Lokmat Sakhi >Health >Anemia > दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

The effect of iron deficiency and anaemia on women's health महिलांना ॲनिमियाचा त्रास जास्त असतोच, पण वयात येणाऱ्या मुलींनाही हा त्रास झाला तर भविष्यात अनेक त्रास होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 04:55 PM2023-09-11T16:55:23+5:302023-09-11T16:58:15+5:30

The effect of iron deficiency and anaemia on women's health महिलांना ॲनिमियाचा त्रास जास्त असतोच, पण वयात येणाऱ्या मुलींनाही हा त्रास झाला तर भविष्यात अनेक त्रास होतात.

The effect of iron deficiency and anaemia on women's health | दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्ताचा विकार. महिलांमध्ये उद्भवणारी ही एक कॉमन समस्या आहे. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता भासते, त्यांना अ‍ॅनिमिया या आजाराचा त्रास होतो. अशा स्थितीत शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते. यासह लोह आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, 'महिलांमध्ये रक्ताची कमतरता भासल्यास अनेक गंभीर आजार उद्भवतात. मुख्य म्हणजे लहान वयातच आई बनणाऱ्या मुलींना अ‍ॅनिमियाचा त्रास होण्याची शक्यता वाढते'(The effect of iron deficiency and anaemia on women's health).

१० पैकी ६ टीनएज मुलींना होतो अ‍ॅनिमियाचा त्रास

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, अ‍ॅनिमिया ही एक सामान्य परंतु, गंभीर समस्या आहे. जी स्त्रियांमध्ये अधिक कॉमन आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकी १० टीनएज मुलींपैकी ६ मुली अ‍ॅनिमियाच्या समस्येने त्रस्त आहेत. अ‍ॅनिमिया होण्यामागचे मुख्य कारण मासिक पाळी असल्याचे सांगण्यात येते. मासिक पाळीमुळे मुलींना रक्तस्त्राव होतो. योग्य आहार न घेतल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासू लागते. ज्यामुळे इतरही समस्या निर्माण होतात.

दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

अभ्यासानुसार, १५ ते १९ या वयोगटातील मुली ज्या लहान वयातच आई बनल्या आहेत. त्यांच्या खाण्याच्या सवयी, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, योग्य माहितीचा अभाव, पोषक आहार न घेणे यासह इतर कारणांमुळे अ‍ॅनिमियाची समस्या निर्माण होते.

अ‍ॅनिमियाची लक्षणे कोणती?

- अ‍ॅनिमियाची समस्या झाल्यास शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. यासह चक्कर येणे, मळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास होतो.

- भूक न लागण्यासोबतच हातपायही थंड होऊ लागतात. वारंवार पायात क्रॅम्प येणे, लक्ष विचलीत होणे. सतत झोप येणे. अशा समस्या निर्माण होतात.

दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील?

- उठता-बसता चक्कर येणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, हृदयाची असामान्य धकधक, श्वास घेण्यास अडचण. यामुळे अनेक महिला त्रस्त आहेत.

अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी उपाय

- अ‍ॅनिमियाची समस्या टाळण्यासाठी महिलांनी आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. आहारात लोहयुक्त पदार्थांसोबत पालक, ब्रोकोली, मेथी इत्यादी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.

- डाळिंब, संत्री किंवा बीटरूट इत्यादींचा रस प्यावे. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. याशिवाय फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी१२ युक्त आहार घेऊ शकता.

- भरपूर पाणी प्या. शरीरात पाणी किंवा इतर द्रवपदार्थांची कमतरता भासू देऊ नका.

- डॉक्टरांचा सल्ला घेऊन चाचण्या करा. योग्य आहार, औषधे आणि पोषक आहार घ्या. 

Web Title: The effect of iron deficiency and anaemia on women's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.