Join us

खूप घाम येतो का?...कारणे जाणून घ्या आणि तुमचे कारण काय असू शकते त्याचा विचार करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2024 13:57 IST

Do you sweat a lot? Learn the reasons : अतिघाम येतो म्हणजे काहीतरी गडबड आहे. दुर्लक्ष करु नका.

शरीराच्या अनेक क्रियांपैकी एक क्रिया म्हणजे शरीराला नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणे. (Do you sweat a lot? Learn the reasons) मल-मुत्रा वाटे जसे शरीरातील घाण व न पचलेले अन्न बाहेर टाकले जाते,  त्याचप्रमाणे शरीर घामावाटे नको असलेले द्रव पदार्थ व रसायने बाहेर टाकते.(Do you sweat a lot? Learn the reasons) घाम येणं ही चांगली गोष्ट आहे. घामावाटे चिकट द्रव व प्रदुषणामुळे चेहऱ्याला झालेले नुकसान कमी होते. पण जर घाम प्रमाणाच्या बाहेर येत असेल तर ते चांगले लक्षण नाही. अतिघाम येण्याची प्रकृती बऱ्याच जणांची असते.(Do you sweat a lot? Learn the reasons) खास करून स्थूल लोकांमध्ये घामाचे प्रमाण जास्त असते. वातावरणात थंडावा असतानाही काहींना घाम येतो. पंख्याखाली, वातानुकूलितासमोर असतानाही घाम येतंच राहतो.  

स्टॅन्डफर्ड हेल्थकेअरच्या पेजवर अतिघामाची कारणे दिली आहेत. मुख्य म्हणजे वजन खुपच जास्त असल्याने घामाचे प्रमाण वाढते.(Do you sweat a lot? Learn the reasons) कारण त्यांच्या शरीरातील रसायनांचे प्रमाण जास्त असते. तसेच दम लवकर लागतो. आणि श्वाच्छोश्वास वाढल्याने घाम फुटतो. यावर उपाय म्हणजे योग्य व्यायाम करुन आणि योग्य आहार घेऊन वजन आटोक्यात आणणे.(Do you sweat a lot? Learn the reasons) मात्र काही जणांना बारीक असूनसुद्धा घाम जास्त येतो. अशा लोकांनी वैद्यकीय चाचण्या करुन घ्याव्यात. काही त्रास असेलंच असं नाही. काही जणांची प्रकृतीच अतिघाम येण्याची असते.(Do you sweat a lot? Learn the reasons) मात्र फार कमी लोकांमधे असे आढळून येते. अतिघाम येणं हे मधुमेहाचेही लक्षण आहे. वेळीच साखरेवर नियंत्रण ठेवल्याने भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो. हे लक्षण हृदयाचे विकार असण्याची शक्यता दर्शवते. हृदयावर अतिताण असल्यास घामाचे प्रमाण वाढते. अतिविचार करणाऱ्यांनासुद्धा असा त्रास होतो. थायरॉईड अतिकार्यक्षम झाल्यास घाम येतो. तसेच जर तुम्ही कोणतीही व्यसने करत असाल, तर घाम येतो. व्यसनांमुळे शरीराची उष्णता व पित्ताचे प्रमाण वाढते.

घाम न येणेसुद्धा शरीरप्रक्रिया सुरळीत चालत नसल्याचे लक्षण आहे.(Do you sweat a lot? Learn the reasons) घाम आला नाही तर त्वचेचे विकार होऊ शकतात.  तुम्हालाही अतिघाम येत असेल, तर वेळीच सावध व्हा आणि योग्य ते उपाय तज्ञ्यांच्या मदतीने सूरू करा. एखाद्याला अचानक अतिघाम कोणत्याही कारणाशिवाय यायला लागलास, त्याला त्त्वरित दवाखान्यात न्यावे.(Do you sweat a lot? Learn the reasons) कारण अतिघाम न येणाऱ्याला अचानक घम फुटणे हे हृदय विकाराचे लक्षण आहे. (Do you sweat a lot? Learn the reasons)  

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सहृदयरोग