lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण..

PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण..

PCOS and Mental health Correlation : आरोग्याच्या समस्यांपेक्षा सौंदर्याबाबत मुलींना सर्वाधिक कन्सर्न असतो आणि तो असण्यात काही गैरही नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2023 09:05 AM2023-09-01T09:05:09+5:302023-09-02T15:53:59+5:30

PCOS and Mental health Correlation : आरोग्याच्या समस्यांपेक्षा सौंदर्याबाबत मुलींना सर्वाधिक कन्सर्न असतो आणि तो असण्यात काही गैरही नाही.

PCOS and Mental health Correlation : PCOS also causes mental illness, Psychiatrist says 2 important things, no reason for mental.. | PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण..

PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण..

PCOS म्हणजे शारीरिक त्रास, हार्मोन्समध्ये होणारे बदल, पाळीची अनियमितता या गोष्टी सामान्यपणे आपल्याला माहित असतात. पण अनेकदा मुलींना शारीरिक त्रासासोबत या समस्येमुळे मानसिक ताण जास्त प्रमाणात येतो. आता शारीरिक समस्या आहे तर मानसिक त्रास होण्याचे काय कारण असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. पण PCOS मुळे वाढलेले वजन, चेहऱ्यावर आलेले अनावश्यक केस, पिंपल्स यांमुळे तरुणींना नैराश्य येते. अनेकदा आपली पाळी अनियमित नाही याचाही मुलींना ताण येऊ शकतो. बरेचदा तर आरोग्याच्या समस्यांपेक्षा सौंदर्याबाबत मुलींना सर्वाधिक कन्सर्न असतो आणि तो असण्यात काही गैरही नाही. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी यांनी याविषयी काही प्रश्नांची उत्तरे दिली. पीसीओएस संघटनेने नुकतेच या विषयावर एका ऑनलाइन सेमिनारचे आयोजन केले होते. ज्यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौरा करंदीकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत, फिटनेसतज्ज्ञ यशश्री कलंत्री आणि आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले (PCOS and Mental health Correlation). 

तरुण वयातील मुलींना बरेचदा पिंप्लस, अॅक्ने आणि चेहऱ्यावर केस येण्याचा जास्त कन्सर्न असतो, त्याबद्दल काय सांगाल?

डॉ. तेजा कुलकर्णी, त्वचारोग तज्ज्ञ

त्वचेच्या समस्यांसाठी असंख्य ट्रिटमेंटस आहेत पण त्या घेत असतानाच लाईफस्टाईलमध्ये बदल करणेही तितकेच महत्त्वाचे असते. चेहऱ्यावर जाड जाड केस येणे, अंडर आर्म आणि गळ्यावर डार्क रंग येणे यांसारख्या समस्या सौंदर्याच्यादृष्टीने त्रासदायक असू शकतात. केस खूप जास्त प्रमाणात गळणे, टक्कल पडल्यासारखे दिसणे यांमुळे आत्मविश्वास कमी होतो, त्याचा मुलींच्या मानसिक आरोग्यावर परीणाम होतो. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्यास या सगळ्या समस्यांवर अतिशय उत्तम असे उपाय करता येऊ शकतात. 

पीसीओएसमुळे न्यूनगंड किंवा आत्मविश्वास कमी होऊ शकतो का? 

डॉ. ऋचा सुळे, मानसोपचार तज्ज्ञ

साधारणपणे पाळी येण्याच्या काळातच व्यक्ती म्हणून आपली इमेज तयार होत असते. याचवेळी हार्मोन्सच्या बदलांमुळे लठ्ठपणा वाढला, चेहऱ्यावर खूप केस आले तर या इमेजला धक्का लागतो. यामुळे तरुणी नैराश्यात जाण्याची किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुली वयात येत असताना वेळच्या वेळी त्यांना योग्य ती माहिती देणे, त्याचे उपाय, परीणाम सांगत राहणे जास्त महत्त्वाचे असते. पालकांनी विशेषत: आई, बहिण, मावशी, आजी यांनी हे लक्षात घ्यायला हवे. पालकांचा आणि फॅमिलीचाही यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. डायबिटीस ज्याप्रमाणे अनुवंशिक असतो तसाच पीसीओएस हाही अनुवंशिक असतो, त्यामुळे पीसीओएस आईकडून मुलीकेड येऊ शकतो. गेल्या काही वर्षात मानसिक आरोग्याबद्दलचा अवेअरनेस वाढला आहे. त्याचा चांगला परीणाम म्हणजे विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या तरुणी, महिला आता पुढे येऊन मोकळेपणाने बोलतात.  


 

Web Title: PCOS and Mental health Correlation : PCOS also causes mental illness, Psychiatrist says 2 important things, no reason for mental..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.