Join us   

६५ टक्के महिलांमध्ये उद्भवतो जीवघेणा 'ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर'; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 3:25 PM

Breast cancer Tips Triple negative breast cancer : नॅशनल ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार आपल्या शरीरात बीआरसीए 1 आणि बीआरसीए 2 जीन्स असतात. जेव्हा या जीन्स कोणत्याही कारणास्तव शरीरात योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसतात तेव्हा असा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

ठळक मुद्दे जेव्हा या वाहिन्यांमध्ये लहान लहान गाठी तयार होत असतात त्यावेळी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये होणारा एक सामान्य आजार आहे.

ब्रेस्ट कॅन्सरबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरबाबत (Triple-Negative Breast Cancer) खूप कमी वेळा  बोललं जातं.  आज आम्ही तुम्हाला ट्रिपल निगेटिव ब्रेस्ट कॅन्सरबाबत पूर्ण माहिती देणार आहोत. स्तन हा महिलांच्या शरीरावरील खूप महत्वाचा अवयव असतो.  स्तनांमधील टिश्यूज दूध (Breast Milk) तयार करतातत. ब्रेस्ट टिश्यूच्या सुक्ष्म वाहिन्या निप्पल्सशी जोडल्या गेलेल्या असतात.

जेव्हा या वाहिन्यांमध्ये लहान लहान गाठी तयार होत असतात त्यावेळी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये होणारा एक सामान्य आजार आहे. स्तनांच्या कॅन्सर प्रकारांमध्ये ‘ट्रीपल निगेटिव्ह स्तन कॅन्सर’ हा अधिक आक्रमक स्वरुपाचा कॅन्सर आहे. ४० वर्षांखालील स्त्रियांमध्ये या कॅन्सरची शक्यता अधिक असते.

नॅशनल ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार आपल्या शरीरात बीआरसीए 1 आणि बीआरसीए 2 जीन्स असतात. जेव्हा या जीन्स कोणत्याही कारणास्तव शरीरात योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसतात तेव्हा अशा परिस्थितीत ट्रिपल-नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. बीआरसीए 1 उत्परिवर्तनांमुळे महिलांमध्ये 55 ते 65 टक्के स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

लक्षणं

स्तनाभोवती त्वचा कडक होणे.

स्तनाभोवती त्वचेच्या रंगात बदल.

स्तनांच्या रंगात बदल होणं.

स्तनांमधून द्रव पदार्थ बाहेर येणं.

स्तनाभोवती लाल त्वचा.

कारणं

अनुवांशिक कारणामुळे ट्रिपल निगेटिव्ह स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.

बीआरसीए 1 आणि बीआरसीए 2 जीन्स देखील कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात कारण ते योग्यरित्या कार्य करत नाहीत.

स्तनांच्या टिश्यूजचा एकाच ठिकाणी संचय होणं कॅन्सरचं कारण ठरू शकतं.

स्तनाशी संबंधित इतर अनेक आजारांमुळे देखिल हा आजार उद्भवू शकतो

शिळे पदार्थ, गरम मसाल्याचे पदार्थ यांचे अतिप्रमाणात व वारंवार सेवन, जेवणाच्या अनियमित वेळा

वयाच्या १२व्या वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरू होणे व उशिरा थांबणे.

धुम्रपान, मद्यपान अतिप्रमाणात करणं

ट्रिपल निगेटिव्ह स्तनांच्या कॅन्सरचे स्टेजेस

ट्रिपल-निगिटिव ब्रेस्ट कॅन्सर (Triple-Negative Breast Cancer) नं पीडित असलेल्या रुग्णांवर आजराची तीव्रता आणि स्टेज पाहून उपचार केले जातात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार ट्रिपल-निगेटिव ब्रेस्ट कॅन्सरच्या वेगवेगळ्या स्टेज असतात.  

स्टेज -1 (Stage-1)  : डॉक्टर मनीषा रंजन सांगतात की,  यात १०० टक्के रुग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यासाठी वेळेवर लक्षणांकडे लक्ष देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. तरच तब्येत लवकर बरी व्हायला मदत होऊ शकते. 

स्टेज - 2 (Stage-2) : या  स्टेजमध्ये ९३ टक्के रुग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो. 

स्टेज- 3 (Stage-3) : या स्टेजमध्ये  ७२ टक्के रुग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो.

स्टेज-4 (Stage-4) : ट्रिपल-निगेटिव ब्रेस्ट कॅन्सरची शेवटची स्टेज खूप जीवघेणी असते. या स्टेजमध्ये रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होतं.  

निदानासाठी  काय करायला हवं

मॅमोग्राफी (Mammography)

अल्ट्रासाउंड (Ultra-sound)

बॉयोप्सी टेस्ट (Biopsy test)

उपचार

या जीवघेण्या कॅन्सरचे सर्जरी, लेम्पेक्टॉमी (Lumpectomy) , मस्टेक्टॉमी (Mastectomy), रेडिएशन थेरेपी, कीमोथेरेपीनं उपचार केले जाऊ शकता. 

अशी घ्या काळजी

जर तुमच्या कुटुंबात कोणालाही कॅन्सर झाला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला वारंवार घेत राहत राहा, लठ्ठपणाला नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन वाढवणारे पदार्थ खाऊ नका, डॉक्टरांनी दिलेल्या  माहितीनुसार गर्भनिरोधक ओषधांचे सेवन करा, प्रेग्नेंसीपासून बचावासाठी गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा कंडोमचा वापर करा, दारूचे अतिप्रमाणात सेवन करू नका, धुम्रपान आणि गुटख्याचे सेवन करू नका, बाहेरचे पदार्थ, जंक फूडपासून लांब राहा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएटमध्ये बदल करा, अधिकधिक पाणी पिण्याचा प्रयत्न करा, शरीरात बदल किंवा कोणत्याही प्रकारची गाठ दिसल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोगस्तनाचा कर्करोगमहिला