बॉलिवूड गाजवणारी यशस्वी दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) हिने आपल्या करिअरमध्ये जेवढे यश मिळवले, तेवढाच मोठा संघर्ष तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात, विशेषतः आई होण्यासाठी करावा लागला. आज अनेक स्त्रिया करिअरमुळे किंवा इतर कारणांमुळे उशिरा आई होण्याचा निर्णय घेतात आणि अशावेळी IVF (In Vitro Fertilization) तंत्रज्ञानाचा आधार घेतात. फराहने देखील वयाच्या ४३ व्या वर्षी तिळ्यांना जन्म देण्यासाठी IVF उपचार पद्धतीची निवड केली. पण, या उपचाराची प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नक्कीच नसते(Farah Khan Opened Up About Her Painful IVF Journey).
टेनिस स्टार सानिया मिर्झाने नुकताच तिचा नवा टॉक शो 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' (Serving It Up with Sania) सुरू केला आहे. या शोची पहिली पाहुणी म्हणून बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने हजेरी लावली. शो दरम्यान, फराहने आई होण्याची तिची संपूर्ण वाटचाल आणि प्रवासावर मोकळेपणाने संवाद साधला. त्याचबरोबर, तिने हे देखील सांगितले की, तो काळ तिच्यासाठी किती कठीण आणि वेदनादायक होता आणि आयव्हीएफ (IVF) उपचार घेताना तिने शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या किती त्रास सहन केला. आई बनण्याच्या या कठोर प्रवासात फराहला नेमके काय भोगावे लागले?
फराह सांगते IVF उपचार घेताना झाला खूप त्रास...
फराह खानने तिच्या IVF करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले, "माझे पहिले दोन IVF उपचार आधीच अयशस्वी झाले होते." "जेव्हा तिसऱ्यांदा माझ्या तीन बाळांची IVF द्वारे गर्भधारणा केली, तेव्हा सर्व काही तिप्पट कठीण वाटत होते. माझ्या संपूर्ण शरीरावर पुरळ उठले होते. प्रत्येक वेळी तिघांपैकी कोणतंही एक बाळ मूत्राशयावर दबाव टाकत असल्याने, मला सतत असे वाटायचे की, मी वॉशरूममध्येच आहे. धड झोपही मिळत नव्हती...."रोज मांडीवर किंवा पोटावर इंजेक्शन घ्यावे लागत होते. तो काळ अजिबात सोपा नव्हता."
सततच्या ॲसिडिटीने नको जीव केलाय? करपट ढेकर, जळजळही? ‘हे’ चमचाभर मिश्रण चघळा, पटकन वाटेल बरं...
कोणत्या वयात IVF करणे योग्य राहील?
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) डॉक्टर सुप्रिया पुराणिक त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगतात की, जोडप्यांना अनेकदा IVF करण्याच्या वयाबद्दल अनेक प्रकारचे संभ्रम असतात. काहीवेळा जोडप्यांचे वय कमी असते, तेव्हा ते विचार करतात की, ‘आम्ही अजून एवढे लहान आहोत, आम्हाला IVF ची गरज काय ?’ तर, ज्या लोकांचे वय जास्त असते, ते विचार करतात की, ‘आता या वयात IVF करणे योग्य ठरेल का?’
तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक म्हणतात की, तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा करा, किंवा IVF करा, या सर्वांसाठी उत्तम वय साधारणपणे २४ ते ३० वर्ष मानले जाते.
डॉक्टर पुराणिक पुढे सांगतात की, २४ वर्षांपूर्वी शरीर आणि मन बाळाला सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले नसतात. तर, दुसरीकडे ३० वर्षांनंतर महिलांमधील प्रजननाची क्षमता आंणि गुणवत्ता देखील कमी होऊ लागते. ३५ वयानंतर प्रजनन क्षमता वेगाने कमी होते आणि गर्भधारणेत अडचणी येऊ लागतात. हा परिणाम फक्त महिलांपर्यंतच मर्यादित नाही, तर पुरुषांची प्रजनन क्षमता देखील वयानुसार कमी होते.
तज्ज्ञ सांगतात की, कपल्सचे वय जास्त असल्यास IVF प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी होते, पण या उपचारावर वयाचे कोणतेही बंधन नाही.IVF साठी वयाची कोणतीही अडचण नाही, ते कोणत्याही वयात केले जाऊ शकते.
डॉक्टर सुप्रिया सांगतात की, जसे जसे महिलांचे वय वाढते, तसतसे त्यांच्या स्वतःच्या गर्भाशयातून गर्भधारणा करणे कठीण होते. अशा परिस्थितीत, डोनर एगची (Donor Egg) मदत घ्यावी लागू शकते. यासाठीच, जोडप्यांनी या गोष्टीचे नेहमी भान ठेवावे.
