Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Infertility > फर्टिलिटी वाढवण्यासाठी ‘या' पद्धतीनं खजूर खा, डॉक्टरांचा महिलांना सल्ला-अशक्तपणाही होईल कमी...

फर्टिलिटी वाढवण्यासाठी ‘या' पद्धतीनं खजूर खा, डॉक्टरांचा महिलांना सल्ला-अशक्तपणाही होईल कमी...

Roasted dates for increasing fertility in women : roasted dates for increasing fertility in women : roasted dates benefits for female fertility : महिलांना फर्टिलिटीशी संबंधित अनेक समस्या आहेत त्यांनी रोजच्या आहारात खजुराचा समावेश करणे उपयुक्त ठरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2026 15:04 IST2026-01-07T14:48:53+5:302026-01-07T15:04:32+5:30

Roasted dates for increasing fertility in women : roasted dates for increasing fertility in women : roasted dates benefits for female fertility : महिलांना फर्टिलिटीशी संबंधित अनेक समस्या आहेत त्यांनी रोजच्या आहारात खजुराचा समावेश करणे उपयुक्त ठरते.

roasted dates benefits for female fertility Roasted dates for increasing fertility in women roasted dates for increasing fertility in women | फर्टिलिटी वाढवण्यासाठी ‘या' पद्धतीनं खजूर खा, डॉक्टरांचा महिलांना सल्ला-अशक्तपणाही होईल कमी...

फर्टिलिटी वाढवण्यासाठी ‘या' पद्धतीनं खजूर खा, डॉक्टरांचा महिलांना सल्ला-अशक्तपणाही होईल कमी...

सध्याच्या धावपळीच्या, स्ट्रेस आणि सतत बदलत्या लाईफस्टाईलचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असून, विशेषतः फर्टिलिटी आणि हार्मोनल बॅलन्ससारख्या संवेदनशील आणि आरोग्याबाबतच्या या खास गोष्टींवर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. चुकीची आहारपद्धती, अपुरी झोप आणि मानसिक तणाव यामुळे अनेक महिलांना गर्भधारणेशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, औषधांसोबतच योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय यांना महत्त्व देणे आवश्यक ठरते(Roasted dates for increasing fertility in women).

आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास अनेक समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. त्यापैकीच महिलांसाठी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खजूर. फर्टिलिटी किंवा प्रजननक्षमता वाढवण्यासाठी भाजलेले खजूर खाणे आरोग्याच्या दृष्ट्टीने फायदेशीर ठरू शकते, विशेषतः ज्या महिलांना फर्टिलिटीशी संबंधित अनेक समस्या आहेत त्यांनी रोजच्या आहारात खजुराचा समावेश करणे उपयुक्त ठरते. महिलांसाठी खजूर हे वरदानच मानले जाते. विशेषतः हिवाळ्यात प्रजननक्षमता वाढवण्यासाठी खजूर भाजून खाणे अत्यंत गुणकारी आहे. 'आशा आयुर्वेदा'च्या डायरेक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आयुर्वेदिक डॉक्टर चंचल शर्मा यांनी(roasted dates for increasing fertility in women)एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, या उपायामागचे (roasted dates benefits for female fertility) फायदे आणि त्याचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम नेमके कोणते आहेत ते पाहूयात... 

फर्टिलिटी वाढवण्यासाठी महिलांनी अशा प्रकारे खावेत खजूर... 

डॉक्टर चंचल शर्मा सांगतात की, हिवाळ्याच्या दिवसांत शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीच्या हवामानामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. 

१. पचनशक्ती मंदावणे :- हिवाळ्यात पचनक्रिया इतर ऋतूंच्या तुलनेत थोडी कमकुवत होते.

२. हार्मोनल असंतुलन :- थंडीचा परिणाम शरीरातील हार्मोन्सवर होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे संतुलन बिघडते.

३. फर्टिलिटीमध्ये घट :- लाईफस्टाईल आणि हवामानातील बदलांमुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, महिला आणि पुरुष दोघांचीही प्रजननक्षमता सुधारण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे भाजलेले खजूर. रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ भाजलेले खजूर खाल्ल्याने शरीराला आतून ऊब मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि प्रजनन करणाऱ्या अवयवांना पोषण मिळते. यामुळे हार्मोनल आरोग्य सुधारून गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत होते.

पाठ-कंबर दुखीपासून हवाय कायमचा आराम? अभिनेत्री भाग्यश्रीचे हे ५ घरगुती उपाय तुम्हाला देतील इन्स्टंट रिलीफ... 

आयुर्वेदामध्ये भाजलेल्या खजुराचे महत्त्व... 

आयुर्वेदामध्ये खजुराला अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. खजूर हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरातील पेशींना नवसंजीवन देतो आणि त्यांना दीर्घायुष्य देतो. खजुर खाल्ल्याने शरीरातील ताकद वाढते आणि स्नायूंना मजबूती मिळते. खजूर नैसर्गिकरीत्या प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते. हिवाळ्याच्या ऋतूत खजूर भाजून खाल्ल्याने शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण होते, ज्यामुळे थंडीचा त्रास कमी होतो. खजूर थोडा हेव्ही आणि स्निग्ध पदार्थ असतो. जेव्हा तो भाजून खाल्ला जातो, तेव्हा तो शरीरातील 'वात दोष' शांत करण्यास मदत करतो. वात संतुलित राहिल्याने सांधेदुखी आणि हार्मोन्सशी संबंधित समस्या दूर राहतात.

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी भाजलेले खजूर खाणे का फायदेशीर आहे ?

डॉ. चंचल शर्मा यांच्या मते, जेव्हा आपण पोषक तत्वांनी युक्त असा आहार घेतो, तेव्हा आपली प्रजननक्षमता सुधारते, हार्मोन्स संतुलित होतात आणि स्त्रीबीजांची (Eggs) गुणवत्ता देखील वाढते. भाजलेल्या खजूरमध्ये लोह (Iron) आणि खनिजे (Minerals) भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील एंडोक्राइन ग्लॅंड्सची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे हार्मोन्सचे उत्सर्जन योग्य प्रकारे होते. खजूर खाल्ल्याने मासिक पाळी नियमित होते आणि ओव्हुलेशन (स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया) वेळेवर होते. यामुळे फर्टिलायझेशनची प्रक्रिया सुलभ होऊन गर्भधारणेची शक्यता वाढते. अनेकदा गर्भाशय कमकुवत असल्यामुळे गर्भपाताचा (Miscarriage) धोका असतो. भाजलेले खजूर खाल्ल्याने गर्भाशयाचे स्नायू मजबूत होतात. गर्भाशय मजबूत झाल्यामुळे भ्रूण गर्भाशयाच्या अस्तराला व्यवस्थित चिकटण्यास मदत होते, ज्यामुळे गर्भधारणा टिकून राहते.

ऐन चाळिशीत कँसर होण्याची ५ प्रमुख कारणं! दिवसभरात करताय 'या' चुका - दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात...


 
महिलांनी खजूर खाण्याचे फायदे... 

भाजलेले खजूर खाणे आरोग्यासाठी सर्वच दृष्टीने फायदेशीर आहे. खजूरमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने महिलांमधील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतो आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो. खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन 'के' सारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि वाढत्या वयात होणारा ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) सारख्या समस्यांपासून बचाव होतो. ज्या महिलांना वारंवार चक्कर येतात किंवा अचानक अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी खजूर हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. खजूर खाल्ल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. गर्भधारणेच्या शेवटच्या तीन महिन्यांत खजूर गर्भाशयाचे स्नायू लवचिक होतात. यामुळे नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते आणि प्रसव वेदना कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे, भाजलेले खजूर खाणे महिलांच्या आरोग्यासाठी सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यामुळे महिलांनी आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये याचा समावेश करून एक नियम बनवावा आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी २ भाजलेले खजूर नक्की खावेत.

Web Title : फर्टिलिटी के लिए खजूर: भूनें, खाएं और महिलाओं का स्वास्थ्य बढ़ाएं।

Web Summary : भुने हुए खजूर फर्टिलिटी बढ़ाते हैं, खासकर सर्दियों में। वे परिसंचरण में सुधार करते हैं, गर्भाशय को मजबूत करते हैं, हार्मोन को संतुलित करते हैं, और आवश्यक पोषक तत्व प्रदान करते हैं, जिससे गर्भधारण में मदद मिलती है और कमजोरी कम होती है। महिलाओं के कल्याण के लिए एक सरल रात्रि उपाय।

Web Title : Dates for fertility: Roast, eat, and boost women's health.

Web Summary : Roasted dates enhance fertility, especially in winter. They improve circulation, strengthen the uterus, balance hormones, and provide essential nutrients, aiding conception and reducing weakness. A simple nightly remedy for women's well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.