>आरोग्य > प्रसूतीप्रश्न > PCOS Prevention : PCOD चे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; जाणून घ्या कारणांसह बचावाचे उपाय

PCOS Prevention : PCOD चे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; जाणून घ्या कारणांसह बचावाचे उपाय

PCOS Prevention : या त्रासानं पीडित असलेल्या महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.  त्यांचे परिएड्स ३५ दिवसांनी  येतात आणि वर्षभरातील जवळपास ९ मासिक पाळी कमी येतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:43 PM2021-06-17T15:43:01+5:302021-06-17T16:02:51+5:30

PCOS Prevention : या त्रासानं पीडित असलेल्या महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.  त्यांचे परिएड्स ३५ दिवसांनी  येतात आणि वर्षभरातील जवळपास ९ मासिक पाळी कमी येतात. 

PCOS Prevention : PCOD with an effective diagnosis and symptoms, preventions | PCOS Prevention : PCOD चे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; जाणून घ्या कारणांसह बचावाचे उपाय

PCOS Prevention : PCOD चे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; जाणून घ्या कारणांसह बचावाचे उपाय

Next
Highlightsयोग साधनेच्या सहाय्यानं  PCOS खूप छान नियंत्रित करता येतो. पीसीओएस / पीसीओडीमुळे चेहरा आणि शरीरावर केसांची जास्त वाढ होते आणि टक्कल पडू शकते. यामुळे हृदयाची समस्या आणि मधुमेह सारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. 

पॉलीसिस्टिक ओवेरियन डिजीज PCOS    किंवा पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम PCOD   एक अशी स्थिती आहे जी महिलांमध्ये हार्मोन्सच्या स्तरावर प्रभाव टाकते. हा हार्मोनल डिसॉर्डर साधारपणे रिप्रोडक्टिव वयात महिलांमध्ये उद्भवतो. यामुळे ओव्हरीजच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पीसीओएस/पीसीओडीनं पीडित असलेल्या महिलांमध्ये सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात हार्मोन्स उत्पन्न होतात त्यामुळे मेंस्ट्रुअल साइकिल अनियमित होते. याशिवाय प्रेग्नंसीमध्येही त्रासाचा सामना करावा लागू शकतो. या त्रासानं पीडित असलेल्या महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.  त्यांचे परिएड्स ३५ दिवसांनी  येतात आणि वर्षभरातील जवळपास ९ मासिक पाळी कमी येतात. 

कारण

या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या धकाधकीच्या वेगवान आयुष्यातले ताण-तणाव आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांच्याशी आपल्या शरीराला जुळवून घेणं खूप कठीण जातं आहे. आपल्या झोपेच्या चुकीच्या वेळापत्रकाचा शरिरातील अंतःस्त्रावी ग्रंथींच्या म्हणजेच आपल्या हार्मोन्सच्या लयीवर परिणाम होतो. हल्लीच्या मॉल संस्कृतीमधल्या आपल्या जेवणात अति प्रमाणात कर्बोदकांचा समावेश असतो. आपण त्याला सोशलायझिंग असं नाव देतो. 

अति जास्त कर्बोदकं हाताळण्यासाठी खूप जास्त इन्सुलिन पाझरलं तरी ते चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही. यालाच insulin resistance म्हणतात. हीच खरी PCOS च्या निर्मितीची पहिली पायरी आहे. रक्तामध्ये खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन असल्याने अंडाशयामधून बीज बाहेर पडत नाही आणि इस्ट्रोजेन बनण्यामध्ये अडथळे येतात. वजन वाढतं आणि त्याचेही दुष्परिणाम दिसतात.

काय आहेत लक्षणं?

पीसीओएस / पीसीओडीमुळे चेहरा आणि शरीरावर केसांची जास्त वाढ होते आणि टक्कल पडू शकते. यामुळे हृदयाची समस्या आणि मधुमेह सारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. 

वजन वाढणं, खास करून कमरेच्या भागात फॅट जास्त प्रमाणात जमा होतं. त्यानंतर वजन कमी होता होत नाही.

शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर केस जास्त उगवतात. केस पातळ होणं, केस गळणं

चेहरा, पाठ छातीच्या वरच्या भागात  पुळ्या येणं

मूड स्विंग्‍स, तेलकट त्वचा, थकवा 

तोंडावर काळे डाग येणं

इनफर्टिलिटी किंवा गर्भधारणेदरम्यान इतर समस्या

डिप्रेशन

मासिक पाळी अनियमित असणं

या सिंड्रोमवर कोणताही उपचार नाही, तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणखी चांगले मार्ग आहेत. यासाठी आवश्यक औषधांसह जीवनशैलीतील बदलांचा सल्ला देण्यात आला आहे. मॉडर्न सायन्स ज्याला हार्मोन्स बॅलन्स साधणे म्हणतो तिथे आर्युवेद दोषांचा विचार करुन त्यांचे संतुलन साधण्याचे प्रयत्न केला जातो. 

बचावाचे उपाय

अती गोड, दुधाचे आणि मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत किंवा प्रमाणात सेवन करावे 

रोज सकाळी गरम पाणी प्यावे

अन्नपचन, पोट साफ होणं यांकडे व्यवस्थित लक्ष द्यावे

योग साधनेच्या सहाय्यानं  PCOS खूप छान नियंत्रित करता येतो. 

रोज व्यायाम करायला हवा

पोषक घटकांचा आहारात समावेश करावा

जास्तीत जास्त पाणी प्यावे.
 

Web Title: PCOS Prevention : PCOD with an effective diagnosis and symptoms, preventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Good time for exercise : व्यायामामुळेच शरीराचं होईल मोठं नुकसान; जर व्यायाम करण्यासाठी 'ही' वेळ निवडाल, वेळीच सावध व्हा - Marathi News | What is Good time for exercise : Exercising before going to bed is a really bad idea read to know why | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामामुळेच शरीराचं होईल मोठं नुकसान; जर व्यायाम करण्यासाठी 'ही' वेळ निवडाल

What is Good time for exercise : जोरदार व्यायाम आणि कठोर शारीरिक हालचाली आपल्या मज्जासंस्थेला उत्तेजित करू शकतात आणि हृदयाचे ठोके वाढवू शकतात. ...

Runny nose allergy remedies : सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय - Marathi News | Health Tips Runny nose allergy remedies : How to get rid of a runny nose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय

Health Tips Runny nose allergy remedies : अनेकांना सकाळी सकाळी शिंका आल्यानं लवकर जाग येते तर काहींना अंघोळीनंतर खूप शिंका येतात.   ...

चेहऱ्यावर वय कशाला दिसायला हवं?10 सोप्या टिप्स, दिसा कायम यंग अँड स्मार्ट! - Marathi News | Why should age appear on the face? 10 simple tips, look always young and smart! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर वय कशाला दिसायला हवं?10 सोप्या टिप्स, दिसा कायम यंग अँड स्मार्ट!

वय झालं तरी आपण कायम यंग दिसावं असं वाटणाऱ्या स्त्रियांसाठी फॅशनच्या काही खास टिप्स.... ...

दिवाळी फराळ करताना हाताला चटके कॉमनच, पण डोळे सांभाळा! डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण मोठे.. - Marathi News | It is common to burn hand while celebrating Diwali, but take care of your eyes! The rate of eye injury is high.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी फराळ करताना हाताला चटके कॉमनच, पण डोळे सांभाळा! डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण मोठे..

दिवाळीच्या दिवसांत फराळ आणि साफसफाई करताना घाईगडबडीत डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. पण योग्य ती काळजी घेऊन कामे केल्यास तुमच्यावर कोणताही अपघातप्रसंग येत नाही. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी खास टिप्स... ...

रात्री अजिबात शांत झोप लागत नाही? मग कपभर दुधात 'ही' एक गोष्ट घालून रात्री प्या.. - Marathi News | Doesn't sleep well at night? Then add one thing in a cup of milk and drink it at night. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री अजिबात शांत झोप लागत नाही? मग कपभर दुधात 'ही' एक गोष्ट घालून रात्री प्या..

रात्री शांत झोप न लागणे, सारखी चुळबूळ करत राहणे, अशी समस्या अनेकांना जाणवते. अपूरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे. म्हणूनच तर कपभर दुधात फक्त एक पदार्थ टाकून रात्री प्या आणि गाढ झोपी जा. ...

स्विगीने महिला कर्मचाऱ्यांना दिली 'पिरियड लिव्ह'! काय वाटतं, द्यावी का महिलांना अशी सुटी? - Marathi News | Swiggy gives 'period leave' to female employees! Do you think women should be given such holidays? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्विगीने महिला कर्मचाऱ्यांना दिली 'पिरियड लिव्ह'! काय वाटतं, द्यावी का महिलांना अशी सुटी?

कधी मॅटर्निटी लिव्ह तर कधी पिरियड लिव्ह, सणावारांच्या सुट्ट्या तर असतातच. महिलांना अशाप्रकारे सुट्ट्या द्याव्यात की त्यांना नोकरीवरच घेऊ नये. याबाबात तुम्हाला काय वाटते... ...