Lokmat Sakhi >Health > कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? प्रमाण चुकले तर..

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? प्रमाण चुकले तर..

benefits of eating neem leaves daily : कडुलिंबाच्या पानाचे सातत्याने सेवन केल्यास होतात असंख्य फायदे, जाणून घ्या आणि सेवन करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 12:35 IST2024-12-28T12:29:43+5:302024-12-28T12:35:56+5:30

benefits of eating neem leaves daily : कडुलिंबाच्या पानाचे सातत्याने सेवन केल्यास होतात असंख्य फायदे, जाणून घ्या आणि सेवन करा.

benefits of eating neem leaves daily | कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? प्रमाण चुकले तर..

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे? प्रमाण चुकले तर..

बरेच आयुर्वेदिक उपाय आपण करत असतो.असं म्हणतात औषध जेवढं कडू तेवढंच गुणकारी असतं.(benefits of eating neem leaves daily ) बरेच घरगुती उपाय आपण करत असतो. विविध औषधे आपण वापरतो. मात्र नैसर्गिक उपचार सर्वांत जास्त फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे अशा उपायांचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत.(benefits of eating neem leaves daily ) कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो. मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहिती नसते. कडुलिंबाचा रस कडु असल्याने आपण तो पिण्यासाठी नाक मुरडतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? शरीरासाठी कडुलिंबाचा पाला फारच उपयोगी ठरतो. रोगराईसुद्धा पाल्यामुळे शरीरातुन नाक मुरडत निघून जाते.

शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने फार फायदेशीर ठरतात.(benefits of eating neem leaves daily ) कडुलिंबात अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात. यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते. त्याचप्रमाणे या पाल्याची रक्तशुद्धीकरणास मदत होते. सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील हा पाला शरीराला वाचवतो. कडुलिंबाची पाने कर्करोग होण्याचा धोका कमी करतात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचे सेवन करतात.(benefits of eating neem leaves daily ) दातांच्या, हिरड्यांच्या मजबुतीसाठी हा पाला उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या पाल्यात फॅटी अॅसिड असते.जे केसांच्या मजबुतीसाठी व वाढीसाठी उपयुक्त असते. यात अँटीऑक्सिडंट असतात.रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी ते उपयुक्त असतात. पाल्याचा रस केसांना लाऊन नाहणेसुद्धा फायदेशीर ठरते.

त्याचप्रमाणे पाल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्त्चचादेखील छान राहते. मुरूम, सुरकुत्या चेहऱ्यावरील डाग कमी होतात. (benefits of eating neem leaves daily )तज्ञ सांगतात, खास करुन रिकाम्या पोटी कडुलिंबाचा पाला सेवन करावा, आतड्यांसाठी ते जास्त फायदेशीर ठरते.रक्तातील साखर वाढणे हे शारीरिकदृष्या एक वाईट लक्षण आहे.ही साखर आटोक्यात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पाला गुणकारी ठरतो.(benefits of eating neem leaves daily ) या पाल्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पोट साफ होण्यास मदत करते आणि पोट फुगणे थांबवते.या पाल्याचा रस विविध प्रकारे सेवन करता येतो.हळद आणि पाला एकत्र खाल्यास आणखी फायदेशीर ठरते.  पाल्याची पेस्ट करुन, पाला पाण्यात उकळवून, त्याचा रस काढून, पाने भाजून, आदी. वेगवेगळ्या प्रकारे पाला सेवन करता येऊ शकतो. मात्र कडुलिंबाची ताजी पाने रिकाम्या पोटी चावून खाणे जास्त फायदेशीर ठरते.

Web Title: benefits of eating neem leaves daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.