Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > world health day - तब्येत बिघडते कारण १० चुका बायका हमखास करतात!

world health day - तब्येत बिघडते कारण १० चुका बायका हमखास करतात!

world health day ची थीमच आहे की फेअरर, हेल्दीअर वर्ल्ड, पण मग महिला जर सुदृढ नसतील तर आरोग्यपूर्ण वाटचाल तरी हेल्दी कशी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 03:27 PM2021-04-07T15:27:54+5:302021-04-08T12:38:44+5:30

world health day ची थीमच आहे की फेअरर, हेल्दीअर वर्ल्ड, पण मग महिला जर सुदृढ नसतील तर आरोग्यपूर्ण वाटचाल तरी हेल्दी कशी होणार?

world health day- 10 Health mistakes made by women! | world health day - तब्येत बिघडते कारण १० चुका बायका हमखास करतात!

world health day - तब्येत बिघडते कारण १० चुका बायका हमखास करतात!

Highlights (world health day) आनंदी, आरोग्यपूर्ण जगणं हा आपला हक्क आहे. आपण हेल्दी तर घराचंही आरोग्य उत्तम रहायला मदत होईल.

अनन्या भारद्वाज

‘अ फेअरर, हेल्दीअर वर्ल्ड’ अशी थीम आहे? २०२१ च्या म्हणजे आजच्याच वर्ल्ड हेल्थ डेची. (world health day) आता कोरोनाकाळात तर उत्तम प्रतिकारशक्ती, उत्तम आरोग्य हीच आपली ताकद आहे? हे साऱ्या जगाला कळून चुकलं आहे. पण प्रश्न असा आहे? की, ते बायकांना कळलं आहे? का? आपण बायका आपल्या तब्येतीविषयी सजग आहोत का? ज्या धष्टपूष्ट जगाची चर्चा होते आहे, स्वप्न पाहिली जात आहेत त्या जगात पन्नास टक्के किमान बायका आहेत. मग बायकांच्या आरोग्याचं काय? हे सगळं कळतं पण वळत नाही हे किती काळ चालणार  आहे?
आताही कोवीडच्या काळात अनेकजणी काय सांगतात, मला काही होवू नये कारण मला काही झालं तर घरात काम करायला आहेच कोण? मी आयसोलेट झाले तर घरातल्यांचं कसं होणार?
आपलं कसं होणार हा विचारच केला जात नाही. आपलं आरोग्य, आपली प्रतिकारशकक्ती, आपला आहारविहार, आपला अशक्तपणा, रोज उठून काहीतरी दुखणं, आपल्या डोकेदुखीची हजार कारणं, कमी असलेलं हिमोग्लोबीन हे सारं तर कुणाच्या खिगगणतीत नाही. आणि का असावं, जर आपणच आपल्याला महत्व देणार नसू तर इतरांनी का द्यावं?
आता तुम्ही म्हणाल की हे बायकांना कळत नाहीत? का? तर कळतं. घरातल्या सर्वांची काळजी घेत त्यांचं डाएट सांभाळणाऱ्या आपण आपली काळजी घेतच ना असं का? 
तर त्याचं उत्तर एकच की तशी सवय आपण स्वत:ला लावलेली नाही आणि सततची घाई आपल्याला आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही.
मग त्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील का?
अगदी सोप्या. साध्या गोष्टी नियमित करू..
ते काय?

 

१. वर्षातून एकदा आपलं चेकअप करुन घेऊ, हिमग्लोबिन, थायरॉईड, कॅलशिअर, बी १२ हे सारं नीट आहे ना हे पाहू. नसेल तर ते उत्तम होईल यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने औषधं घेऊ. व्हॉट्सॲप ज्ञाननावर अवलंबून राहणार नाही.

२. रोज एक फळ नक्की खाऊ!
३. रोज नाष्ता ठरल्या वेळी कर. ठरल्या वेळीच जेवायला बसू.
४. किमान चाळीस मिनिटं रोज व्यायाम, चालायला तरी जाऊच.
५. आपला छंद छोटा का असेना, त्याला वेळ देऊ. आनंदी राहू.
६. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली चिडचिड होत असेल, नाजूक जागांची दुखणी असतील तर ती अंगावर काढणार नाही. आवश्यक तेव्हा स्त्री रोग तज्ज्ञांसह मानसिक उपचार तज्ज्ञांचा सल्ला न लाजता घेऊ.
७. आपली काही औषधे असतील तर ती वेळेवर घेऊ.
८. शिळं शक्यतो खाणार नाही, रोज रोज तर नाहीच नाही.
९. केस, त्वचा, डोळे यांच्यातले बदल लक्षात घेऊ, फक्त सौंदर्य नव्हे तर आरोग्याच्या तक्रारी म्हणून त्यांच्याकडे पाहू.
१०. आपल्यात फिलिंग ऑफ वेलनेस वाढेल याची खबरदारी घेऊ, आनंदी, आरोग्यपूर्ण जगणं हा आपला हक्क आहे. आपण हेल्दी तर घराचंही आरोग्य उत्तम रहायला मदत होईल.

Web Title: world health day- 10 Health mistakes made by women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.