Join us

फर्टिलिटी टेस्ट म्हणजे काय? उशीरा मातृत्व हवं असल्यास ती करणं का फायद्याचं ठरतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 08:05 IST

IVF and Facts : उशीरानं मातृत्वाचा, आयव्हीएफचा निर्णय घेणार असाल तर फर्टिलिटी टेस्ट करणंही गरजेचं.

बदलती जीवनशैली, उशिरा लग्न आणि वाढत्या आरोग्याच्या तक्रारीमुळे लवकर फर्टिलिटी टेस्ट करणं महत्त्वाचं होत चालले आहे. (Fertility test) जगभरात असे अनेक जोडपी आहेत ज्यांना आई-वडील व्हायचं आहे.(IVF and Facts) पण, त्यांना वंध्यत्वाचा त्रास आहे हे गर्भधारणा होण्यास अडचणी येतात तेव्हा समजतं.(IVF Issue)  सध्या अनेक जोडपी आपलं शिक्षण, करिअर किंवा काही वैयक्तिक कारणांमुळे लग्न आणि पालकत्वाची जबाबदारी घेणं पुढे ढकलतात. परंतु वय वाढू लागले की प्रजननक्षमता नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. भारतात जवळजवळ २७.५ दशलक्ष जोडप्यांना वध्यंत्वाचा सामना करावा लागतो आहे. परंतु, फर्टिलिटी टेस्ट केल्यावर आपल्याला योग्य औषधोपचार करता येतो. फर्टिलिटी टेस्ट म्हणजे काय, आणि महिलांनी ती लवकर का करावी? अगदी पुढे आयव्हीएफ करायची वेळ आली किंवा तसा निर्णंय घ्यावा लागला तरी फर्टिलिटी टेस्ट केलेली असणं फायद्याचं!

मुंबईतील आयव्हीएफ आणि फर्टिलिटी क्लिनिकमधील प्रसिद्ध डॉक्टर सलोनी पाटील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात की, महिलांनी लवकर फर्टिलिटी टेस्ट केल्यास त्यांना कोणताही त्रास नाही हे समजण्यास मदत होते. अनेकदा महिलांना पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस किंवा कमी ओव्हेरियन रिझर्व्ह सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जे महिलांमधील वंध्यत्वाचे सामान्य कारण आहे. 

IVF: नेहमी विचारले जाणारे ८ प्रश्न, आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी तुम्हाला हे नक्की माहिती हवं..

फर्टिलिटी टेस्ट का करावी?  वयाच्या पस्तीशीनंतर प्रजनन क्षमता कमी होते. जर वेळीच किंवा लवकर चाचणी केल्यास होणारा मानसिक ताण आणि दीर्घकाळपर्यंत होणारा वंध्यत्वाचा आर्थिक भार कमी होतो. महिलांना वेळीच त्यांच्या प्रजनन क्षमतेबद्दल समजल्यास त्यांना नियोजन करता येते.  

फर्टिलिटी टेस्ट करताना अनेक चाचण्या केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने AMH, FSH आणि LH चा समावेश आहे.  नियमित मासिक पाळी, गर्भाशयाच्या श्लेष्मामधील बदल आणि नियमित ओव्हुलेशन सारख्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवं. फर्टिलिटी टेस्टमुळे अनेक गोष्टींची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते. डॉक्टर सांगतात महिला वाढत्या वयात फॅमिली प्लानिंग योजना आखत असतील तर लवकर फर्टिलिटी टेस्ट करणं महत्त्वाच ठरतं.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआयव्हीएफ