॉजीच्या रिपोर्टनुसार धुम्रपानामुळे मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.(Ref)
9) डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा किंवा डोळ्यांचे मेकअपचे साहित्य नीट स्वच्छ न ठेवल्यानं डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
10) डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी २०-२०-२० या नियमाचे पालन करा दर २० मिनिटांनी २० फूट दूर पाहा आणि वर्षातून किमान एकदा डोळ्यांची नियमित तपासणी करा.
