Lokmat Sakhi >Health >Infertility > प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल?

प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल?

Every woman should get an AMH test done on time : तरुणींनी करुन घ्यावी ही साधी चाचणी. काही महत्वाच्या गोष्टींचा आंदाज बांधायला मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 13:09 IST2025-05-22T13:02:20+5:302025-05-22T13:09:20+5:30

Every woman should get an AMH test done on time : तरुणींनी करुन घ्यावी ही साधी चाचणी. काही महत्वाच्या गोष्टींचा आंदाज बांधायला मदत होईल.

Every woman should get an AMH test done on time | प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल?

प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल?

आजकाल गर्भधारणेच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. कारणे अनेक आहेत. प्रत्येकाचे कारण वेगळे असते. (Every woman should get an AMH test done on time)मात्र काही गोष्टी वेळीच केलेल्या बऱ्या असतात. जसे की काही चाचण्या. पुरुषांनीही आणि महिलांनीही काही चाचण्या करायला हव्यात. त्यात लाज वाटण्याची काहीही गरज नाही. आता प्रत्येक महिलेला किंवा पुरुषाला मुलबाळ हवंच आहे, असे नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र ज्यांना मातृत्वाची भावना अनुभवायचीच आहे अशा महिलांनी वीशीत असताना काही चाचण्या करुन घेणे गरजेचे आहे. अशीच एक महत्त्वाची चाचणी म्हणजे एएमएच चाचणी.    

AMH चाचणी म्हणजे काय?
एएमएच म्हणजे अँण्टी-म्युल्लेरियन हार्मोन. हा हार्मोन अंडाशयातील बिजकोशात तयार होतो. अंडी तयार करण्यापासून विकसित करण्यापर्यंत महत्त्वाच्या भूमिका हा हार्मोनच फार पाडतो. (Every woman should get an AMH test done on time)वयानुसार या हार्मोनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. प्रजनन क्षमतेसाठी हा हार्मोन फार महत्त्वाचा असतो. त्याची पातळी कमी झाल्यावर प्रजनन होत नाही. एक साधी रक्त चाचणी करुन महिलेच्या शरीरातील एएमएचची पातळी तपासता येते. एकंदरीत ही अंडाशयात तयार होणाऱ्या अंड्यांचे मोजमाप करण्याची चाचणी आहे. या चाचणीबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी फॅमिली डॉक्टरांकडे जाणे उचित राहील. 

गर्भधारणा पूर्णपणे या एका गोष्टीवर निर्भर नसते. मात्र हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. त्याचे अनेक पैलू असतात. एएमएचची संख्या एका ठराविक पातळीच्या खाली आली की गर्भधारणेची क्षमता कमी होते. तरुण वयातच एएमएचची पातळी कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. पण आजकाल २८-२९व्या वर्षी ही पातळी घटते. अशा अनेक केस डॉक्टर सांगतात. त्याची कारणे, उपाय हे सगळे तेव्हाच ठरवता येईल जेव्हा पातळीची तपासणी केली जाईल. त्यामुळे प्रत्येक महिलेने ही साधी चाचणी करायला हवी. खास म्हणजे वीशीत असलेल्या महिलांनी. 

पाळीचा काहीही त्रास नाही अगदी वेळेत पाळी येते, याचा अर्थ एएमएच पातळी व्यवस्थित आहे असा होत नाही. कोणत्याच गोष्टीवरुन या पातळीचा अंदाज लावता येत नाही. त्यासाठी चाचणीच करायला हवी. अगदी साधी चाचणी आहे, काही फार करायचे नाही. तुमच्या जवळपासही चाचणीची सोय उपलब्ध असेलच, एकदा चौकशी करा आणि चाचणी करुन घ्या. या चाचणीच्या आधारे पुढील गोष्टी ठरवता येतात. मुल हवे की नाही हा मुद्दा वेगळा आहे. आपल्या शरीरातील सगळ्या घटकांबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे असते.             

Web Title: Every woman should get an AMH test done on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.