बदललेल्या जीवनशैलीमुळे जसे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह अशा आजारांचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच कॅन्सरचे प्रमाणही वाढले आहे. महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक आहे. पण आता नुकत्याच झालेल्या काही अहवालांमधून असे दिसून येत आहे की भारतीय महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याचे प्रमाणही खूप वाढते आहे. त्यामुळेच याविषयी जनजागृती होणे गरजेचे असून महिलांनी हा कॅन्सर का होतो, त्याची लक्षणं कोणती आहेत, याविषयीची माहिती आवर्जून घेतली पाहिजे आणि स्वत:च्या तब्येतीकडे वेळीच लक्षही दिले पाहिजे.
सर्व्हायकल कॅन्सर होण्यामागची महत्त्वाची कारणं
ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. तर सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण मध्यम वर्ग आणि गरीब महिलांमध्ये जास्त दिसते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत महिलांचे स्वत:च्या शरीराकडे होणारे दुर्लक्ष.
श्रावण शुक्रवारी गूळ फुटाण्यांचा नैवैद्य दाखवा आणि आठवणीने खा! महिलांसाठी ५ महत्वाचे फायदे..
याविषयी एम्स हॉस्पीटलच्या डॉ. सुमन भास्कर यांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या बाबतीत मेन्स्ट्रुअल हायजिन अतिशय गरजेचे असून त्यात जर हलगर्जीपणा होत असेल तर सर्व्हायकल कॅन्सरचा धोका वाढतो. व्हाईट किंवा कोणत्याही प्रकारचा व्हजायनल डिस्चार्ज जास्त प्रमाणात होणे, मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होणे, शारिरीक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे असा कोणताही त्रास होत असेल तर तो अजिबात अंगावर काढू नये, असा सल्ला डाॅक्टर देतात.
सर्व्हायकल कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी...
१. मासिक पाळीदरम्यान मेन्स्ट्रुअल कप किंवा पॅड दर ४ ते ६ तासांनी बदलावे.
चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील
२. मासिक पाळीच्या दरम्यान कपड्याचा वापर करणे शक्यतो टाळावे.
३. शारिरीक संबंधानंतर तसेच अगदी रोजच व्हजायनल भागाची नियमितपणे स्वच्छता करावी.