वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल? - Marathi News | What and how to talk to teen age children about sex education to avoid the risk of sexual harassment? | Latest sakhi News at Lokmat.com
>आरोग्य >वयात येताना > वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल?

वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल?

शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलता संकोच वाटला तरी कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 02:51 PM2021-05-06T14:51:14+5:302021-05-06T14:57:44+5:30

शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलता संकोच वाटला तरी कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे

What and how to talk to teen age children about sex education to avoid the risk of sexual harassment? | वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल?

वयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं तर लैंगिक छळाचा धोका टळेल?

Next
Highlightsवयात येणाऱ्या मुलांशी काय आणि कसं बोललं, तर लैंगिक छळाचा धोका टळेल? शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलता संकोच वाटला तरी कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे. आपली वयात येणारी मुलं असली की पालकांना आता धाक वाटतो की,

आपली वयात येणारी मुलं असली की पालकांना आता धाक वाटतो की, या मुलांना लैंगिक शिक्षणाविषयी काय आणि कसं समजून सांगायचं? नेमकं काय आणि कसं बोलायचं.
शारीरिक सुरक्षा म्हणजे काय हे सांगायचं. अर्थात ते दुसरे तिसरे काही नसून स्वतःचा लैंगिक छळ किंवा छेडछाडीपासून बचाव करणं आहे. किंवा इतरांनी आपल्या शरीराला अयोग्य पद्धतीने हात लावणं कसं चूक आहे हे सांगणं.  लहान मुलांना त्यांच्या खासगी अवयवांचं महत्व शिकवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांना जर कुणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला किंवा त्यांच्या शरीराची हाताळणी हिंसक पद्धतीने केली तर ताबडतोब त्याबद्दल बोला हे सांगायला हवं.
मात्र हे सारं कळतं तरीही अनेकदा हे विषयी मोकळेपणाने पालकांना बोलता येत नाहीत. संकोच वाटतो. पण भविष्यतले धोके टाळायचे असतील तर मुलांशी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे.
सर्वसाधारणपणे संकोचाचे मुद्दे काय असतात? आणि उपाय कोणते?


१. माझं मूल अजून खूप लहान आहे.


प्रत्येकालाच आपलं मूल अजून लहान आहे असं सतत वाटत असतं. पण त्याचे गोड गोड बोबडे बोल बोलता बोलता बाळ कधी मोठं होतं आपल्याही लक्षात येत नाही. मुलांना अगदी लहान वयात स्वतःच्या शरीराची सुरक्षा शिकवणं आवश्यक आहे. ज्या प्रमाणे आपण मुलांना त्यांचे डोळे, कान किंवा इतर अवयव ओळखायला शिकवतो त्याचप्रमाणे खासगी अवयवांची ओळख आणि सुरक्षाही शिकवली पाहिजे. त्यांना बाकी अवयव आणि खासगी अवयव यातला फरक समजावून सांगितला पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या खासगी अवयव झाकण्यापासून त्यांच्याशी जर कुणी चुकीचं वर्तन केलं तर ते लगेच त्याविषयी तुम्हाला येऊन सांगू शकतील.


२. माझं मूल याविषयी मोकळेपणाने बोलतच नाही.


लहान आणि पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये लैंगिक छळाच्या केसेस वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे याविषयी जवळच्या व्यक्तीशी न बोलता येणं. घरी शाळेत बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी न मिळणं, किंवा तसं वातावरण न मिळणं. काहीवेळा मुलांना मोकळेपणाने सांगता येत नाही आणि पालकांनाही मुलांना नेमकं काय होतंय हे समजत नाही. अशावेळी गोष्टी अजूनच किचकट बनण्याची शकता असते. त्यामुळे तुमच्या मुलांशी मैत्रीच्या नात्यातून संवाद हा झालाच पाहिजे. आपण कुठल्याही विषयावर आईबाबांशी बोलू शकतो असा आत्मविश्वास मुलांना मिळाला पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना, शंकांना उत्तरं देताना प्रामाणिकपणे द्या. काहीही लपवून ठेऊ नका. त्यांना त्यांची सिक्रेट्स शेअर करायला सांगा. मुलांना विश्वास टाका, तो दिसू द्या, म्हणजे मूलही तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि मैत्रीचं नातं तयार होईल. तुम्ही मुलांचे शिक्षक, गुरु, मित्र आहात हे विसरू नका. त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या चुकांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्याशी बोला. त्यांना बोलतं करा. त्यांच्याशी मोकळेपणाने निरनिराळ्या विषयांवर चर्चा करा.

३. माझं मूल खूप बुजरं आहे, फार साधं आहे.


अजूनही शरीर ओळख, शरीर सुरक्षा, लैंगिक शिक्षण याबद्दल मुलांशी बोलणं कितीही नकोसं वाटलं तरीही कुठलीही कारणं न शोधता या विषयावर संवाद झालाच पाहिजे.
शारीरिक छळाचे मुद्दे काहीवेळा अगदी छोटे असतात. जसं की खूप जोरात मुलांना दुखेल असे गाल ओढणं, त्यांच्या लैंगिक अवयवांबद्दल बोलणं. मुलांशी या विषयावर बोललं गेलं तर ते स्वतःसाठी उभे राहू शकतील, विरोध करू शकतील. त्याचप्रमाणे या गोष्टी बोलल्यामुळे मुलांच्या वाढीच्या वयात जे प्रश्न तयार होतात त्यांचीही उत्तर त्यांना मिळतात आणि कुणालाही त्याच्या लिंगावरून, दिसण्यावरून कमी लेखू नये हा संस्कारही आपोआप मुलांवर होतो.

विशेष आभार: डॉ. पारुल टंक, मनोविकारतज्ज्ञ आणि थेरपिस्ट

Web Title: What and how to talk to teen age children about sex education to avoid the risk of sexual harassment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

जेवल्यानंतर कधी कधी उलटीसारखं होतं? मग 'या' ६ सोप्या उपायांनी समस्या होईल कायमची दूर - Marathi News | How to get relief from gas, indigestion : Home remedies to prevent vomit after meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर कधी कधी उलटीसारखं होतं? मग 'या' ६ सोप्या उपायांनी समस्या होईल कायमची दूर

How to get relief from gas, indigestion : काहीही खाल्लं ते चाऊन बारीक करून खावे. तसे न केल्यास पोटात गॅसची समस्या होऊ शकते. काही लोक अन्न चाऊन खाण्याऐवजी गिळतात आणि त्यामुळे त्यात लाळ मिश्रित होत नाही. यामुळे पचन होत नाही. ...

निना गुप्ताच्या लेकीनं शेअर केला हेल्दी लाईफस्टाईल फंडा; आवडत्या अभिनेत्रीबाबत केला खुलासा; म्हणाली..... - Marathi News | What i eat in a day masaba gupta offers a glimpse of her healthy lifestyle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :निना गुप्ताच्या लेकीनं शेअर केला हेल्दी लाईफस्टाईल फंडा; आवडत्या अभिनेत्रीबाबत केला खुलासा; म्हणाली.....

What i eat in a day masaba gupta : मसाबा तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ब्युटी टिप्स शेअर करत असते. ती एक फिटनेसबाबत उत्साही असणारी मुलगी आहे आणि तिला संतुलित आहारासह स्वतःला मेटेंन करायला आवडतं ...

भूक लागणं आणि सतत खा खा होणं यात फरक काय? - Marathi News | What is difference between hangar and cravings? Tips to beat sugar cravings | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भूक लागणं आणि सतत खा खा होणं यात फरक काय?

Tips to beat sugar cravings: सेलिब्रिटी डाइटिशियन रुजुता दिवेकर (Rujuta Diwekar) नं अलिकडेच शुगर क्रेविंग्स आणि भूक लागणं यातील फरक सांगितले आहे. ...

जेवणानंतर आंघोळ करता किंवा लगेच ढाराढूर झोपता? - आवरा...., अन्यथा गंभीर परिणाम होतील... - Marathi News | sleeping or taking bath after eating is harmful to health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणानंतर आंघोळ करता किंवा लगेच ढाराढूर झोपता? - आवरा...., अन्यथा गंभीर परिणाम होतील...

सकाळी फटाफट सगळी कामे आटोपून घ्यायची, नाष्टा करायचा आणि मग आंघोळ करायची अशी सवय अनेक महिलांना असते. तरूण मुलींचे रूटीनही काहीसे असेच असते. पण जेवणानंतर आंघोळ अशी उलट कृती करत असाल, तर सावधान !! ...

फिजिओथेरपीने पार्किन्सनचा त्रास कमी होतो का? काय उपाय केले तर आजाराचे टप्पे लांबतात.. - Marathi News | Does Physiotherapy Reduce Parkinson's Disorders? If the right measures are taken, the stages of the disease will be prolonged. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिजिओथेरपीने पार्किन्सनचा त्रास कमी होतो का? काय उपाय केले तर आजाराचे टप्पे लांबतात..

पार्किन्सन हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. मग यात फिजिओथेरपी कशी काय मदत करते हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आज या लेखातून हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. ...

चोवीसतास सगळे घरात, घरोघरी बायकांची हरवली प्रायव्हसी, या कलकलाटाचं कराल काय? - Marathi News | Women lost their privacy,personal space during corona,lockdown period | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चोवीसतास सगळे घरात, घरोघरी बायकांची हरवली प्रायव्हसी, या कलकलाटाचं कराल काय?

कोरोना आला आणि माझी स्वत:ची स्पेस, माझी प्रायव्हसी घेऊन गेला. आता सतत घरात कुणीतरी आहे. मुलांची शाळा, नवऱ्याचं ऑफिस, असं सगळंच माझ्या घरात ठाण मांडून बसलंय. अशा वातावरणात मी मला स्वत:ला वेळ कसा देऊ ? दिवसभर सुरू असलेल्या या कलकलाटाचं काय करू ? असा प ...