सध्याच्या बिझी आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईलचा थेट परिमाण आपल्या आरोग्यावर होताना दिसतो. याचा परिणाम म्हणून महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा न होणे आणि इतर अनेक आरोग्याच्या समस्या व आजार त्रास देतात. काही महिलांच्या बाबतीत गर्भधारणेत अडचणी आल्यामुळे मानसिक (What Is Fertility Massage Expert Tells) आणि शारीरिक परिणामांचा सामना महिलांना करावा लागतो. अशा परिस्थितीत अनेक महिला नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय शोधू लागतात( Can Fertility Massages Help You Get Pregnant).
बदलत्या काळानुसार गर्भधारणा होण्यासाठी आज अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषध आणि उपायही अस्तित्वात आहेत. यापैकीच, एक नवीन आणि सध्या फारच ट्रेंडिंग (What is a fertility massage Does it help you get pregnant) होत चालेला उपाय म्हणजे (Fertility Massage) 'फर्टिलिटी मसाज'. 'फर्टिलिटी मसाज' म्हणजे काय? त्याचे फायदे काय यांसारख्या इतर गोष्टींची अधिक माहिती पुण्यांतील भारती हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनोद भारती यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे( How to Fertility Massage to Boost Your Chances of Conception).
१. फर्टिलिटी मसाज (Fertility Massage) म्हणजे काय ?
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनोद भारती म्हणतात की, फर्टिलिटी मसाज ही एक विशेष प्रकारची थेरपी आहे. प्रजनन, पचनसंस्था आणि मानसिक संतुलन संतुलित ठेवण्यासाठी विशेष करुन या थेरपीचा वापर केला जातो. फर्टिलिटी मसाजमध्ये, महिलांना खालच्या भागांवर म्हणजेच ओटीपोट, पाठीवर, पेल्विक भागांवर आणि काहीवेळा संपूर्ण शरीरावर हलके ते खोल असे स्ट्रोक दिले जातात. ज्या महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचण येते त्यांच्यासाठी 'फर्टिलिटी मसाज' अधिक फायदेशीर आहे.
२. फर्टिलिटी मसाजचा मुख्य उद्देश काय असतो ?
१. डॉ. विनोद भारती सांगतात की फर्टिलिटी मसाजचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या गर्भाशय व अंडाशयामधील रक्ताभिसरण वाढवणे. यामुळे प्लेसेंटा निरोगी राहतो आणि गर्भधारणेस पोषक वातावरण तयार होते.
२. फर्टिलिटी मसाजमुळे महिलांमध्ये तणाव आणि चिंता कमी होते, ज्यामुळे हार्मोन्सचा समतोल राखला जातो आणि गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
३. फर्टिलिटी मसाजमुळे गर्भाशय, अंडाशय आणि इतर प्रजनन अवयव मजबूत होतात व त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
४. ही पद्धत संपूर्णतः नैसर्गिक असून कोणत्याही रासायनिक किंवा आर्टिफिशियल उपायांचा वापर केलेला नसतो, त्यामुळे साइड इफेक्टचा धोका कमी असतो.
मुलांच्या लहरीवर आईबाबाही स्वार! पाहा जेलीफिश पॅरेण्टिंगचा नवाच ट्रेंड- मुलांसाठी पोषक की घातक...
३. फर्टिलिटी मसाज कसे कार्य करते ?
१. फर्टिलिटी मसाजमुळे गर्भाशय व अंडाशयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्व पोहोचतात. यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
२. स्ट्रेस आणि चिंता यांचा प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. मसाजमुळे शरीरात एंडोर्फिन (हॅप्पी हार्मोन्स) वाढतात, ज्यामुळे स्त्रीचा मूड सुधारतो आणि हार्मोन्स संतुलित राहतात.
३. या मालिशमुळे गर्भाशयातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे गर्भधारणेची शक्यता अधिक जास्त वाढते.
४. कोणत्या महिलांसाठी फर्टिलिटी मसाज फायदेशीर आहे ?
१. लग्नानंतर बरीच वर्ष होऊनही गर्भधारणा होण्यात अडचण येत आहे.
२. पीसीओएस (PCOS) आणि थायरॉईड सारख्या हार्मोनल असंतुलनाची समस्या असेल तर.
३. ज्यांची फॅलोपियन ट्यूब ब्लॉक झालेली आहे, त्यामुळे गर्भधारणा शक्य होत नाही.
४. एंडोमेट्रिओसिससारख्या मासिक पाळीशी संबंधित समस्या असेल तर.
५. फर्टिलिटी मसाजमुळे लगेच गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते का?
डॉक्टर सांगतात की, फर्टिलिटी मसाज ही गर्भधारणा होण्याचा जादूचा मार्ग नाही. परंतु जर फर्टिलिटी मसाज नियमितपणे आणि योग्यरित्या केला गेला तर यामुळे शरीर गर्भधारणेसाठी तयार होण्यास मदत मिळते.