Lokmat Sakhi >Health > आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते? १ सोपा उपाय करा- ॲसिडीटीचं दुखणं कायमचं विसराल 

आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते? १ सोपा उपाय करा- ॲसिडीटीचं दुखणं कायमचं विसराल 

How To Get Rid Of Acidity: ॲसिडीटी, हायपर ॲसिडीटी असा त्रास तुम्हाला नेहमीच होत असेल तर डॉक्टरांनी सुचविलेला हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा..(home remedies to get relief from acidity and hyper acidity)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 15:31 IST2025-02-13T15:30:25+5:302025-02-13T15:31:16+5:30

How To Get Rid Of Acidity: ॲसिडीटी, हायपर ॲसिडीटी असा त्रास तुम्हाला नेहमीच होत असेल तर डॉक्टरांनी सुचविलेला हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा..(home remedies to get relief from acidity and hyper acidity)

how to get rid of acidity and hyper acidity, best trick to reduce acidity, home remedies to get relief from acidity and hyper acidity | आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते? १ सोपा उपाय करा- ॲसिडीटीचं दुखणं कायमचं विसराल 

आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते? १ सोपा उपाय करा- ॲसिडीटीचं दुखणं कायमचं विसराल 

Highlightsहा उपाय काही दिवस नियमितपणे केला तरी तुमचा ॲसिडीटीचा त्रास पुर्णपणे बरा होईल असं डॉक्टर सांगत आहेत.

काही जणांना कायम ॲसिडीटीचा त्रास होत असतो. खाण्यापिण्यात थोडा बदल झाला किंवा जेवणाच्या, नाश्त्याच्या वेळा चुकल्या तर त्यांना लगेच त्रास होतो. अपचन, ॲसिडीटी होते. प्रत्येकवेळी खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं शक्य होईलच असं नसतं. त्यामुळे वेळा चुकतात आणि मग ॲसिडीटीचा त्रास सुरू होतो. छातीत भयंकर जळजळ होते, नेहमीच आंबट- करपट ढेकर येतात, कधी कधी तर ॲसिडीटीचा त्रास वाढून डोकंसुद्धा खूप दुखतं (best trick to reduce acidity). तुम्हालाही नेहमीच ॲसिडीटीचा किंवा हायपर ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सुचविलेला हा अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा (how to get rid of hyper acidity).. काही दिवसांतच ॲसिडीटीचा त्रास पुर्णपणे बरा होईल असं ते सांगत आहेत.(home remedies to get relief from acidity and hyper acidity)

हायपर ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी askhealthguru and dr_varun_ayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

हे काय भलतंच! वॉशिंग मशिनचा वापर करून चक्क गहू वाळवले!! पाहा व्हायरल व्हिडिओ

यामध्ये ते सांगत आहेत की ज्येष्ठमध आणि बडिशेप हे सम प्रमाणात एकत्र करा. हे दोन्ही पदार्थ जेवढ्या प्रमाणात असतील त्याच्या अर्ध्या प्रमाणात खडीसाखर घाला. पण ती खडीसाखर म्हणजे रंगपंचमी किंवा गुढीपाडवा या काळात मिळणारी गाठी जी असते ती वापरावी.

 

हे तिन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याची अगदी बारीक पावडर करा. पावडर अजिबात जाडीभरडी नसावी असं डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं आहे. आता ही पावडर एका डब्यात भरून ठेवा आणि प्रत्येकवेळी जेवण झाल्यानंतर चिमूटभर खा.

वाढत्या वयाला लागेल ब्रेक! पंचविशीतलं सौंदर्य कायम टिकून राहील- रोज फक्त 'हे' काम करा..

हा उपाय काही दिवस नियमितपणे केला तरी तुमचा ॲसिडीटीचा त्रास पुर्णपणे बरा होईल असं डॉक्टर सांगत आहेत. उपाय अगदी सोपा असल्यामुळे काही दिवस करून पाहायला हरकत नाही. पण तुमचा ॲसिडीटीचा त्रास जर खूप जास्त असेल तर यासाठी डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणंच जास्त योग्य आहे. 


 

Web Title: how to get rid of acidity and hyper acidity, best trick to reduce acidity, home remedies to get relief from acidity and hyper acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.