काही अपवाद सोडले तर बहुतांश भारतीय महिलांची अशीच मानसिकता असते की आपल्या आधी आपल्या घरच्यांचा विचार करायचा. नवरा, मुलं, घरातल्या इतर व्यक्ती यांच्या तब्येतीच्या तक्रारी आधी पाहायच्या, पण स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करायचं. अगदी जेवणाची वेळही पाळायची नाही. पण आता खरोखरच प्रत्येकीने आपापल्या आरोग्याविषयी थोडं जागरुक होण्याची वेळ आलेली आहे. हल्ली कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत, अशात जर तुम्हाला तुमच्या कुटूंबाची काळजी घ्यायची असेल तर आधी स्वत:ची काळजी घ्या. वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या. चाळिशीनंतर महिलांनी दरवर्षी संपूर्ण आरोग्य तपासणी तर करायलाच हवी पण त्यासोबतच स्तनाचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर अशा तपासण्याही करायला हव्या.(what is the right age for cervical cancer screening test?)
सर्व्हायकल कॅन्सरची नियमित तपासणी करण्याचं योग्य वय काेणतं?
दिल्ली येथील एम्सच्या रेडिएशन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अभिषेक शंकर यांनी दिलेली माहिती एबीपीने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की जर तुम्ही तिशीमध्ये असाल तर वारंवार सर्व्हायकल कॅन्सरसंबंधी तपासणी करण्याची गरज नाही.
मुलांच्या डब्यासाठी चटपटीत 'रोटी रॅप' करण्याचे ४ सोपे प्रकार- चवदार डबा पाहून मुलंही होतील खुश
कारण आता एचपीव्ही डीएनए टेस्टचा पर्याय आला असून या टेस्टद्वारे येत्या ५ वर्षांत तुम्हाला तो कॅन्सर होण्याची कितपत शक्यता असू शकते, याविषयीचे निदान होते. त्यामुळे तिशीनंतर एकदा ही टेस्ट करून घ्यावी आणि त्यानंतर त्या टेस्टचा जो काही अहवाल येईल त्यानुसार डाॅक्टरांचा सल्ला घेऊन पुढची टेस्ट करण्याची गरज कधी आहे, हे ठरवावे.
सर्व्हायकल कॅन्सर आणि भारतीय महिला यांचा एकत्रित अभ्यास केल्यास असे दिसून येते की भारतामध्ये या कॅन्सरचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. दरवर्षी जवळपास ७५ हजारपेक्षाही जास्त महिलांचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे होत आहे.
सेकंड हॅण्ड कपडे घेतो, स्वत:चे भांडे- कपडे स्वत:च धुतो अक्षयकुमारचा लेक! यामागचं कारण काय?
यामध्ये सगळ्यात जास्त धोकादायक गोष्ट अशी की या केसेसमधल्या ७० ते ८० टक्के केसेस या अशावेळी समोर येतात की जेव्हा आजार शेवटच्या स्टेजमध्ये गेलेला असतो. या आजारातून पुर्णपणे बरं व्हायचं असेल तर त्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. त्यासाठीच महिलांनी नियमितपणे स्वत:च्या तपासण्या करणं गांभिर्याने घ्यायला हवं.