Join us   

Food for anemia : खूप थकल्यासारखं, अशक्त वाटतं? ॲनेमियाची कारणं काय, काय खाल्लं तर हिमोग्लोबिन वाढेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 4:39 PM

Food For Anemia : दिवसभर झोप येणं, कामात लक्ष न लागणं, सतत थकल्यासारखं वाटणं, अंगदुखी अशी लक्षणं अंगातील लोह कमी झाल्यानंतर जाणवतात. 

अ‍ॅनिमिया ( Anemia)  ही शरीरातील एक सामान्य समस्या आहे. ही समस्या महिला आणि मुलांमध्ये अधिक दिसून येते. रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला अ‍ॅनिमिया म्हणतात. रक्तात लोहाची कमतरता असल्यास हा आजार होतो. यामध्ये रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या सामान्यपेक्षा कमी असते, ज्याला हिमोग्लोबिन म्हणतात. (How to increase hemoglobin) बहूतेक महिला कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांच्या शरीरात रक्ताची  कमकरता भासते. दिवसभर झोप येणं, कामात लक्ष न लागणं, सतत थकल्यासारखं वाटणं, अंगदुखी अशी लक्षणं अंगातील लोह कमी झाल्यानंतर जाणवतात. 

नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया (NHP) नुसार, पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 13.8 ते 17.2 g/dL तर महिलांमध्ये 12.1 ते 15.1 g/dL असावे. अशक्तपणाची तीन मुख्य कारणे आहेत - रक्त कमी होणे, लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होणे आणि लाल रक्तपेशींचे जलद विघटन. (7 iron rich foods in your diet to beat anemia)

अशा स्थितीत अल्सर, कोलन पॉलीप्स किंवा कोलन कर्करोग, आनुवंशिक विकार, पुरेसे लोह नसणं, फॉलिक ऍसिड किंवा बी जीवनसत्त्वे नसलेले अन्न, सिकलसेल अ‍ॅनिमिया आणि थॅलेसेमियासारखे कोणतेही रक्त विकार होऊ शकतात. अशक्तपणामुळे तुम्हाला थकवा, थंडी, चक्कर येणे आणि चिडचिड होऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा डोकेदुखी होऊ शकते. (The best foods for anemia)

अ‍ॅनिमियाची लक्षणं (Symptoms Of Anemia)

NHP नुसार, अ‍ॅनिमियाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थकवा किंवा अशक्तपणा. याशिवाय, तुम्हाला श्वास घेण्यात अडचण, चक्कर येणे, डोकेदुखी, हातपायांमध्ये थंडी, फिकट त्वचा आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.

कारणं (Causes of Anemia)

अशक्तपणाची अनेक कारणे असू शकतात, जसे की काही कारणाने रक्त कमी होणे, लाल पेशींचे उत्पादन कमी होणे किंवा लाल रक्तपेशींचे नुकसान होणे. या व्यतिरिक्त, ज्या पदार्थांमध्ये लोह आढळते त्या पदार्थांचा समावेश न करणे हे एक प्रमुख कारण आहे.

रक्ताची कमतरता पूर्ण कशी करावी (How to recover iron deficiency)

लोहाच्या कमतरतेसाठी सर्वात सामान्यपणे निर्धारित डोस म्हणजे फेरस सल्फेट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसातून दोन किंवा तीन वेळा तोंडी घेतले जाते. याशिवाय, तुम्ही लोहाने समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. गडद हिरव्या पालेभाज्या, जसे की पालक, लोह-फोर्टिफाइड अन्नधान्य, ब्राऊन राईस, शेंगा, काजू, अंडी, पनीर, जर्दाळू

लोहाच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात ज्यामध्ये थकवा हे एक प्रमुख लक्षण आहे. लोहाच्या कमतरतेमुळे या व्यक्ती थकल्यासारखे आणि सुस्त दिसू शकते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ शकते. अशक्तपणा असलेल्या लोकांना हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार असू शकतात. अ‍ॅनिमियामुळे विशेषत: गर्भवती महिलांमध्ये जन्मादरम्यान आणि नंतर जोखिम वाढण्याचा धोका असतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य