Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूममध्ये कोणती झाडी लावल्यानं लगेच येईल झोप, मन होईल शांत? पाहा कोणती ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:17 IST

Plants to Keep in Bedroom: एक खास उपाय म्हणजे बेडरूममध्ये काही खास झाडे लावणे. ही झाडे मन शांत करून झोप लवकर आणण्यास मदत करतात. पाहूयात कोणती झाडे झोप सुधारण्यासाठी फायदेशीर मानली जातात.

Plants to Keep in Bedroom: तुम्हालाही रात्री नीट झोप येत नाही का? दिवसभराच्या थकव्याच्या नंतरही तुम्ही रात्री सहज झोपू शकत नाही? जर असं असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. झोप न येण्याच्या समस्येत तुम्ही बेडरूममध्ये काही छोटे-छोटे बदल करू शकता. जसे खोलीतील लाईट कमी करणे, शांत वातावरण तयार करणे, झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल पाहणे टाळणे. या व्यतिरिक्त आणखी एक खास उपाय म्हणजे बेडरूममध्ये काही खास झाडे लावणे. ही झाडे मन शांत करून झोप लवकर आणण्यास मदत करतात. पाहूयात कोणती झाडे झोप सुधारण्यासाठी फायदेशीर मानली जातात.

1. जॅस्मिन (चमेली)

जॅस्मिनची गोड आणि सौम्य सुगंधी हवा ताण कमी करण्यात मदत करते. त्याचा सुगंध रात्री मन शांत करतो, ज्यामुळे झोप लवकर येते. हे झाड तुम्ही खोलीच्या खिडकीजवळ ठेवू शकता.

2. लॅव्हेंडर

लॅव्हेंडरचा सुगंध शरीर रिलॅक्स करतो आणि मन शांत करतो. त्यामुळे हे झाड Bedroom मध्ये ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. हे झाड आकारानेही लहान असते, त्यामुळे तुम्ही ते बेडच्या बाजूच्या टेबलावर सहज ठेवू शकता.

3. कॅमोमाईल

या यादीतील पुढील झाड म्हणजे कॅमोमाईल. याच झाडापासून कॅमोमाईल टी बनवली जाते. Bedroom मध्ये याचे झाड ठेवले तर झोप नैसर्गिकरित्या सुधारते आणि मनाला गाढ आराम मिळतो.

4. रोजमेरी

या सर्वांपेक्षा वेगळा पर्याय म्हणजे रोजमेरी. याचा सुगंध मेंदूला शांत करून मनाला रिलॅक्स करतो. या झाडाला फारशी देखभालही लागत नाही, त्यामुळे Bedroom साठी हा एक उत्तम पर्याय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Plants for Bedroom: Sleep better and calm your mind with these.

Web Summary : Having trouble sleeping? Adding plants like jasmine, lavender, chamomile, and rosemary to your bedroom promotes relaxation and improves sleep quality naturally. These plants help calm the mind and reduce stress.
टॅग्स :बागकाम टिप्सहेल्थ टिप्स