हिवाळा आला की अनेक महिलांना एक त्रास प्रकर्षाने जाणवतो. सतत लघवीला येते. थंडीमुळे शरीर गार पडतं, घाम कमी येतो आणि त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी मूत्रावाटे बाहेर टाकलं जातं.(frequent urination in winter) ही प्रक्रिया सामान्य असली तरी बरेचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण यामुळे महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. (UTI in women)
युटीआयचा धोका हिवाळ्यात जास्त प्रमाणात वाढतो. या ऋतूमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्वचा कोरडी होते, ओठ फुटू लागतात, टाचांना भेगा पडतात, तहान कमी होते, सर्दी आणि फ्लूचा त्रास देखील वाढते. या ऋतूत मूत्रमार्गाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त असते.(winter urinary problems) हिवाळ्यात मूत्रमार्गाचे संसर्ग का वाढतात आणि ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया.
गोल चेहरा असेल तर ‘अशी’ हेअरस्टाईल करता म्हणून दिसता जाड आणि वयस्कर, पाहा ४ टिप्स- दिसा तरुण
ऋतू बदलला की वातावरणात देखील मोठ्या प्रमाणात बदल होतात. थंडीमध्ये महिलांना वारंवार लघवीला येते. हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो. त्वचेतून कमी द्रव बाहेर पडतो, त्यासाठी मूत्रमार्गातून लघवी वाटे द्रव बाहेर पडतो. या काळात आपण कमी पाणी पितो. ज्यामुळे लघवी घट्ट होते आणि बॅक्टेरिया वाढतात म्हणून युटीआयचा धोका देखील तितकाच वाढतो.
हवामानात गारवा असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे संसर्गाशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते. या ऋतूत सतत उबदार आणि घट्ट कपडे घातल्याने मूत्रमार्गाच्या समस्या वाढतात. हिवाळ्यात, शरीरातील उष्णता बाहेर न पडल्यास आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे मूत्रमार्गाभोवतीचा भाग आकुंचन पावतो, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. त्वचा कोरडी होते, ज्यामुळे यूटीआयचा धोका अधिक वाढू शकतो. या सर्व कारणांमुळे, हिवाळ्यात मूत्रमार्गाच्या संसर्गाचा त्रास जास्त होतो.
हिवाळ्यात युटीआयचा त्रास रोखण्यासाठी महिलांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. थंडी असली तरी पुरेसं कोमट पाणी प्या. पाणी आपल्या शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच लघवी खूप काळ रोखून ठेवू नका. तसेच सैल आणि सूती अंतर्वस्त्रांचा वापर करा, ज्यामुळे ओलावा टिकून राहत नाही. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. खूप वेळ ओले कपडे घालणं टाळा.
आहारात दही, ताक, क्रॅनबेरीसारखे नैसर्गिक पदार्थ खा. खूप उष्ण पदार्थ खाल्ल्याने त्रास वाढतो. युटीआयचा त्रास वारंवार होत असल्यास किंवा लक्षणं वाढत असल्यास स्वतः औषधं घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
