lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?

मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?

Teenager’s Bra Guide | What, How and When to Wear a Teenager’s Bra? : फर्स्ट ब्रा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी..

By भाग्यश्री कांबळे | Published: April 29, 2024 06:10 PM2024-04-29T18:10:49+5:302024-04-29T18:11:52+5:30

Teenager’s Bra Guide | What, How and When to Wear a Teenager’s Bra? : फर्स्ट ब्रा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी..

Teenager’s Bra Guide | What, How and When to Wear a Teenager’s Bra? | मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?

मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?

भाग्यश्री कांबळे

जेव्हा कोणतीही मुलगी तारुण्यात पदार्पण करते, तेव्हा तिची आई तिच्यावर बारकाईने लक्ष व काळजी घेत असते (Teenager Bra). तेव्हा आईच्या मनात आपल्या मुलीच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे मुलीला ब्रेसियरबद्दल माहिती देणे. ब्रेसियर हे एक स्त्रियांचे महत्वाचे वस्त्र आहे. हे वस्त्र स्त्रिया नेहमी परिधान करतात. ज्यामुळे स्तन आकारात येते. शिवाय स्त्रियांचे पोस्चर सुधारते.

बाजारात विविध प्रकारचे ब्रा मिळतात. पण मग असा प्रश्न समोर येतो की, ८ ते १० व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या मुलीने कोणती ब्रा घालावी? तिच्यासाठी कोणती ब्रेसियर योग्य? आईने मुलीला कोणत्या वर्षी ब्रेसियरबाबत माहिती द्यावी? या व अशा काही प्रश्नांची उत्तरं स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ शिल्पा चिटणीस जोशी यांनी लोकमत सखीशी बोलताना दिले आहे(Teenager’s Bra Guide | What, How and When to Wear a Teenager’s Bra?).

आईने मुलीसाठी पहिल्यांदा कोणत्या प्रकारची ब्रा खरेदी करावी?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा मुलीची वाढ होते, तेव्हा ब्रेस्टच्या टिश्यूमध्ये असलेली कॅपस्युल ब्रेक होते, आणि ब्रेस्ट ग्रोथला सुरुवात होते. अशावेळी छातीत थोडं फार दुखतं. जेव्हा दुखण्याची प्रोसेस कमी होते, तेव्हा ब्रेस्टचा आकार वाढतो. ब्रेस्ट ग्रोथ होताना दुखत असल्यामुळे आपण त्यांना क्रॉप टॉप ब्रा परिधान करायला देऊ शकता. त्याचं मटेरियल होजिअरी असल्यामुळे त्यात मुली कमफर्टेबल राहतात. आपण हा क्रॉप टॉप ब्रा मुलींना ८ व्या ते १० व्या वर्षी परिधान करायला देऊ शकता.

फर्स्ट ब्रा खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

मुलींसाठी फर्स्ट ब्रा खरेदी करण्यापूर्वी, कापड पाहा. सिंथेटिक नसून, कॉटन किंवा होजिअरी मटेरियलच्या ब्रा खरेदी करा. ब्रेसियरचे कापड नेहमी सॉफ्ट असावे. जोपर्यंत ब्रेस्टची वाढ योग्य होत नाही, तोवर त्यांना क्रॉप टॉप ब्रा परिधान करायला देणे उत्तम. शिवाय ब्रा च्या फिटिंगवरही लक्ष द्यायला हवे. स्तनाग्रचा आकार लहान असल्यामुळे, ट्रायल घेऊनच ब्रेसियर खरेदी करा. जर मुली हेल्दी असतील तर, ब्रेस्टला सपोर्ट देणाऱ्या ब्रेसियर खरेदी करा.

पहिल्यांदा ब्रा घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

झोपण्यापूर्वी ब्रेसियर काढून झोपावे. फक्त लहान मुलीच नाहीतर, महिलांनी देखील ही गोष्ट लक्षात ठेवावी. बाहेर जाताना नेहमी ब्रेसियर घाला. जर आपल्याला घरी ब्रा घालण्याचा कंटाळा आला असेल तर, आपण स्पोर्ट्स ब्रा घालू शकता.

फर्स्ट टाईम ब्रा घालणाऱ्या मुलींनी रात्रीच्या वेळी ब्रा घालू नये का? त्याचे फायदे-तोटे काय?

- सगळ्याच वयोगटातील महिला आणि मुलींनी रात्रीच्या वेळेस ब्रेसियर घालू नये. कारण ब्रेस्ट ब्रीदिंगला सोपं पडतं. शिवाय ब्रेस्टला सतत ब्रेसियरद्वारे आवळून धरल्यामुळे दुखू शकतं. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी ब्रा काढून झोपलेलं उत्तम.

- काही महिला दिवसभर घरात असल्याकरणाने ब्रेसियर घालत नाही. असं न करता आपण होजिअरी मटेरियलची ब्रा घालू शकता. कारण सतत ब्रा न घातल्याने हेवी ब्रेस्ट ओघळतात, त्यामुळे स्पोर्ट्स ब्रा घाला.

- शिवाय ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत, त्यांनी फीडिंग करण्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत फीडिंग ब्रा घालणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे ब्रेस्ट सॅगिंगची समस्या टळू शकते. 

Web Title: Teenager’s Bra Guide | What, How and When to Wear a Teenager’s Bra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.