रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकारासह अनेक गंभीर समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.(how to reduce high cholesterol) त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे. बदलेली जीवनशैली आणि आहारामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत अडथळे निर्माण होतात. (What are 5 foods that can lower cholesterol) ज्यामुळे उच्च कोलेस्टेरॉलचा धोका अधिक पटीने वाढतो. (Can Yogurt Lower Your Cholesterol) हा आपल्या शरीरात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे, ज्यामुळे हार्मोन्स बनवण्याचे कार्य करतो. कोलेस्टेरॉलमधील असंतुलनामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे गंभीर आजार होतात.
अनेकदा आपण शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच उपाय करतो. काहीवेळेस घरगुती उपचार प्रभावी ठरतात, त्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. आपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत. जे खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल वितळवेल. जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल
1. दही आणि सब्जा
दह्यात प्रोबायोटिक्स घटक आहेत. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ४ चमचा सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून दह्यात मिसळवून खाऊ शकता. ज्यामुळे कोलेस्टेरॉलची समस्या कमी होईल.
2. बदाम आणि दही
बदाम हे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. यात असणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि प्रथिने उत्तम स्त्रोत मानले जातात. ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. हे नियमितपणे खाल्ल्याने पचन सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.
3. ग्रीन टी आणि लिंबू
ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सि़डंट्स असतात जे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात करण्यास मदत करतात. लिंबूमध्ये फ्लेव्होनॉइड्स आहे. या दोघांना एकत्र खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच हा आरोग्यदायी पदार्थ आहे.
4. लसूण आणि कांदा
यामध्ये कोलेस्टेरॉल कमी करणारे गुणधर्म आहेत. लसणामध्ये अॅलिसिन असते. जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तर कांद्यामध्ये क्वेर्सेटिन असते. जे एलडीएल कोलेस्टेरॉलचे ऑक्सि़डेशन रोखते. हे रोज एकत्र खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहाते.
5. हळद आणि काळीमिरी
हळद हा स्वयंपाकघरातील सगळ्या रामबाण मसाला आहे. यात दाहक-विरोधी आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे घटक आहेत. काळीमिरीमध्ये हळदीतील सक्रिय पाइपरिन असतो जो कर्क्यूमिन शोषण्यास मदत करतो. याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, मनानं घेऊ नका.