lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर...

सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर...

Top 5 Sexual Hygiene Habits You Must Follow : सेक्शुअल हायजिन या विषयात आपल्या समाजात अनेक गैरसमज आणि अज्ञान दिसते, मात्र शरीरसंबंधांनंतरची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 05:03 PM2023-06-14T17:03:41+5:302023-06-14T17:38:57+5:30

Top 5 Sexual Hygiene Habits You Must Follow : सेक्शुअल हायजिन या विषयात आपल्या समाजात अनेक गैरसमज आणि अज्ञान दिसते, मात्र शरीरसंबंधांनंतरची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.

5 Things All Women Must Do After Sex For Good Sexual Hygiene | सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर...

सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर...

एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळी हा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच लैंगिक संबंध हा विषय देखील महत्वाचा आहे. एखाद्या स्त्री - पुरुषाने शारीरिक संबंध ठेवणं ही वैवाहिक जीवनातील महत्वाची आणि सामान्य बाब आहे. परंतु हा विषय अजूनही आपल्याकडे हळू आवाजात आणि चोरून बोलण्याचा विषय आहे. याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज किंवा संभ्रमही आहेत. आपल्याकडील लोकांना या विषयाबाबत चार चौघात बोलायचं नसत. आपल्याकडे अजूनपर्यंत शारीरिक संबंध ठेवणं जमत पण त्यावर खुलून चारचौघात बोलणं जमत नाही. त्यामुळे आपल्याकडील अनेक जोडप्यांना लैंगिक जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

लैंगिक संबंध ठेवणे ही प्रत्येक स्त्री - पुरुषाची शारीरिक गरज असते, परंतु संबंधानंतर स्वच्छता ठेवणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. संबंधानंतर लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे हे स्त्री - पुरुष दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. त्यामुळे या स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता त्या गोष्टीची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. सेक्स केल्यानंतर विशेषतः महिलांनी स्वच्छतेची काळजी घेणं खूपच गरजेचं असत. योग्यवेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर स्त्रियांना अनेक लैंगिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता करणे हे आपल्या शरीराच्या स्वच्छतेइतकेच महत्वाचे असते. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर स्त्रियांनी स्वच्छतेबाबतीत नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहूयात(5 Things All Women Must Do After Sex For Good Sexual Hygiene). 

  शारीरिक संबंधानंतर स्त्रियांनी स्वच्छतेबाबतीत नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे ? 

१. व्हजायना पाण्याने स्वच्छ करा :- शारीरिक संबंधानंतर आंघोळ करावीच असे काही नाही. ही काही वाईट गोष्ट नाही आणि यासाठी आपल्याला थोडी स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल. स्वच्छतेची पहिली पायरी म्हणजे आपले गुप्तांग पाण्याने धुवून स्वच्छ करावे. आपण पाणी तसेच सौम्य साबण देखील वापरू  शकता. योनीच्या आत काहीही स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही. स्वच्छता फक्त जननेंद्रियाच्या क्षेत्रामध्ये आवश्यक असते. त्यामुळे सेक्सनंतर किमान पाण्याने तरी स्त्रियांनी आपला व्हजायनाची जागा स्वच्छ करावी. 

मासिक पाळीत झोपच येत नाही? पोटदुखी-हेवी ब्लिडिंग? ८ सोप्या गोष्टी, झोपा शांत...

२. लघवीला जाणे :-  शारीरिक संबंधानंतर लघवीला जाणे हे खूपच गरजेचे असते. जर आपण शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी करत असाल तर तुम्हाला UTI होण्याच्या धोक्याचे प्रमाण कमी होईल. सेक्स केल्यानंतर जननेंद्रियामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते, आणि यामुळे UTI चा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

३. हायड्रेशनची काळजी घ्या :- शारीरिक संबंधानंतर आपल्या शरीराला हायड्रेशनची गरज असते. अशा परिस्थितीत, सेक्सनंतर स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. जर तुम्ही तुमच्या हायड्रेशनची काळजी घेतली नाही, तर तुम्ही हायड्रेटेड राहू शकणार नाही. सेक्स केल्यानंतरही   तुम्हाला हायड्रेशनची विशेष काळजी घ्यावी लागते. 

४. आपले हात - पाय चांगले धुवा :- शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आपले हात - पाय चांगले धुवा. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो. आपण  हातांनी जननेंद्रियाच्या स्वच्छतेचा विचार करत असाल तरीही, आपले हात साबणाने व्यवस्थित धुणे आवश्यक आहे. योनीमार्गाला कोणत्याही प्रकारे मॉइश्चरायझ करण्याचा प्रयत्न करू नका किंवा इतर कोणतीही रासायनिक उत्पादने वापरू नका.

५. व्हजायना कोरड होईपर्यंत पॅंटी घालू नका :- सेक्स केल्यानंतर आपण व्हजायना स्वच्छ करणे महत्वाचे आहे. व्हजायना पाण्याने स्वच्छ केल्यानंतर ती जागा व्यवस्थित कोरडी होईपर्यंत पॅंटी घालू नये. बहुतेक वेळा, योनीतून स्राव झाल्यामुळे, शारीरिक संबंध ठेवताना अंडरगार्मेट्स खूप खराब होतात. अशा परिस्थितीत आपण अंतर्वस्त्र बदलणे गरजचे असते. योग्य स्वच्छतेसाठी ओले कपडे, विशेषतः ओल्या पँटीज घालणे टाळा. स्वच्छ श्वास घेण्यायोग्य अंतर्वस्त्र  घाला. शारीरिक संबंध केल्यानंतर, सैल कपडे घाला आणि स्वत: ला आरामदायक ठेवण्याचा प्रयत्न करा.

उन्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

 

Web Title: 5 Things All Women Must Do After Sex For Good Sexual Hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.