Join us

IVF करण्याचं योग्य वय कोणतं? डॉक्टर सांगतात बाळ होण्यासाठी योग्य वेळी-योग्य विचार कसा करायचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 17:43 IST

IVF Treatment: बाळ होण्यासाठी कोणत्याही वयात IVF उपचार घेतले तरी चालतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्याविषयीच तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी..(which is the right age for IVF treatment?)

ठळक मुद्दे जेव्हा आपल्याला मूल हवं तेव्हाचा काय विचार करायचा, फर्टिलिटीचा काय विचार करायचा हे ही माहिती करुन घेणं आवश्यक आहे.

हल्ली शिक्षण, नोकरी, करिअर या सगळ्या गोष्टींना इतके महत्त्व आले आहे की अनेकांना वाटतं एग फ्रीज करु, बाळाचा निर्णय उशीरा घेऊ, चाळिशीत आयव्हीएफचा निर्णय घेऊ. पण बायालॉजिकल क्लॉक त्यासाठी थांबत नाही, फर्टिलिटी रेट कमी होत आहे. फर्टिलिटीचे प्रश्न स्त्री-पुरुष दोघांचे आहेत, लाइफस्टाइलमुळे ते वाढत आहे. त्यामुळे वंध्यत्व, वय किंवा अन्य कुठल्याही वैद्यकीय कारणांसाठी आयव्हीएफचा पर्याय निवडणार असाल तर त्याची योग्य वेळ, योग्य वय कोणते हे ही लक्षात ठेवलं पाहिजे.

 

आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. शुभा गुप्ता सांगतात, वयाच्या तिशीनंतर कोणत्याही स्त्रीच्या शरीरातील बीजाची गुणवत्ता कमी कमी होत जाते. त्यामुळे पस्तिशीनंतर तर नैसर्गिकपणे गरोदर राहण्याची शक्यताही कमी कमी होत जाते. असेच पुरुषांच्या स्पर्मचेही असते.

पांढऱ्या केसांचं टेन्शन? 'या' पद्धतीने चहा पावडर वापरा, केस नॅचरली होतील काळे- चमकदार

त्यांचंही फर्टाईल एज हा प्रश्न आहेच. आणि बदलत्या जीवनशैलीत दोघांच्या फर्टिलिटीचे प्रश्न विशेषत: तिशीत आणि पुढे चाळिशीत वाढत आहेत. जर नैसर्गिकरित्या गर्भधारणेत काही अडचणी असतील आणि आयव्हीएफ उपचार घ्यायचे असतील तर त्याचा निर्णयही लवकर घेणे गरजेचे आहे. कारण बीज आणि स्पर्म हे दोन्ही उत्तम दर्जाचे, परिपक्व नसतील तर आयव्हीएफ करूनही लगेच यश येईल याची खात्री नाही. 

 

त्यामुळे आपण कोणत्याही वयात, अगदी चाळिशी उलटून गेल्यावरही आयव्हीएफ केले तरी आपल्याला अपत्यप्राप्तीचे सुख मिळू शकते, असं स्वत:च ठरवू नये.

सर्दी- पडशाचा त्रास आणि घरातले डास.. दोघांनाही पळवून लावण्यासाठी फक्त ५ रुपयांचा भन्नाट उपाय

आपलं फर्टाइल एज, तब्येत, वय आणि वैद्यकीय स्थिती यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने विचार करुन योग्य वयात निर्णय घेणं गरजेचं असतं. गर्भनिरोधक साधनं वापरणं आपण शिकतो, ते आवश्यकही असलं तरी जेव्हा आपल्याला मूल हवं तेव्हाचा काय विचार करायचा, फर्टिलिटीचा काय विचार करायचा हे ही माहिती करुन घेणं आवश्यक आहे.

 

टॅग्स : आयव्हीएफआरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसी