Join us

वय आणि उंचीनुसार नेमकं किती असावं तुमचं वजन? ‘हा’ चार्ट पाहा, मग ठरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 14:49 IST

body weight as per height and age : ideal body weight : ideal body weight calculator: ideal body weight as per height: ideal body weight formula: ideal body weight for children: body weight and height ratio : आपल्या वयानुसार उंची आणि वजन यामध्ये फरक होतो. १८ वर्षापर्यंत उंची आणि वजन यामध्ये सतत बदल होत असतात. जाणून घेऊया तुमच्या वयानुसार उंची आणि वजन किती असायला हवे.

खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, सततचा ताण, अपुरी झोप आणि जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. (body weight as per height and age) ज्यामुळे आपले वजन झपाट्याने वाढू लागते. हल्ली डेस्क जॉबमुळे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.(ideal body weight calculator) सतत एकाच जागी बसून राहाणे आणि तिथेच खाण्याची सवय सर्व वयोगटातील लोकांना लागली आहे. (ideal body weight formula) त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे देखील आपल्याला कठीण जातंय. आपल्या वयानुसार उंची आणि वजन यामध्ये फरक होतो. १८ वर्षापर्यंत उंची आणि वजन यामध्ये सतत बदल होत असतात. 

वाढत्या वजनांचा परिणाम हा काहींमध्ये अनुवंशिक असतो तर काहींमध्ये आहार आणि जीवनशैलीच्या प्रभावामुळे होतो. निरोगी आहार आणि चांगली जीवनशैली ठेवल्यास वजन संतुलित राहाण्यास मदत होते. वयानुसार वजन मोजण्यासाठी BMI (बॉडी मास इंडेक्स)वापरला जातो. वयोमानानुसार आपले वजन नियंत्रिण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे, शरीर सक्रिय ठेवणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया तुमच्या वयानुसार उंची आणि वजन किती असायला हवे. 

साधरणत:पुरुष आणि महिलांचे वजन हे त्यांचे वय, जीवनशैली आणि अनुवंशिकता यावर अवलंबून असते. १८ ते ५० वर्ष वयोगटात असणाऱ्यांच्या उंचीत कोणताही बदल होत नाही. पण त्यांच्या वजनात बराच फरक पडतो. जाणून घेऊया पुरुष आणि महिलांचे वजन किती असायला हवे. 

पुरुषांचे उंचीनुसार वजन १५० सेमी - ४२ ते ५६ किलो१५५ सेमी- ४५ ते ६० किलो १६० सेमी - ४८ ते ६४ किलो १६५ सेमी - ५१ ते ६८ किलो १७० सेमी - ५४ ते ७२ किलो १७५ सेमी  - ५७ ते ७७ किलो१८० सेमी - ६० ते ८१ किलो१८५ सेमी - ६४ ते ८६ किलो १९० सेमी - ६७ ते ९० किलो 

महिलांचे उंचीनुसार वजन १४५ सेमी -४० ते ५० किलो१५० सेमी - ४२ ते ५४ किलो१५५ सेमी-४५ ते ५८ किलो१६० सेमी -४८ ते ६२ किलो१६५ सेमी- ५१ ते ६६ किलो१७० सेमी- ५४ ते ७० किलो१७५ सेमी- ५७ ते ७५ किलो१८० सेमी-६० ते ७९ किलो१८५ सेमी-६४ ते ८४ किलो

वय (वर्षांमध्ये)महिला (किलो) पुरुष (किलो)
१८-२० ४५-५५५०-६५
२१-३० ५०-६०  ५५-७५
३१-४०५५-६५   ६०-८०
४१-५०  ५८-७० ६५-८५
५१-६०  ६०-७५६७-८८
६०+५८-७८६५-८५
टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स