आपल्या स्वयंपाक घरात जसे आपल्या आरोग्याच्या आणि आपल्या सौंदर्याचे अनेक उपाय सापडतात, तसेच काही आपल्या झाडांच्या, रोपांच्या बाबतीतले कित्येक उपायही सहज सापडून जातात. रोपांची चांगली वाढ होण्यासाठी केळीच्या साली, कांद्याची टरफलं उपयुक्त ठरतात, हे आपल्याला माहितीच आहे. आता लिंबाच्या सालींचा रोपांसाठी कसा उपयोग करायचा आणि त्यामुळे रोपांना नेमका कोणता फायदा होतो ते आता पाहुया..(benefits of lemon peel for plants growth)
लिंबाच्या सालींचा रोपांसाठी कसा उपयोग करावा?
लिंबाच्या साली रोपांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणूनच त्यांचे हे काही उपयोग वाचा आणि त्यानंतर लिंबू पिळून त्याची सालं फेकून न देता रोपांसाठी जपून ठेवा.
पत्ताकोबी धुता पण त्यातले अळ्याकिडे तसेच तर राहात नाहीत ना? पाहा पत्ताकोबी धुण्याची योग्य पद्धत
लिंबू रोपांसाठी एखाद्या किटकनाशकाप्रमाणे काम करते. बऱ्याचदा आपण बघतो की रोपांवर बुरशीसारखा पांढरा पदार्थ दिसू लागतो. हळूहळू तो वाढत जातो. त्याच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर सगळे रोप जळून जाते. हा रोग आटाेक्यात आणण्यासाठी लिंबाची सालं अतिशय उपयुक्त ठरतात. हा उपाय करण्यासाठी लिंबाच्या सालींचे अगदी बारीक तुकडे करा किंवा मिक्सरमधून ती थोडी फिरवून घ्या.
यानंतर एका भांड्यात साधारण अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लिंबाच्या साली घाला आणि हे मिश्रण उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्या मिश्रणामध्ये १ चमचा हळद घाला.
हे पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा. रोपांवर जिथे जिथे रोग पडलेला दिसत आहे, तिथे तिथे हे पाणी शिंपडा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.
आता पाणी गाळून घेतल्यानंतर गाळणीमध्ये जी लिंबाची सालं उरलेली आहेत, ती सुद्धा टाकून देऊ नका.
कोलेस्टेरॉलचं टेन्शन? शरीरातलं चांगलं कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी ५ टिप्स, हृदयाचे आरोग्य राहील ठणठणीत
कारण मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच मातीमध्ये काही बुरशीजन्य पदार्थ असतील तर ते काढून टाकण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्यामुळे रोपांच्या कुंडीतल्या मातीत उरलेली लिंबाची सालं बारीक करून मिसळून टाका. हा उपाय नियमितपणे केला तर रोपांवर रोग पडत नाही. त्यांची चांगली वाढ होते.