Join us   

Vaginal Health : अंगावर पांढरे पाणी जाण्याची 20 कारणं, बहुसंख्य महिलांचं आजाराकडे दुर्लक्ष, परिणाम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 5:56 PM

Vaginal Health : ल्युकोरिया ही स्त्रियांची सामान्य समस्या आहे, जी बर्‍याच स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याआधी किंवा नंतर एक किंवा दोन दिवस सामान्यपणे उद्भवते.

स्त्रियांमध्ये ल्युकोरिया म्हणजेच पांढर्‍या पाण्याची समस्या सामान्य आहे. त्याला व्हाईट डिस्चार्ज देखील म्हणतात. ल्युकोरियामध्ये, महिलांच्या खासगी भागामधून एक पांढरा, चिकट, जाड द्रव बाहेर पडण्यास सुरूवात होते. ल्युकोरियामुळे महिलांच्या शरीरात संसर्ग होण्याची शक्यता वाढते. सामान्यत: ही समस्या विवाहित स्त्रियांमध्ये जास्त असते. पण कोणत्याही वयाच्या मुलींना या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

ल्यूकोरिया काय आहे?

ल्युकोरिया ही स्त्रियांची सामान्य समस्या आहे, जी बर्‍याच स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याआधी किंवा नंतर एक किंवा दोन दिवस सामान्यपणे उद्भवते. ल्युकोरिया म्हणजे पांढरा, पिवळा किंवा फिकट निळ्या रंगाचा चिकट स्त्राव बाहेर येतो आणि स्त्रियांच्या योनीतून अनेकदा दुर्गंध येतो.  हा स्त्राव बाहेर येण्याची वेळ प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळी असते. 

परिणाम कसा होतो?

हा रोग गंभीर नाही पण इतरही अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. ल्युकोरिया खरंच एक आजार नाही परंतु योनिमार्गाच्या किंवा गर्भाशयाच्या इतर आजाराचे लक्षण असू शकते.  सर्वसाधारणपणे प्रजनन अवयवांमध्ये जळजळ होण्याचे लक्षण आहे. कधीकधी ही समस्या गंभीर स्वरुपाचे रूप धारण करते, ज्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये, तारुण्यात आणि सौंदर्यात हळूहळू घट होत जाते.

पोषक तत्त्वांची कमतरता

अविवाहित मुली या  समस्येचा सामना करातात. या रोगाचे मुख्य कारण म्हणजे पौष्टिकतेची कमतरता आणि योनीच्या आत बॅक्टेरियाची उपस्थिती. सामान्य समजून दुर्लक्ष अनेकदा केलं जातं. वेळेवर उपचार न घेतल्यानं समस्या वाढण्याची शक्यता असते. तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर त्वरीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानं उपचार घ्या.

बॅक्टेरिया आहे समस्येचं कारण

मोठ्या संख्येने स्त्रियांमध्ये हा त्रास 'ट्रिकोमोन्‍स वेगिनेल्‍स' नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. या संसर्गजन्य ल्यूकोरियाची तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून केली जाणे आवश्यक आहे, अन्यथा निष्काळजीपणामुळे हा रोग गंभीर रूप धारण करू शकतो. 

ल्युकोरियाची कारणं

नाजूक भागांची व्यवस्थित स्वच्छता न करणं

रक्ताची कमतरता

चुकीच्या पद्धतीनं शारीरिक संबंध ठेवणं

जास्त उपवास करणं

तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन

योनीमध्ये बॅक्टिरिया असणं

सतत गर्भपात होणं

चांगल्या बॅक्टेरियांची कमरता

शरीरातील पीएच लेव्हलमध्ये बिघाड

रोगप्रतिराकशक्ती कमजोर असणं

 योनिमध्ये फंगल इन्फेक्शन 

वजानल हेल्थबाबत निष्काळजीपणा

लक्षणं

अशक्तपणा

हात, पायांमधील वेदना

शरीर जड झाल्याप्रमाणे वाटणं

चिडचिड होणं

चक्कर येणं

भूक न लागणं

व्यवस्थित पोट साफ न होणं

 सतत लघवी बाहेर येणं

पोट जड वाटणं

योनी मार्गात खाज येणं.

मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर पांढरा चिकट स्त्राव येतो. तीव्रतेनं या समस्येचा त्रास होत असल्यास वेळ न घालवता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

टॅग्स : आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स