Join us

घरात नेमके कोणते मनी प्लांट लावावे? पाहा ५ प्रकार, मनी प्लांट वाढेल भरपूर-घरात वातावरणही प्रसन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:44 IST

Types of Money Plant For Home : मनी प्लांट अनेकांच्या आवडत्या इन्डोर प्लांटपैकी एक आहे.

आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी अनेकजण मनी प्लांट लावतात. गॅलरी, हॉल, घराबाहेरचा पॅसेज तर कोणी किचनच्या खिडकीतही मनी प्लांट लावतं. मनी प्लांटचे अनेक प्रकार असतात. (Which type of money plant is good for home) पण नेमकं कोणतं मनी प्लाट घरात असावं याबाबत लोक कन्फ्यूज असतात. अनेकजण खोलीची शोभा वाढवण्यासाठी घरात हे रोप लावतात. (Gardening Tips)

मनी प्लांट अनेकांच्या आवडत्या इन्डोर प्लांटपैकी एक आहे.  मनी प्लांटची काळजी घेण्यासाठी वेळीच काही टिप्स फॉलो करायला हव्यात. ही झाडं फक्त  दिसायला सुंदर नसतात तर यामुळे  आनंदी वातवतावरण राहण्यासही मदत होते. (Lucky Money Plant)

मनी प्लांट कोणकोणत्या टाईपचे असतात

गोल्डन मनी प्लांट, सिल्वर मनी प्लांट, मंजूळा मनी प्लांट, नियॉन मनी प्लांट, मार्बल प्रिंस मनी प्लांट, क्वीन मनी प्लांट,

कोणता मनी प्लांट लकी मानला जातो?

1) जेड प्लांट गुड लक मनी प्लांट मानला जातो. या झाडाला क्रासुलाचे झाड असेही म्हणतात. याची पानं चमकदार असल्याने ते फारच सुंदर दिसते.  उन्हात  ठेवले तर  या पानाच्या कडांचा रंग लाल होत जातो. ऑफिसमधले लोकही हे रोप एकमेकांना  गिफ्ट करू शकतात. 

कोणत्या प्रकारचे मनी प्लांट जास्त लावले जातात?

1) गोल्डन मनी प्लांट चमकदार पानांमुळे सुंदर दिसते. हे झाड घराच्या प्रत्येक कोपऱ्याला सुंदर बनवते. हे रोप आकर्षक असते.

2) चीनी मनी प्लांट गोल, चपट्या आणि चमकदार पानांमुळे ओळखले जातात. या रोपाची काळजी घेणं एकदम सोपे असते. 

3) एनजॉय मनी प्लांटची पानं हिरवी आणि पांढरी असतात. यामुळे घराची शोभा वाढते आणि हवासुद्धा शुद्ध राहते.

टॅग्स :बागकाम टिप्ससुंदर गृहनियोजन