Join us

बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो का? लक्षणं काय नेमकी? तज्ज्ञ सांगतात..... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2023 15:57 IST

PCOD- PCOS While Breastfeeding: PCOD या आजाराबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. त्यामुळेच याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती विशेष उपयुक्त ठरते.

ठळक मुद्दे या आजाराबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. त्यामुळेच याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती विशेष उपयुक्त ठरते.

पीसीओडीचा त्रास (PCOD) असणाऱ्या तरुणींची, महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. बदललेली जीवनशैली, आहारात झालेला  बदल, व्यायामाचा अभाव, जागरणं यामुळे शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यातून या आजाराला निमंत्रण मिळते. या आजाराबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. पहिलं मुल झालं की हा त्रास कमी होतो का, किंवा मग बाळ अंगावर पीत  असतानाही (breastfeeding) पीसीओडीचा त्रास होतो का, असे काही प्रश्न हा त्रास असणाऱ्या मैत्रिणींना नेहमीच पडतात. म्हणूनच याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.

 

बाळ अंगावर पीत असतानाही पीसीओडीचा त्रास होतो का? PCOD चा त्रास हा बाळंतपणानंतर विशेषतः बाळ अंगावर पित असताना देखील संभवतो. यामागचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे PCOD मध्ये होणारं हॉर्मोन्सचं असंतुलन.

 

नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

किशोर अवस्थेत असल्यापासून काही जणींना PCOD चा त्रास असतो. त्यामुळे मग शरीरात इस्ट्रोजीन हार्मोनची कमतरता दिसून येते. स्तनांची वाढ नीट होत नाही. बाळंतपणानंतर estrogen dominance वाढतो. त्याचवेळी prolactin हे दूध बनण्यासाठी कारणीभूत असलेले हॉर्मोन कमी प्रमाणात तयार होते याशिवाय इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो.

 

या तीन प्रमुख कारणांमुळे मग बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो. पाळी लवकर न येणे, आल्यास नियामित नसणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दूध कमी प्रमाणात तयार होणे.

रोज करा फक्त ३ व्यायाम, पोट-कंबर आणि मांड्यांवरची चरबी होईल भराभर कमी- बेढब शरीर दिसेल सुडौल

ही त्याची काही प्रमुख लक्षणे आहेत . त्यावर उपचार म्हणून पौष्टिक आहार, व्यायाम व्यवस्थित असणे तर गरजेचेच आहे. पण गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोनल ट्रिटमेंट घेणेही आवश्यक ठरते. 

डॉ. ऋचा दाशरथी आचार्य  स्त्रीरोग तज्ज्ञ   

 

टॅग्स : पीसीओएसपीसीओडी