lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Anemia > सतत थकवा आणि चिडचिड, तुमचे मूल आजारी तर नाही? लहान मुलांमधला ॲनिमिया धोकादायक कारण..

सतत थकवा आणि चिडचिड, तुमचे मूल आजारी तर नाही? लहान मुलांमधला ॲनिमिया धोकादायक कारण..

ॲनिमियाचे मुलांमधले प्रमाण मोठे आहे, लक्षणं ओळखून वेळीच उपचार करायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 05:34 PM2024-03-06T17:34:32+5:302024-03-06T17:36:32+5:30

ॲनिमियाचे मुलांमधले प्रमाण मोठे आहे, लक्षणं ओळखून वेळीच उपचार करायला हवे.

Anemia in children is dangerous, symptoms-causes and treatment and medicine | सतत थकवा आणि चिडचिड, तुमचे मूल आजारी तर नाही? लहान मुलांमधला ॲनिमिया धोकादायक कारण..

सतत थकवा आणि चिडचिड, तुमचे मूल आजारी तर नाही? लहान मुलांमधला ॲनिमिया धोकादायक कारण..

Highlightsजीवनसत्वांची रक्तनिर्मितीसाठी गरज असते. ब्रेड,बेकरी पदार्थ,पाॅलिश केलेले तांदुळ यामुळे शरीरातले लोह कमी होते.

डाॅ. संजय जानवळे (एम. डी. बालरोगतज्ज्ञ)


रक्ताच्या निर्मितीसाठी लोह, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी- १२, प्रथिने आणि व्हिटॅमिन ‘इ’ यांची गरज असते. या पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, याला रक्तक्षय किंवा ॲनिमिया असे संबोधले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने मार्गदर्शक तत्वानुसार जर ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण ११ ग्रॅमहून कमी असल्यास आणि ६ वर्षे ते १४ वर्षे वयोगटात ते १२ ग्रॅमहून कमी असल्यास तो ॲनिमिया असतो. जे मुलांचं तेच महिलांचं, आपल्याकडे महिलांमध्येही ॲनिमियाचे प्रमाण मोठे आहे.

ॲनिमिया होतो कारण..

१. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचे प्रमाण जगभर (१.५ अब्ज) प्रचंड आहे. जगभरातल्या एकतृतियांश लोकांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो.
२. भारतात ६ महिने ते ३५ महिने या वयोगटातील एकूण बालंकापैकी एकतृतियांश बालकांना रक्तक्षय आहे. 
३. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये पाच वर्षाखालील सुमारे ७० टक्के बालकांत ॲनिमिया आढळला.

(Image: google)

लक्षणं कोणती?

१. भूक लागत नाही. वजन वाढीचा वेग मंदावते. अन्नाव्यतिरिक्त माती, पेन्सिल, खडू, बर्फ इत्यादी खाण्याची इच्छा होणे, वारंवार तोंड येणे, चिडचिडेपणा, अशक्तपणा, हालचाली मंदावणे, छातीत धडधड होणे.
२. तळव्याच्या फिक्कटपणा हे चिन्ह रक्तक्षयाचे आहे. मुलाच्या तळव्याच्या रंगाची व स्वत:च्या किंवा इतर मुलांच्या तळव्यांशी तुलना करून पाहिल्यास तो फिकटपणा चटकन लक्षात येतो.
अतिशय फिक्कट तळवे हे 'गंभीर रक्तक्षयाचे' असते.
३. आईच्या दुधात लोह जरी कमी प्रमाणात असले, तरी यातले बरेचसे लोह शरीरात शोषले जाते. यामुळे स्तनपानातून बाळाची पहिल्या सहा महिन्यापर्यंतची लोहाची गरज भागत असते. अर्थात ॲनिमिया न होण्यासाठी बाळाच्या जन्मावेळीचा लोहाचा साठा (आईच्या शरीरातील लोहाच्या स्थितीवर अवलंबून असतो) योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. जन्माच्या वेळी बाळाचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असल्यास हा साठा कमी असतो, अशा बाळामध्ये ॲनिमिया टाळण्यासाठी दीड ते दोन महिन्यानंतर लोहाचे थेंब द्यावे लागतात.
४. हिमोग्लोबीन हा लाल रक्तपेंशीतला एक महत्वाचा घटक ! आपण जो प्राणवायू श्वासावाटे घेतो, तो या लालरक्तपेशी ग्रहण करतात आणि शरीराच्या विविध अवयवांकडे वाहून नेतात. जर रक्तातले हिमोग्लोबीन कमी असेल तर, प्राणवायु वाहून नेण्याचा आपली क्षमता कमी कमी होते. लोह व ‘ब’ जीवनसत्व आणि फाॅलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचे लहान मुलामध्ये प्रमाण प्रचंड आहे. ५. मूल लवकर दमते, त्याचे लक्ष लागत नाही, भूक कमी होते, लहान मूल निट दुध पीत नाही. गभींर रक्तक्षय असणाऱ्या मुलात पायावर सूज येते, धाप लागायला सुरुवात होते. रक्तक्षयाची शिकार बनलेली मुले नेहमी अजारी पडतात. गैरहजर असणाऱ्या मुलांचे शाळेत न जाण्याचे एक कारण म्हणजे ‘रक्तक्षय’, हे आहे.

निदान कसे?

१. रक्तक्षयाचे निदान करण्यासाठी हिमोग्लोबीनचे रक्तातील प्रमाण तपासण्यात येते. काचपट्टीवर पसरलेल्या रक्ताच्या थेंबाद्वारे रक्तक्षयाचे वर्गीकरण करता येते. रक्तक्षयाच्या कारणासाठी अनुषंगिक तपासण्या कराव्या लागतात.

उपचार कोणते?

१. उपचार करताना मुलाचे जन्मत: असणारे वजन, गर्भाशयातील काळ, त्याला होणारे वारंवार आजार, त्याला हवा असलेला वयानुसार आहार अन् तो प्रत्यक्षात सेवन करीत असलेला आहार, रक्तस्राव, वरचेवर अतिसार, जंत होणे, या बाबी महत्वाच्या आहे. कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयावर उपचार करताना लोह दिले जाते. गंभीर रक्तक्षयासाठी रक्त द्यावे लागते. जंताची लागण झालेली आढळल्यास तशी उपाययोजना करावी लागते.
२. ॲनिमिया न होण्यासाठी लोहयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करने अत्यंत गरजेचे आहे. रक्तक्षयावर उपचार करण्यापेक्षा हा विकार होऊनच नये म्हणून नियंत्रण करणे अधिक सोपे आहे. लोहयुक्त ओषध किंवा अन्नपदार्थ भरपुर प्रमाणात घेतल्यास दीर्घकाळ ॲनिमिया होत नाही. जवळ जवळ सर्व प्रकारच्या जीवनसत्वांची रक्तनिर्मितीसाठी गरज असते. ब्रेड,बेकरी पदार्थ,पाॅलिश केलेले तांदुळ यामुळे शरीरातले लोह कमी होते.

३. आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, खजूर, गुळ, अंडी, लिव्हर यांचा समावेश करावा. मांसाहरी पदार्थ, मनुका यात लोहाचे प्रमाण जास्त असते. लोखंडाच्या कडईत अन्न शिजवल्यास लोहाचे प्रमाण वाढते. जेवताना लिंबाचा वापर (व्हिटॅमिन सी ) केल्याने अन्नातील लोहाची उपलब्धता वाढते. गहू, गव्हाचे पदार्थ, हातसडीचा तांदुळ, कोबी, गाजर, टोमॅटो, सफरचंद, द्राक्ष, चेरी, मध, काकडी इ. मधून भरपुर प्रमाणात लोह मिळते.

Web Title: Anemia in children is dangerous, symptoms-causes and treatment and medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.