>आरोग्य >वंध्यत्व > Embryo freezing: अर्थात भ्रूण जतन करुन ठेवण्याची प्रक्रिया काय असते? त्यासंदर्भातले निर्णय कसे घ्याल?

Embryo freezing: अर्थात भ्रूण जतन करुन ठेवण्याची प्रक्रिया काय असते? त्यासंदर्भातले निर्णय कसे घ्याल?

स्त्रीचं वय आणि आधी झालेले गर्भपात, त्या स्त्रीची शारीरिक अवस्था या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर्स १ ते ३ भ्रूणांचं गर्भाशयात रोपण करतात. जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकचे भ्रूण गोठवून जतन केले जातात, या प्रक्रियेला भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन म्हटलं जातं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 03:31 PM2021-04-10T15:31:13+5:302021-04-10T15:46:12+5:30

स्त्रीचं वय आणि आधी झालेले गर्भपात, त्या स्त्रीची शारीरिक अवस्था या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर्स १ ते ३ भ्रूणांचं गर्भाशयात रोपण करतात. जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकचे भ्रूण गोठवून जतन केले जातात, या प्रक्रियेला भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन म्हटलं जातं.

Is frozen embryo really safe? | Embryo freezing: अर्थात भ्रूण जतन करुन ठेवण्याची प्रक्रिया काय असते? त्यासंदर्भातले निर्णय कसे घ्याल?

Embryo freezing: अर्थात भ्रूण जतन करुन ठेवण्याची प्रक्रिया काय असते? त्यासंदर्भातले निर्णय कसे घ्याल?

Next
Highlightsभ्रूणाचं क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रियेमध्ये फ्रीझिंग आणि जतन अशा दोन प्रक्रियांचा समावेश असतो.पहिलं मूल या प्रक्रियेतून झाल्यानंतर काही वर्षांनी दुसरं मूल हवं असल्यासही जोडपी हा पर्याय निवडतात.१९८० पासून भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रिया जगभर सुरु झाली आणि हजारो मुलं जन्माला आली. प्रजननाची ही एका उपयुक्त पद्धत असून जगभर वापरली जाते.

भ्रूणाचं क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रियेमध्ये फ्रीझिंग आणि जतन अशा दोन प्रक्रियांचा समावेश असतो. ज्याचा उपयोग आयव्हीएफ उपचार पद्धतीसाठी होतो. आयव्हीएफ / आयसीएसआय उपचार पद्धतीमध्ये स्त्री बीजांडं आणि पुरुषाचे शुक्राणू एका विशिष्ट  द्रवात एका बशीत प्रयोगशाळेत ठेवले जातात. ज्यावेळी शुक्राणू बीजांडाला फलित करते त्यातून भ्रूण तयार होतो. हा भ्रूण नंतर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. आणि बाळ आईच्या पोटात वाढायला सुरुवात होते.
आयव्हीएफ प्रक्रियेअंतर्गत त्या स्त्रीला दररोज हार्मोन्सची इंजेक्शन्स दिली जातात. जवळपास ८ ते १० दिवस ही इंजेक्शन्स दिली जातात. जेणेकरून एक नाही तर अनेक बीजांडं तयार होतील. पुरुषांच्या वीर्यातही लक्षावधी शुक्राणू असतात. एकपेक्षा अधिक स्त्री बीजांडं आणि लाखो शुक्राणू उपलब्ध झाल्यामुळे मग एकापेक्षा अधिक भ्रूण तयार केले जातात. स्त्रीचं वय आणि आधी झालेले गर्भपात, त्या स्त्रीची शारीरिक अवस्था या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर्स १ ते ३ भ्रूणांचं गर्भाशयात रोपण करतात. जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकचे भ्रूण गोठवून जतन केले जातात, या प्रक्रियेला भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन म्हटलं जातं.

भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन का केलं जातं?
अनेक कारणांसाठी जोडपी हा पर्याय निवडतात.
१) आयव्हीएफ प्रक्रियेतून गर्भधारणा करत असताना काहीवेळा पहिल्या फटक्यात गर्भधारणा होत नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला तर पुन्हा पुन्हा इंजेक्शन्स, सोनोग्राफी, बीजांडं गोळा करणं, त्यासाठी हॉस्पिटलाइज होणं हे करण्यापेक्षा भ्रूण जतन केलेला असेल तर पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तरी दुसऱ्यांदा जतन भ्रूणच वापरता येतो.
२) कर्करोग किंवा तत्सम जटिल आजारात उपचार पूर्ण झाल्याशिवाय गर्भधारणा स्त्रीसाठी शक्य नसते. या आजारांच्या उपचारांचा अनेकदा बीजांडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी उपचार सुरु करण्याआधी बीजांडं किंवा भ्रूण गोठवून जतन करण्याचा पर्याय जोडपी निवडतात. जेणेकरून आजरातून पूर्ण बरं झाल्यानंतर त्यांना मुलासाठी चान्स घेता येईल.
३) पहिलं मूल या प्रक्रियेतून झाल्यानंतर काही वर्षांनी दुसरं मूल हवं असल्यासही जोडपी हा पर्याय निवडतात.
४) काही जोडपी निपुत्रिक जोडप्यांना आपला जतन केलेला भ्रूण डोनेटही करतात.
५) त्याचप्रमाणे काही जोडपी फर्टिलिटी लॅब्समध्ये अधिक संशोधनासाठीही डोनेट करतात.
भ्रूणाचे क्रायोप्रिझर्व्हेशन बीजांड फलित झाल्यानंतर १ ते ६ दिवसात केलं जातं. सगळ्या भ्रूणांचं जतन केलं जात नाही. कुठले भ्रूण जतन करण्यासाठी निवडायचे हे त्यांचे आरोग्य आणि भ्रूणांची संख्या यावर ठरतं. एकदा भ्रूण गोठला की त्यात घडणाऱ्या सगळ्या जीवशास्त्रीय घडामोडी थांबतात. पेशींची वाढ आणि पेशी मृत होणं हेही थांबतं. ज्यावेळी हे भ्रूण वापरायचे असतात त्यांना एका विशिष्ट द्रवपदार्थ ठेवून ॲक्टिव्ह केलं जातं आणि त्यांच्यातली जीवशास्त्रीय घडामोड सुरु होऊन, त्या भ्रूणाची वाढ सुरु होते.

भ्रूण किती काळ जतन करता येतो?
गोठलेला भ्रूण लिक्विड नायट्रोजनचे फ्रिझरमध्ये १९६ डिग्री तापमानाला अनेक वर्ष गोठवता येऊ शकतो. लिक्विड नायट्रोजनचे कुठलेही दुष्परिणाम या भ्रूणावर होत नाही. त्यामुळे प्रदीर्घकाळ भ्रूण गोठलेला राहू शकतो. गोठवल्यानंतर अनेक वर्षांनी भ्रूण पुन्हा ॲक्टिव्ह करता येतो. याही प्रक्रियेचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, बाळ अगदी सुदृढ जन्माला येऊ शकतं.

भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन कितपत सुरक्षित आहे?
आजवर झालेल्या संशोधनांमधून हे दिसून आलं आहे की भ्रूण गोठवून जतन करण्याचे आणि वापराचे होणाऱ्या मुलावर कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. गोठवण्याची प्रक्रिया करुन जी मुलं जन्माला येतात त्यांच्यात ती गोठण्याची प्रक्रिया न करता जन्माला आलेल्या मुलांइतकीच सुदृढ असतात.

१९८० पासून भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रिया जगभर सुरु झाली आणि हजारो मुलं जन्माला आली. प्रजननाची ही एका उपयुक्त पद्धत असून जगभर वापरली जाते.

विशेष आभार: डॉ. अरुण आर. राठी

(MBBS, DGO, DNB, FCPS, DFP)

Web Title: Is frozen embryo really safe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी - Marathi News | Breast Self-Exam: Breast cancer and precautions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breast Self-Exam: स्तनाचा कॅन्सर आणि घरच्या घरी स्तन तपासणीची खबरदारी

घरच्या घरी स्तन तपासणी करता येते, न घाबरता ती करणं, गाठ आढळ्यास डॉक्टरांकडे जाणं हा सतर्क टप्पा महत्त्वाचा. ...

आईपणाच्या सुखासह येणारी अवघड जागांची दुखणी, ती अंगावर काढणं घातक - Marathi News | price of motherhood, speak up about urine & vaginal infection infections & postpartum depression | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईपणाच्या सुखासह येणारी अवघड जागांची दुखणी, ती अंगावर काढणं घातक

वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही प्रसूती हा स्त्रीचा खरोखर दुसरा जन्मच असतो याची जाणीव स्त्रीच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांनीच ठेवणं आणि तिला जपणं महत्वाचं आहे.  ...

वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल? - Marathi News | What and how to talk to teen age children about sex education to avoid the risk of sexual harassment? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल?

शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलता संकोच वाटला तरी कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे ...

PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात? - Marathi News | PCOD symptoms, irregular menstruation, pimples on the face, increased weight? what to do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOD चा त्रास ? अनियमित पाळी, चेहऱ्यावर पिंपल्स, वाढलेलं वजन ही लक्षणं काय सांगतात?

PCOD हा आजार नक्की का होतो याचे एक कारण नसून अनेक कारणे आहेत. पण काही जणींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. ...

छातीत गाठ येता ! - लवकर तपासणी, लवकर उपचार हे सूत्र लक्षात ठेवा. - Marathi News | early detection, early diagnosis, early treatment in cancer, breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत गाठ येता ! - लवकर तपासणी, लवकर उपचार हे सूत्र लक्षात ठेवा.

कॅन्सर होऊच नये, असं औषध नाहीये. तेव्हा ‘लवकर तपासे, लवकर उपचारे; त्यास आयु आरोग्य लाभे’ हाच मंत्र जपायचा आहे. लवकर तपासणी-उपचार हे सारं कसं करतात? ...

दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा? - Marathi News | The risk of sexual and mental and physical problems in adolescent, teenagers how to avoid it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक-मानसिक समस्यांचा धोका,तो टाळणार कसा?

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षीच वयात येणारी मुलं, हातात पॉर्न साइट्सचा ॲक्सेस, सगळीकडे खुणावणारं, मोहात पाडणारं जग, त्यातून त्यांना शास्त्रीय माहिती कोण देणार? ...