Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा ‘गरजेचंच’ असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा ‘गरजेचंच’ असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात, तेव्हा त्याची नेमकी काय कारणं असतात? कधी ते टाळता येतं, कधी काढून टाकणंच अपरिहार्य होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 PM2021-09-16T16:20:39+5:302021-09-16T16:29:00+5:30

गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात, तेव्हा त्याची नेमकी काय कारणं असतात? कधी ते टाळता येतं, कधी काढून टाकणंच अपरिहार्य होतं?

why and when hysterectomy necessary? what you should know | गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा ‘गरजेचंच’ असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा ‘गरजेचंच’ असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

Highlightsगर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे hysterectomy. बऱ्यापैकी वादात सापडलेली शस्त्रक्रिया आहे.

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

पुन्हा एकदा तोच थकलेला, फिकुटलेला चेहरा... वय ४५ ते ५० च्या मध्ये..
'डॉक्टर, एक महिन्यापासून ब्लीडिंग होतंय. कालपासून अजूनच वाढलंय. पोटातही दुखतं सारखं.. थकून गेलीये हो मी!!'
पेशंटच्या डोळ्यात पाणी होतं.
मी पेशंटच्या नवऱ्याकडे बघून म्हटलं, "अहो, पण गेल्यावेळी आपलं याबद्दल बोलणं झालं होतं.. यांना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याबद्दल काय विचार केलाय तुम्ही?"
पेशंटचा नवरा हताशपणे म्हणाला, "मॅडम, अजून दोन डॉक्टरांनी पण हिला हेच सांगितलंय.. आम्ही सगळे समजावून थकलो.. पण ही ऑपरेशनसाठी तयारच होत नाहीये. हिच्या या सततच्या आजारपणाने मी आणि मुलं पण कंटाळून गेलो आहोत!"
प्रसंग २
३७ वर्षाची पेशंट नवऱ्याबरोबर सर्व तयारीनिशी आलेली. "डॉक्टर, मला आता ही कटकट नकोय.. काढून टाकायची आहे मला ही गर्भपिशवी.. सारखं अंगावरून पांढरं जातंय."
मी - "अग, तुला या ऑपरेशनची अजिबात गरज नाहीये.. तुझं वय खूप कमी आहे आणि साध्या औषधोपचारांनी तुझा त्रास कमी होऊ शकतो. ऑपरेशनचा हट्ट बरा नाही." अशा सल्ल्यानंतर दुर्दैवाने या पेशंट्स कधीकधी दुसरीकडे जाऊन ऑपरेशन करून घेतात.

बघितलात ना हा आश्चर्यचकित करणारा विरोधाभास? सध्याच्या आपल्या समाजातल्या स्थितीबाबत हे निखळ सत्य आहे. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे hysterectomy. बऱ्यापैकी वादात सापडलेली शस्त्रक्रिया आहे. याची खरोखरच आणि नितांत गरज असलेल्या स्त्रिया वर्षानुवर्षे दुखणं अंगावर काढतात आणि अजिबात गरज नसलेल्या स्त्रिया विशेष करून ग्रामीण भागात सर्रास ही शस्त्रक्रिया करून घेताना दिसतात. म्हणून ठरवलं की आज जरा hysterectomy बाबत माहिती घेऊया.
कोणत्या प्रकारच्या केसेसमध्ये ही शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते हे समजून घेण्याची गरज आहे. या शस्त्रक्रियेला असलेले पर्याय आपण नंतर बघणारच आहोत.
१) गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला (cervix) झालेली किंवा होऊ शकणारी कॅन्सरची लागण.
आपल्या देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या बाबतची तपासणी खरंतर लैंगिक संबंध सुरू झाल्यापासून दरवर्षी स्त्रीने करून घेणे अपेक्षित आहे मात्र भारतातील स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे ही तपासणी जवळ जवळ कधीच केली जात नाही. चाळीशीच्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे असे त्रास सुरू झाल्यावरच त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे येतात. अशा वेळी कॅन्सरच्या निदानासाठी HPV + LBC यासारख्या अचूक तपासण्या करता येतात. या तापसण्यांमध्ये कॅन्सरचा धोका आढळल्यास ही शस्त्रक्रिया ताबडतोब करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी चाल ढकल अजिबात न करता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला ऐकणे आणि शस्त्रक्रिया करून घेणे हेच पेशंटच्या हिताचे असते.
२) फायब्रॉइड च्या खूप मोठ्या बऱ्याच गाठी असतील तर.
फायब्रॉईड च्या गाठी कॅन्सर च्या शक्यतो कधीच नसतात पण त्या ५ सें.मी. च्या वर ,संख्येने जास्त आणि गर्भाशयाच्या मध्यभागी असतील तर खूप त्रासाच्या ठरु शकतात.अशा केसेस मध्ये अनियमित आणि अतिरक्तस्राव दिसून येतो.बऱ्याच वेळा स्त्रियांनी हे दुखणे अंगावर काढल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण अक्षरशः निम्म्यावर येते आणि मग रक्त भरून लगेच ऑपरेशन करणे भाग पडते.ही वेळ येऊ नये यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक आहे.एखाददुसरी गाठ असेल तर फक्त गाठ काढून गर्भाशय तसेच ठेवता येऊ शकते पण हे स्त्रीरोगतज्ज्ञ च ठरवू शकतात.
३) हॉर्मोन्स च्या असंतुलनामुळे सुद्धा अनियमित अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.पेशंट तरुण असेल तर हॉर्मोन्स च्या गोळ्यांनी हा रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो पण पेशंटचे वय 40 च्या जवळ असल्यास हॉर्मोन्स च्या गोळ्या धोकादायक ठरू शकतात आणि मग काही वेळा गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.अशावेळी आधी क्युरेटिंग करून बायोप्सी घेतली जाते आणि त्यावर निर्णय घेतला जातो.कॅन्सरची शक्यता आहे असे वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
४) 'इंडोमेट्रिओसीस' नावाचा एक आजारामध्ये पेशंट ला सतत पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असतो तसेच गर्भाशयाशेजारी असणाऱ्या अंडाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठीसुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
५) कधीकधी योनीमार्ग आणि गर्भाशयाला आधार देणारे स्नायू आणि पेशी शिथिल झाल्यामुळे गर्भाशय खाली घसरते याला prolapse असे म्हणतात. अशा वेळी लघवीची पिशवी सुद्धा गर्भाशय बरोबर खाली येते. अशा केसेस मध्ये स्त्रियांना एकावेळी लघवी पूर्ण न होणे, लघवीचा जंतुसंसर्ग होऊ शकतात. बाळंतपणाच्या वेळी बाळाचे वजन खूप जास्त असणे, अवघड डिलिव्हरी अशा केसेसमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. या स्त्रियांमध्ये योनिमार्गाद्वारे गर्भाशय काढण्याची आणि त्याच वेळी योनीमार्गाची जागा आवळून घेण्याची शस्त्रक्रिया केली जाते.
या व्यतिरिक्त ही गर्भाशय काढण्याची काही कारणे असू शकतात. प्रत्येक पेशंटच्या वैद्यकीय अहवालांवर ते अवलंबून आहे.

ही शस्त्रक्रिया कोणत्या पध्दतीने करतात?माझ्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल?

- ही शस्त्रक्रिया मुख्यतः तीन पद्धतीने करता येते.
१) पोटावरून टाक्यांची शस्त्रक्रिया (abdominal hysterectomy)- या पद्धतीत ओटीपोटावर ९ ते १० सेमी चा छेद घेऊन पारंपरिक पद्धतीने गर्भाशय काढले जाते. खूप मोठा फायब्रॉईड किंवा कॅन्सरची असल्यास ही पद्धत जास्त सोयीची आहे. तसेच विशेष गुंतागुंतीची केस असेल तर ही पद्धत उत्तम.
२) योनिमार्गाद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (vaginal hysterectomy)- या पद्धतीने शक्यतो prolapse असणाऱ्या स्त्रियांची शस्त्रक्रिया केली जाते. या स्त्रियांना योनीमार्गात काही प्रमाणात टाके पडतात. काही वेळा prolapse नसतानाही योनिमार्गाद्वारे ही शस्त्रक्रिया करता येते.
३) दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (laparoscopic hysterectomy)- ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे. या पद्धतीत पोटावर ४ अतिशय छोटे छेद देऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घालून शस्त्रक्रिया केली जाते आणि गर्भाशय योनीमार्गातून बाहेर काढले जाते. ही पद्धत पेशंटसाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे. विशेष करून मधुमेह असलेल्या, स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात. त्या लगेच हालचाल, रोजची कामे सुरु करू शकतात. या पद्धतीत एकूणच पेशंटची बरे होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते.

ही शस्त्रक्रिया टाळता येणं शक्य आहे का?

- आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाने आणि संशोधनामुळे काही केसेसमध्ये आपण ही शस्त्रक्रिया टाळू शकतो. उदाहरणार्थ -
१) पेशंटचे वय कमी असेल आणि एखाद्दुसराच मोठा फायब्रॉईड असेल तर दुर्बिणीद्वारे फक्त फायब्रॉईड काढण्याची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
२) हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे निर्माण झालेली समस्या LNG IUS या तांबी (CUT) सदृश साधनामुळे सोडवली जाऊ शकते. या उपचार पद्धतीत पेशंटला भूल देऊन आधी क्युरेटिंग केले जाते. आणि मग LNG IUS बसवली जाते. कॅन्सरची शक्यता दिसत असेल आणि गर्भपिशवीच्या आतला भाग गाठींमुळे ओबडधोबड असेल तर ही उपचार पद्धत वापरली जाऊ शकत नाही. या उपचार पद्धतीत रक्तस्त्राव कमी कमी होत जात पाळी थांबून जाते आणि पाच वर्ष थांबलेली राहते. याचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत पण पाळी पाच वर्षं थांबेल हे स्वीकारण्यासाठी पेशंटच्या मनाची तयारी लागते.
३) फायब्रॉईडच्या गाठींचा आकार कमी करण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. ती ३ ते ६ महिने देता येतात. काही वेळा औषधे थांबवल्यावर फायब्रॉईडच्या गाठी परत वाढू शकतात. या औषधांचे कधी कधी हलके दुष्परिणामही दिसू शकतात म्हणून ती विचारपूर्वक वापरावी लागतात. त्यामुळे ही उपचार पद्धती तरुण पेशंटसाठी जास्त योग्य आहे.
कोणत्या प्रकारच्या केसेसमध्ये ही शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते हे समजून घेण्याची गरज आहे. या शस्त्रक्रियेला असलेले पर्याय आपण नंतर बघणारच आहोत.
१) गर्भपिशवीला किंवा गर्भपिशवीच्या मुखाला (cervix) झालेली किंवा होऊ शकणारी कॅन्सरची लागण.
आपल्या देशात गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या बाबतची तपासणी खरंतर लैंगिक संबंध सुरू झाल्यापासून दरवर्षी स्त्रीने करून घेणे अपेक्षित आहे मात्र भारतातील स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे ही तपासणी जवळ जवळ कधीच केली जात नाही. चाळीशीच्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे असे त्रास सुरू झाल्यावरच त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे येतात. अशा वेळी कॅन्सरच्या निदानासाठी HPV + LBC यासारख्या अचूक तपासण्या करता येतात. या तापसण्यांमध्ये कॅन्सरचा धोका आढळल्यास ही शस्त्रक्रिया ताबडतोब करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी चाल ढकल अजिबात न करता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला ऐकणे आणि शस्त्रक्रिया करून घेणे हेच पेशंटच्या हिताचे असते.
२) फायब्रॉइड च्या खूप मोठ्या बऱ्याच गाठी असतील तर.
फायब्रॉईड च्या गाठी कॅन्सर च्या शक्यतो कधीच नसतात पण त्या ५ सें.मी. च्या वर ,संख्येने जास्त आणि गर्भाशयाच्या मध्यभागी असतील तर खूप त्रासाच्या ठरु शकतात.अशा केसेस मध्ये अनियमित आणि अतिरक्तस्राव दिसून येतो.बऱ्याच वेळा स्त्रियांनी हे दुखणे अंगावर काढल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण अक्षरशः निम्म्यावर येते आणि मग रक्त भरून लगेच ऑपरेशन करणे भाग पडते.ही वेळ येऊ नये यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक आहे.एखाददुसरी गाठ असेल तर फक्त गाठ काढून गर्भाशय तसेच ठेवता येऊ शकते पण हे स्त्रीरोगतज्ज्ञ च ठरवू शकतात.
३) हॉर्मोन्स च्या असंतुलनामुळे सुद्धा अनियमित अतिरक्तस्त्राव होऊ शकतो. पेशंट तरुण असेल तर हॉर्मोन्स च्या गोळ्यांनी हा रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो पण पेशंटचे वय 40 च्या जवळ असल्यास हॉर्मोन्स च्या गोळ्या धोकादायक ठरू शकतात आणि मग काही वेळा गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.अशावेळी आधी क्युरेटिंग करून बायोप्सी घेतली जाते आणि त्यावर निर्णय घेतला जातो.कॅन्सरची शक्यता आहे असे वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
४) 'इंडोमेट्रिओसीस' नावाचा एक आजारामध्ये पेशंट ला सतत पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असतो तसेच गर्भाशयाशेजारी असणाऱ्या अंडाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठीसुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
५) कधीकधी योनीमार्ग आणि गर्भाशयाला आधार देणारे स्नायू आणि पेशी शिथिल झाल्यामुळे गर्भाशय खाली घसरते याला prolapse असे म्हणतात. अशा वेळी लघवीची पिशवी सुद्धा गर्भाशय बरोबर खाली येते. अशा केसेस मध्ये स्त्रियांना एकावेळी लघवी पूर्ण न होणे, लघवीचा जंतुसंसर्ग होऊ शकतात. बाळंतपणाच्या वेळी बाळाचे वजन खूप जास्त असणे, अवघड डिलिव्हरी अशा केसेसमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. या स्त्रियांमध्ये योनिमार्गाद्वारे गर्भाशय काढण्याची आणि त्याच वेळी योनीमार्गाची जागा आवळून घेण्याची शस्त्रक्रिया केली जाते.
या व्यतिरिक्त ही गर्भाशय काढण्याची काही करणे असू शकतात. प्रत्येक पेशंटच्या वैद्यकीय अहवालांवर ते अवलंबून आहे.

ही शस्त्रक्रिया कोणत्या पध्दतीने करतात?माझ्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल?

- ही शस्त्रक्रिया मुख्यतः तीन पद्धतीने करता येते.
१) पोटावरून टाक्यांची शस्त्रक्रिया (abdominal hysterectomy)- या पद्धतीत ओटीपोटावर ९ ते १० सेमी चा छेद घेऊन पारंपरिक पद्धतीने गर्भाशय काढले जाते. खूप मोठा फायब्रॉईड किंवा कॅन्सरची असल्यास ही पद्धत जास्त सोयीची आहे. तसेच विशेष गुंतागुंतीची केस असेल तर ही पद्धत उत्तम.
२) योनिमार्गाद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (vaginal hysterectomy)- या पद्धतीने शक्यतो prolapse असणाऱ्या स्त्रियांची शस्त्रक्रिया केली जाते. या स्त्रियांना योनीमार्गात काही प्रमाणात टाके पडतात. काही वेळा prolapse नसतानाही योनिमार्गाद्वारे ही शस्त्रक्रिया करता येते.
३) दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (laparoscopic hysterectomy)- ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे. या पद्धतीत पोटावर ४ अतिशय छोटे छेद देऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घालून शस्त्रक्रिया केली जाते आणि गर्भाशय योनीमार्गातून बाहेर काढले जाते. ही पद्धत पेशंटसाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे. विशेष करून मधुमेह असलेल्या, स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात. त्या लगेच हालचाल, रोजची कामे सुरु करू शकतात. या पद्धतीत एकूणच पेशंटची बरे होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते.

(लेखिका पुणेस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)

Web Title: why and when hysterectomy necessary? what you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.