Join us   

Women's Health : विशीनंतर तरूणींमध्ये होतात हार्मोनल बदल; उत्तम फिगरसह चांगल्या तब्येतीसाठी 'असा' घ्या आहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:10 PM

Women's Health : वयाच्या 20 व्या वर्षात शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे काही समस्या देखील उद्भवतात. अशा परिस्थितीत जीवनातील अनेक मानसिक, शारीरिक आणि हार्मोनल बदलांचे योग्य संतुलन राखण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे तज्ञांचे म्हणणे आहे की 20 नंतर महिलांनी नियमितपणे दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण शरीरातील बदलांचा तुमच्या हाडांवर परिणाम होतो त्यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात. ब्राऊन राईस, क्विनोआ, ज्वारी, बाजरी अशा धान्यांचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे शरीरातील फायबर्सचं प्रमाण वाढतं.

जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीनं सजग असाल तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही ती सवय लागेल. कारण घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच जबाबदारी घरच्या महिलेवर असते. प्रत्येक घरातील तरूण मुलींमध्ये विशिष्ट वयोगटात बदल होत असतात. वेळीच खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर कमी वयातच अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सध्या तरूण मुलींमध्ये अॅनिमिया, कंबरदुखी, हाडांचे आजार, नैराश्य  यांसारख्या समस्या पाहायला मिळतात. 

वयाच्या 20 व्या वर्षात शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे काही समस्या देखील उद्भवतात. अशा परिस्थितीत जीवनातील अनेक मानसिक, शारीरिक आणि हार्मोनल बदलांचे योग्य संतुलन राखण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. 20 वर्षांनंतर स्त्रियांनी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आहारात दुधाचा समावेश महत्वाचा

तज्ञांचे म्हणणे आहे की 20 नंतर महिलांनी नियमितपणे दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण शरीरातील बदलांचा तुमच्या हाडांवर परिणाम होतो त्यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात. कॅल्शियम, प्रथिने, रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -2), व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक दुधात आढळतात जे हाडे मजबूत करतात.

संत्र्याचा रस

वयाच्या 20 व्या वर्षी हार्मोनल बदलांनंतर वैयक्तिक जीवनात काही चढ -उतार येतात जे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील करू शकतात. या वयात महिलांनी दिवसातून एकदा संत्र्याचा रस प्यावा. तुम्ही जेवणाच्या एक तास आधी किंवा दुपारच्या जेवणाच्या २ तासांनंतर घेऊ शकता. यामुळे महिलांना ऊर्जा मिळते आणि ते शरीरातील बदलांना सहजपणे सामोरे जाऊ शकतात. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी केस, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील निरोगी ठेवते.

टॉमॅटो

हार्मोनल बदलांच्या कालावधीत महिलांनी आहारात टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे पोषक घटक असतात. जे स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरपासून वाचवतात. टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स मृत पेशी आणि ब्लॅक हेड्स काढून टाकण्यास उपयुक्त ठरतात. स्त्रियांमध्ये वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी देखील हे ओळखले जाते. त्यात व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए आढळतात, ज्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात.

हिरव्या भाज्या

लोह समृध्द हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत आहे. जो आपल्या हाडांच्या बळकटीसाठी चांगला आहे. एवढेच नव्हे तर या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर असतात जे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

ड्रायफ्रुट्स

आपल्या एकूण आरोग्याच्या विकासासाठी सुकामेवा आवश्यक असल्याचे म्हटले जाते. आपण सुरुवातीपासूनच त्यांचे सेवन नाही केलं  तरी चालेल, पण 20 नंतर ते करा. जेणेकरून तुम्ही भविष्यातील आरोग्याच्या समस्यांना सहज तोंड देऊ शकाल आणि स्वतःला निरोगी ठेवू शकाल. याद्वारे आपल्याला प्रथिने, फायबर, लोह, ओमेगा -3, निरोगी चरबी इ. पोषक घटक मिळतात. 

महिलांनी बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुका, अंजीर यांचे सेवन करणे आवश्यक आहे. हे स्वादिष्ट अन्न आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि निरोगी चरबीचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. ते तुमच्या हाडांसाठी चांगले असतात आणि तुमची स्मरणशक्ती वाढवतात.

फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश

ब्राऊन राईस, क्विनोआ, ज्वारी, बाजरी अशा धान्यांचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे शरीरातील फायबर्सचं प्रमाण वाढतं. पचनासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोट फुगणं, गॅस होणं, अपचन अशा पोटाच्या विकारांना लांब ठेवण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य