आपल्यापैकी बऱ्याचजणांना गार्डनिंगची मोठी हौस असते. गार्डनिंग करताना आपण घरात, बाल्कनीत वेगवेगळ्या प्रकारची रोप, झाड लावतो. या रोपांची वेळीवेळी योग्य ती देखभाल करणे (Make Cocopeat at home from Coconut) त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. रोपांची वाढ चांगली होण्यासाठी आणि त्यांना पुरेशी आर्द्रता व योग्य पोषण मिळवून देण्यासाठी कोकोपीट हा उत्तम पर्याय आहे(How To Make Cocopeat At Home).
बरेचदा आपण रोपांसाठी कोकोपीट बाजारांतून विकत आणतो. परंतु बाजारातील विकतचे कोकोपीट विकत आणण्यापेक्षा घरच्याघरीच नारळाच्या शेंडीपासून तयार केलेलं कोकोपीट रोपांसाठी वापरणे कधीही उत्तमच. खरंतर, नैसर्गिक, स्वस्त आणि सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं हे कोकोपीट कुंडीतल्या रोपांना उत्तम (How to Prepare Cocopeat At Home) पोषक ठरु शकत. यासाठी, नारळाच्या शेंड्या फेकून देण्यापेक्षा आपण घरच्याघरीच कोकोपीट तयार करु शकतो. नारळाच्या शेंडीपासून घरच्याघरीच कोकोपीट कसे तयार करायचे ते पाहूयात.
कोकोपीट म्हणजे नेमकं काय ?
कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेलं सेंद्रिय माध्यम, जे बारीक कणांच्या रूपात असतं. हे हलकं, स्पंजसारखं असतं आणि पाणी धरून ठेण्याची क्षमता यात खूप (How to Make Coco Peats and its Benefits) चांगली असते. त्यामुळे बियाणे रुजवण्यासाठी किंवा मातीचा पोत सुधारण्यासाठी कोकोपीटचा वापर केला जातो. नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेला नैसर्गिक, मोकळा, पाणी धरून ठेवणारा पदार्थ, जो मातीच्या ऐवजी किंवा मातीत मिसळून रोपांच्या वाढीसाठी वापरला जातो.
मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...
घरच्याघरीच कोकोपीट कसे तयार करावे ते पाहा...
१. वाळलेल्या नारळांच्या शेंड्या गोळा करा. त्यात उरलेली आर्द्रता काढण्यासाठी या शेंड्या ३ ते ४ दिवस उन्हात व्यवस्थित वाळवून घ्या.
२. वाळलेल्या नारळांच्या शेंड्या १ ते २ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घेऊन त्याची पावडर तयार करून घ्यावी. त्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर एक स्वच्छ कोरड्या पिशवीत भरुन स्टोअर करून ठेवा.
ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...
पावसाळ्यात रोपांवर पांढरी बुरशी लागते? मातीत मिसळा स्वयंपाकघरातील ५ पदार्थ - रोप वाढेल भरभर...
३. वापरण्यापूर्वी कोकोपीट पावडर १० ते १५ दिवस पाण्यात भिजवून ठेवा, ज्यामुळे त्यातील मिठाचा अंश कमी होईल. भिजवल्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाका.
४. भिजवलेलं कोकोपीट पुन्हा उन्हात ३ ते ४ तास व्यस्थितपणे वाळवून घ्या. नारळाच्या शेंड्यापासून तयार केलेलं कोकोपीट वापरण्यासाठी तयार आहे.
अशाप्रकारे आपण सोप्या पद्धतीने अगदी स्वस्तात मस्त घरगुती नारळाच्या शेंड्यापासून तयार केलेलं कोकोपीट रोपांसाठी वापरु शकतो.