Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत घशाचे, श्वसनाचे आजार इन्फेक्शन टाळा, आहारात हव्याच 'या' ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 19:54 IST

Diwali Air Pollution वाढत्या प्रदूषणात आहारात करा बदल, आणि स्वतःला बनवा आतून स्ट्राँग

दिवाळीत अनेक लोकं फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. मात्र, फटक्यांपासून होणारा प्रदूषण हा शरीरासाठी घातक ठरू शकतो. जेव्हा फटाके जाळण्याचा धूर थंडीच्या धुक्यात मिसळतो तेव्हा त्यातून एक प्राणघातक हवा तयार होते जी फार उंच जाऊ शकत नाही आणि ही हवा आपल्या फुफ्फुसाद्वारे आत जाते आणि इतर आजारांना निमंत्रित करते. अशा परिस्थितीत श्वास घेणे कठीण होत आहे. मास्क घालणे, एअर प्युरिफायर चांगले आहेत. परंतु, हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी. दरम्यान, तुम्ही स्वतःला आतूनही सुरक्षित केले पाहिजे. यासाठी या 5 गोष्टींचा आहारात समावेश करा आणि आतून सुरक्षित राहा.

ब्रोकोली

कोबीची नातेवाईक असलेली ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरलेली आहे. ही हिरवी भाजी यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. प्रदूषण असो वा नसो, त्याला आपल्या आहाराचा भाग बनवा. आणि आतून स्वतःला फिट बनवा.

लिंबू

लिंबू, संत्री आणि मोसंबी यांसारखी व्हिटॅमिन सी समृद्ध फळे तुमची फुफ्फुस स्वच्छ करतात. लिंबू आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरलेली आहे. म्हणूनच लिंबू आणि या फळाचा आहारात समावेश करा.

आले

आले तुमच्या घशासाठी उत्तम आहे. मध आणि आल्याचा रस घसा खवखवणे आणि कफ दूर करतो. आल्याचा समावेश तुमच्या आहारात करणे उत्तम ठरेल.

पालक

पालकामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. या ऋतूत प्रदूषणामुळे आजारी पडत असताना पालक खा आणि स्वत:ला निरोगी ठेवा.

गूळ

गूळ आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे. रात्री झोपण्यापूर्वी गुळाचा तुकडा आणि कोमट पाणी प्या. हे आपण शोषून घेतलेला सर्व धूर आणि प्रदूषण काढण्यात मदत करेल. याशिवाय दिवसभरात किमान 10 ग्लास पाणी प्या. पाणी तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकते.

टॅग्स :वायू प्रदूषणहेल्थ टिप्स