Lokmat Sakhi >Health > सकाळी केलेली 'ही' एक चूक वाढवते बॅड कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याचाही असतो धोका!

सकाळी केलेली 'ही' एक चूक वाढवते बॅड कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याचाही असतो धोका!

Bad Cholesterol : काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने सकाळचा नाश्ता टाळतात. तसेच काही लोक सकाळच्या धावपळीमुळेही नाश्ता स्किप करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:35 IST2024-12-23T11:34:27+5:302024-12-23T11:35:14+5:30

Bad Cholesterol : काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने सकाळचा नाश्ता टाळतात. तसेच काही लोक सकाळच्या धावपळीमुळेही नाश्ता स्किप करतात.

Can skipping morning breakfast increase bad cholesterol in the body? | सकाळी केलेली 'ही' एक चूक वाढवते बॅड कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याचाही असतो धोका!

सकाळी केलेली 'ही' एक चूक वाढवते बॅड कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याचाही असतो धोका!

Mistake that increases the bad cholesterol level: सकाळचा नाश्ता हा दिवसभराच्या आहारात सगळ्यात महत्वाचा भाग असतो. कारण सकाळच्या नाश्त्या दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. तसेच शरीराला पोषणही मिळतं. तसेच ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासही सकाळी हेल्दी नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो. इतकंच नाही तर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनाही सकाळी नाश्ता करण्यास सांगितलं जातं. पण काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने सकाळचा नाश्ता टाळतात. तसेच काही लोक सकाळच्या धावपळीमुळेही नाश्ता स्किप करतात.

मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, सकाळी नाश्ता न करण्याची चूक केल्यास शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढू शकतं. सकाळी नाश्ता न केल्यानं तुमच्या बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण प्रभावित होऊ शकतं आणि बॅड कोलेस्टेरॉल आणखी वाढू शकतं. अशात हे जाणून घेऊया की, सकाळी उपाशी राहून किंवा तेलकट पदार्थ न खाऊनही तुमचं बॅड कोलेस्टेरॉल कसं वाढतं.

उपाशी राहिल्याने वाढतं बॅड कोलेस्टेरॉल?

एका नव्या रिपोर्टनुसार, सकाळचा नाश्ता न केल्यानं शरीरात लो डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणजे बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. यूएसच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, उपाशी राहिल्यानं धमण्यांमध्ये प्लाक जमा होऊ लागतं. ज्यामुळे हृदयाचं नुकसान होतं आणि स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळेच सकाळी नाश्ता टाळणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

सकाळचा नाश्ता न केल्यानं एथरोस्क्लेरोसिस नावाच्या कंडिशनचा धोकाही वाढतो. या स्थितीत हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह हळुवार होऊ शकतो. ज्यामुळे हृदयापर्यंत रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही. अशात स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तसेच नाश्त्याच्या वेळेला केवळ चहा पिणं, फ्रूट ज्यूस पिणं किंवा केवळ पाणी पिण्याच्या कारणानेही हृदयाचं नुकसान होऊ शकतं.

सकाळी नाश्ता न करण्याचे नुकसान

- नाश्ता न केल्यानं शरीराचं मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि याच कारणाने वजन कमी करण्यासही समस्या येते.

- नाश्ता टाळल्यास शरीरात पोषक तत्वही कमी होऊ शकतात.

- जास्त वेळ उपाशी राहिल्याने मायग्रेनची समस्या वाढू शकते.

- उपाशी राहिल्याने कार्डियोवस्कुलर हेल्थवर वाईट प्रभाव पडतो आणि हृदयरोगांचा धोका वाढू शकतो.

- जास्त वेळ उपाशी राहिल्याने लोकांची ब्लड शुगर लेव्हल वाढू किंवा कमी होऊ शकते. तर डायबिटीस नसलेल्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

Web Title: Can skipping morning breakfast increase bad cholesterol in the body?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.