lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Infertility > आईबाबा होण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्यानं करायलाच हवीत 'ही' ४ योगासनं, बदला लाइफस्टाइल

आईबाबा होण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्यानं करायलाच हवीत 'ही' ४ योगासनं, बदला लाइफस्टाइल

Couples Yoga Healthy Lifestyle फर्टिलिटीची समस्या वाढते आहे, योग्य आहार, योगाभ्यास केला तर फायदेशीर ठरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 05:43 PM2022-11-02T17:43:02+5:302022-11-02T17:44:54+5:30

Couples Yoga Healthy Lifestyle फर्टिलिटीची समस्या वाढते आहे, योग्य आहार, योगाभ्यास केला तर फायदेशीर ठरते

Couples who want to become parents must do 4 yoga poses, change lifestyle | आईबाबा होण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्यानं करायलाच हवीत 'ही' ४ योगासनं, बदला लाइफस्टाइल

आईबाबा होण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्यानं करायलाच हवीत 'ही' ४ योगासनं, बदला लाइफस्टाइल

फर्टिलिटी ही मोठी समस्या आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही. बाळ होत नाही म्हणून त्रासलेले अनेकजण दिसतात. यासाऱ्यात बदलती लाइफस्टाइल जबाबदार आहे अशीही एक चर्चा आहेच. डॉक्टरही सांगतात बाळ होऊ द्यायचा निर्णय घेतला की आधी लाइफस्टाइल बदला. वेळेवर जेवण न करणे, बाहेरील पदार्थांचा अधिक सेवन करणे, अपुरी झोप, शरीराची हालचाली कमी होणे इत्यादी. ही आणि अशी अनेक कारणे आपल्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करते. तज्ज्ञांच्या मते, वेळीच लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केली तर, महिला आणि पुरुषांमधध्ये प्रजननाचे प्रश्न कमी होतील. योगाभ्यासही त्यासाठी गरजेचा आहे. त्यामुळे काही आसने स्त्रीपुरुष दोघांनीही करायला हवीत.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्चिमोत्तानासन म्हणतात. पश्चिमोत्तानासन हे आसन तुमच्या पाठ व कंबरेचे स्नायू, हिप्स आणि हॅमस्ट्रिंग्सला स्ट्रेच करण्यास मदत करते. याद्वारे केवळ मानसिक ताणच कमी होत नाही तर  प्रजनन व्यवस्थेला किंवा रिप्रोडकटिव्ह सिस्टम जसे की अंडाशय आणि पोट इत्यादीसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

बद्धकोणासन

बद्धकोणासन या आसनाला बटरफ्लाय आसन देखील म्हणतात. यात मांड्यांचा वरचा भाग आणि ग्रोइन या स्नायूवर आवश्यक प्रमाणात ताण येते. नितंब, घोटे, गुडघे असे भाग ताणले जातात. हे आसन नियमित केल्याने प्रसूती प्रक्रिया सुलभ होते. तसंच गर्भधारणा होण्यासही मदत मिळते.

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायामचे फायदे अनेक आहेत. हे आसन शरीरातील इतर अवयव योग्यरीत्या काम करण्यासाठी मदत करते. या आसनामुळे तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारते. याशिवाय तुम्हाला स्ट्रेस अर्थात तणावापासून सुद्धा सहज मुक्ती मिळते.

सुप्त बद्ध कोनासन

सुप्त बद्ध कोनासन किंवा रीक्लिनिंग बाउंड अँगल पोज शरीराला बळकटी देणाऱ्या रिस्टोरेटिव्ह योगा पोझच्या श्रेणीमध्ये येतात. या योगासनांमुळे योगींच्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते, मज्जासंस्था बळकट होते. हे आसन आपल्या हिप्सच्या भागांना उघडण्याचे किंवा रिलिफ मिळवून देण्याचे काम करते. याशिवाय हे मांड्यांच्या आतील स्नायूंवरही काम करते. त्यामुळे पोट फुगणे आणि तणाव या समस्याही दूर होतात.

Web Title: Couples who want to become parents must do 4 yoga poses, change lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.