lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

Nagpanchami and Shravan Special: गव्हाची खीर कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण माहिती करून घ्या.. मग खीर चुकण्याचा- हुकण्याचा प्रश्नच नाही.(How to Make Gavhachi Kheer- 5 tips?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 03:15 PM2023-08-19T15:15:13+5:302023-08-19T15:16:39+5:30

Nagpanchami and Shravan Special: गव्हाची खीर कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण माहिती करून घ्या.. मग खीर चुकण्याचा- हुकण्याचा प्रश्नच नाही.(How to Make Gavhachi Kheer- 5 tips?)

Nagpanchami and Shravan Special, How to make gavhachi kheer? traditional recipe of wheat kheer | नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

Highlightsसाखरेचे किंवा गुळाचे आणि गव्हाचे प्रमाण चुकले तर कधी खीर खूप घट्ट होते, तर कधी अगदीच पातळ आणि बेचव होते.

पुरणाचे दिंड, गव्हाची खीर हे पारंपरिक पदार्थ नागपंचमीच्या दिवशी हमखास केले जातात. त्याच्या जोडीला प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे पदार्थ असतातच. पण या दोन्ही पदार्थांचे महत्त्व काही वेगळेच आहे. आता या दोन पदार्थांपैकी गव्हाची खीर कशी अचूक पद्धतीने करायची, ते आपण पाहूया (How to make gavhachi kheer?). बऱ्याचदा खीर करताना दुधाचे, साखरेचे किंवा गुळाचे आणि गव्हाचे प्रमाण चुकले तर कधी खीर खूप घट्ट होते, तर कधी अगदीच पातळ आणि बेचव होते. हे टाळण्यासाठी खीर करताना काही गाेष्टी लक्षात ठेवाव्यात..(traditional recipe of wheat kheer)

 

नागपंचमीसाठी गव्हाची खीर करण्याची रेसिपी
साहित्य

१ कप गहू

अर्धा चमचा वेलची पूड 

१- १ टेबलस्पून काजू आणि बदाम यांचे तुकडे

साधा दिवा घ्यायला मॉलमध्ये गेली आणि भलतंच करून आली! वाचा, तिच्या उंचीएवढे बिल आलेच कसे...

१० ते १५ मनुका

१ कप गूळ

३ ते ४ चमचे साजूक तूप

 

रेसिपी
१. खीर करण्यासाठी गहू रात्रभर पाण्यात भिजवावा. जर गहू कमी भिजला गेला तर खीर म्हणावी तशी आळून येत नाही. किंवा एकजीव होत नाही. त्यामुळे गहू चांगला भिजलेलाच असावा. 

२. यानंतर ३ कप पाणी घालून भिजवलेला गहू कुकरमध्ये शिजवावा. यावेळी गॅसची फ्लेम खूप मोठी किंवा मंद नको. मध्यम आचेवर साधारण ८ ते १० शिट्ट्या होईपर्यंत गहू शिजवावा. मध्यम आचेवर शिजवला तरच तो चांगला शिजेल.

श्रावणात उपवास करताय पण ५ गोष्टी लक्षात ठेवा, उपवास होतील सोपे- आणि वाढेल फिटनेस

३. शिजलेला गहू मिक्सरमध्ये थोडा जाडाभरडा वाटून घ्यावा. खूप पातळ पेस्ट करू नये. 

४. यानंतर कढईमध्ये ३ ते ४ टेबलस्पून तूप टाका आणि सुकामेवा परतून घ्या. नंतर गव्हाची भरड टाका आणि ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. गहू परतून घेतल्यानंतर त्यात पाणी घाला. गहू आणि पाणी एकजीव झालं की त्यात किसलेला गूळ घाला आणि ८ ते १० मिनिटे आणखी शिजवून घ्या. यावेळी गॅसची फ्लेम मध्यम असावी. खूप मोठी किंवा मंद नको. नाहीतर खीर जळून कढईच्या बुडाला लागू शकते. 

५. खीर शिजताना त्यातलं पाणी आटत जातं. त्यामुळे अंदाज पाहून थोडं थोडं पाणी घालावं. एकदम पाणी ओतलं तर खीर पातळ आणि पांचट होऊ शकते. 

 

 

Web Title: Nagpanchami and Shravan Special, How to make gavhachi kheer? traditional recipe of wheat kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.