Join us   

Blood Type : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका; ब्लड टाईपनुसार ओळखा तुम्हाला कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:48 AM

How Your Blood Type Can Affect Your Health : रक्ताचे साधारणपणे आठ प्रकार असतात. तुम्हाला तुमचा रक्तगट माहीत असायला हवा जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकेल.

अयोग्य जीवनशैली आणि आहारामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.  तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीत बदल करून रोगांचा धोका कमी करू शकता. याशिवाय शरीरातील गंभीर आजारांसाठी आणखी एक घटक आहे, तो म्हणजे तुमचा रक्तगट. (How Your Blood Type Can Affect Your Health) तज्ज्ञ आणि संशोधन मान्य करतात की एखाद्या व्यक्तीच्या रक्तगटावरून त्याला भविष्यात कोणत्या रोगाचा धोका असू शकतो हे ठरवता येते.  (6 diseases affect you health according to blood type)

रक्ताचे साधारणपणे आठ प्रकार असतात ज्यात A+, A-, B+, B-, O+, O-, AB+ किंवा AB- यांचा समावेश होतो. तुम्हाला तुमचा रक्तगट माहीत असायला हवा जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकेल. वास्तविक रक्तगट तुमच्या आरोग्याविषयी माहितीसुद्धा देऊ शकतो. (Relationship between blood groups and disease)

हृदयाचा आजार

आठ मुख्य रक्त प्रकारांपैकी, O प्रकार असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वात कमी असतो. AB आणि B प्रकार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. तज्ज्ञ AB आणि B रक्तगट असलेल्या लोकांना नेहमी हृदयासाठी निरोगी आहार आणि सवयी पाळण्याचा सल्ला देतात.

कॅन्सर

अभ्यासात असे आढळून आले आहे की रक्तगट A किंवा AB असलेल्या लोकांना कोलन कॅन्सरचा धोका जास्त असतो. तुमचा रक्तगट A, B किंवा AB असल्यास, तुम्हाला स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही या गटात येत असाल तर कॅन्सरशी लढा देणारे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात घेतले पाहिजेत.

तणाव

तुमचा रक्तगट A असल्यास, तुम्हाला तणावाचा सामना करताना अधिक त्रास होऊ शकतो. A प्रकार असलेल्या लोकांमध्ये कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम यासारख्या उपायांकडे लक्ष दिले पाहिजे.

लूक बिघडवणारे स्ट्रेच मार्क्स कायमचे होतील दूर; महागड्या क्रिम्स नाही, करा फक्त ५ घरगुती उपाय

स्मरणशक्ती कमी होणं

तुमची स्मरणशक्ती कमी असल्यास, तुमचा रक्तगट एबी असू शकतो. एका छोट्या अभ्यासात असे दिसून आले आहे की एबी रक्तगट असलेल्या लोकांमध्ये स्मृतीची समस्या अधिक सामान्य आहे.

केस खूप पांढरे झालेत? घरच्याघरीच बीटाची 'अशी' पेस्ट लावून मिळवा नॅच्युरल रेड हेअर्स

मलेरिया

O रक्ताचा प्रकार या आजारावर मात करण्यास मदत करू शकतो. जेव्हा संक्रमित डास तुम्हाला चावतो तेव्हा तुम्हाला मलेरिया होऊ शकतो. याला कारणीभूत असलेल्या परजीवीला O रक्त असलेल्या लोकांशी जोडणे कठीण आहे.

अल्सर

पेप्टिक अल्सरला पोटाचा अल्सर असेही म्हणतात. यामध्ये तुमच्या पोटाच्या किंवा आतड्याच्या वरच्या भागात फोड येतात, ज्यामुळे रुग्णाला खाणे-पिणे कठीण होते आणि वेदनाही होतात. ज्या लोकांचा रक्तगट O आहे त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकर्करोगअ‍ॅनिमिया