Join us

ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 19:30 IST

Tips & Tricks How To Grow Ginger In Water At Home Without Soil : how to grow ginger in water at home : grow ginger without soil easy method : tips to grow ginger in water bottle : घरच्याघरीच कुंडी आणि मातीशिवाय, फक्त पाण्यांत ताजं आलं कसे येईल ते पाहा...

काही पदार्थ असे असतात की जे नेहेमीच्या स्वयंपाकात किंवा काही खास पदार्थांमध्ये हमखास वापरले जातात. 'आलं' हा त्यापैकीच एक पदार्थ. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या आमटीपर्यंत वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. आलं हे स्वयंपाकघरातील नेहमी वापरले जाणारे औषधी गुणधर्मांनी युक्त असे मसाल्यांच्या (Tips & Tricks How To Grow Ginger In Water At Home Without Soil) पदार्थांपैकी एक आहे. अनेकदा आपण बाजारांतून (how to grow ginger in water at home) आलं एकदम एकाचवेळी विकत घेऊन येतो. परंतु अनेकदा हे विकत आणलेलं (grow ginger without soil easy method) आलं काही दिवसातच लगेच खराब होत किंवा सडू लागते. यासाठीच, आपण बाजारांतून प्रत्येकवेळी आलं विकत न आणता, घरच्याघरीच ग्लासभर पाण्यांत आल्याचे छोटेसे रोप लावू शकतो(tips to grow ginger in water bottle).

घरच्याघरीच आल्याचे रोप लावताना आपल्याला फारशी मेहेनत न घेता, अगदी फुकटात हवे तितक ताज आलं घरीच मिळू शकत.  तुमच्या घरातल्या आल्याच्या छोटाशा तुकड्यापासून तुम्ही पुन्हा नवीन आलं घरच्याघरीच लावू शकता. यासाठी तुम्हाला मातीची किंवा मोठ्या कुंडीची गरज लागणार नाही. तुम्ही एका छोट्याशा पाण्याच्या बाटलीत देखील घरच्याघरीच आलं सहज उगवू शकता. ही एक खूप सोपी आणि भन्नाट ट्रिक आहे. घरच्याघरीच कुंडी आणि मातीशिवाय, फक्त पाण्यांत ताजं आलं कसे उगवायचे ते पाहा... 

घरच्याघरीच आलं उगवण्याची साधीसोपी ट्रिक... 

१. पाण्यात आलं उगवण्यासाठी, सर्वप्रथम, ताज्या आणि एका मोठ्या जाड आल्याचा तुकडा घ्या, ज्यावर हिरवे कोंब दिसत असतील असे आलं तर उत्तमच.  जुने किंवा सुकलेले आल्याचे तुकडे वापरू नका, कारण त्यातून कोंब येण्याची शक्यता कमी असते. एक ते दीड इंच लांबीचा तुकडा पाण्यात उगवण्यासाठी सर्वात योग्य असतो.

२. रोप लावण्यासाठी निवडलेला आल्याचा तुकडा स्वच्छ धुवा, जेणेकरून त्यावरची माती किंवा रासायनिक पदार्थ निघून जातील. शक्य असल्यास, ते काही तासांसाठी हलक्या उन्हात किंवा हवेत सुकवून घ्या. ही प्रक्रिया आल्याला पाण्यात टाकल्यानंतर सडण्यापासून वाचवण्यास मदत करते.

निर्माल्यातील झेंडूची फुलं फेकू नका, त्यातूनच उगवतील नवी झेंडूची रोपं-‘असं’ करा झटपट बागकाम...

३. आता एक स्वच्छ काचेची किंवा प्लास्टिकची बाटली घ्या आणि त्यात पाणी भरा. आल्याचा तुकडा अशाप्रकारे ठेवा की त्याचा खालचा भाग पाण्यात बुडलेला राहील आणि वरचा भाग बाहेर राहील. लक्षात ठेवा की आले पूर्णपणे बुडलेले नसावे, अन्यथा ते सडून जाईल.

४. या प्रक्रियेदरम्यान, दर दोन दिवसांनी पाणी बदलणे आवश्यक आहे, जेणेकरून बुरशी आणि बॅक्टेरिया यांची पाण्यात वाढ होणार नाही. हवे असल्यास आपण या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकू शकता. यामुळे आले कुजून जात नाही किंवा खराब होत नाही अंकुरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

हिरव्यागार पानांचा घनदाट मनी प्लांट घरी हवा? पाहा पाणी घालण्याची योग्य पद्धत, मनी प्लांट वाढेल भरभर...

५. जार अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश कमी असेल, जसे की खिडकीच्या चौकटीत किंवा बाल्कनीमध्ये. जास्त उन्हामुळे आले सुकू शकते आणि जास्त ओलाव्यामुळे आलं सडू शकते. साधारणपणे ८ ते १० दिवसांत छोटे हिरवे कोंब दिसू लागतील. 

६. अशा प्रकारे, काही महिन्यांत आल्याची मूळ तयार होतील. त्यानंतर आपण गरजेनुसार आल्याच्या काही भाग कापून वापरु शकता आणि बाकीचा भाग जारमध्येच राहू द्या. हवे असल्यास, रोप मातीतही लावू शकता. अशा प्रकारे, तुम्ही कुंडीशिवाय घरच्याघरीच महागडं आलं लावू शकता. याचबरोबर ताज्या आल्याचा वापर करु शकता.

टॅग्स :बागकाम टिप्सकिचन टिप्सपाणीइनडोअर प्लाण्ट्स