आपल्या स्वयंपाक घरात रोजच्या रोज ओला कचरा जमा होत असतो. अगदी गाळून झालेल्या चहा पावडरपासून ते खरकट्या अन्नापर्यंत कित्येक पदार्थ त्यामध्ये असतात. हा ओला कचरा आपण जमा करतो आणि तो टाकून देतो. पण तो जर योग्य पद्धतीने वापरला तर त्यापासून रोपांसाठी खूप उत्कृष्ट दर्जाचं खत तयार होऊ शकतं. हे खत जर तुम्ही नियमितपणे कुंडीतल्या रोपांना दिलं तर तुम्हाला इतर कोणतंच विकतचं खत आणून रोपांना देण्याची गरज पडणार नाही (how to use kitchen waste for plants?). हे खत कसं तयार करायचं आणि त्यासाठी नेमके कोणते पदार्थ वापरायचे ते पाहूया.(how to make home made fertilizer for plants from kitchen waste?)
स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्यापासून रोपांसाठी खत कसं तयार करायचं?
१. आपल्या घरात रोजच चहा गाळल्यानंतर चहा पावडर जमा होते. ती २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती उन्हामध्ये वाळून पुर्णपणे कोरडी होऊ द्या आणि नंतर ती रोपांच्या मातीमध्ये मिसळून द्या. यामुळे रोपांना नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळतं. जे रोपांच्या वाढीसाठी आणि त्यांना फुलं येण्यासाठी उपयुक्त ठरतं.
संक्रांतीला नववधूसाठी हलव्याच्या मंगळसुत्राचे ७ सुंदर प्रकार, घरीही करता येतील असे सोपे डिझाईन्स..
२. कांद्याची टरफलं एका भांड्यात जमा करा आणि त्यामध्ये पाणी टाकून ती २ दिवस तशीच झाकून ठेवा. यानंतर ते पाणी गाळा. त्यात थोडं साधं पाणी मिसळा आणि नंतर ते रोपांना द्या. यामुळे रोपांना कॅल्शियम, लोह, पोटॅशियम मिळतं. त्यामुळे रोपं हिरवीगार तर राहतातच. पण मातीची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते.
३. केळीची सालं उन्हामध्ये वाळवून घ्या आणि त्यानंतर ती मिक्सरमध्ये फिरवून त्यांची पावडर करा. ही पावडर रोपांना दिल्यास रोपांना खूप फुलं येतात. किंवा केळीच्या सालींचे बारीक तुकडे करून ते कुंडीतल्या मातीत खाेचून ठेवणेही रोपांसाठी खूप लाभदायक ठरते.
४. बटाट्याची सालं, पिळून घेतल्यानंतर उरलेले लिंबू एका बादलीमध्ये ठेवा. त्यात पाणी घाला आणि ही बादली एखादा दिवस उन्हामध्ये ठेवा. यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यात थोडे साधे पाणी मिसळा आणि ते थोडे थोडे करून रोपांना द्या. रोपं कायम टवटवीत, हिरवीगार राहतील.
