आपल्यापैकी बरेचजण मोठ्या हौसेनं घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर कडीपत्त्याचं रोप मोठ्या हौसेनं लावतो. कडीपत्त्याच्या पानांमुळे केवळ जेवणाची चवच वाढत नाही, तर त्याचे अनेक आयुर्वेदिक फायदेही आहेत. कडीपत्त्याचं रोप स्वयंपाकासाठी जितकं उपयुक्त, तितकंच त्याची योग्य वाढ होणंही महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा कडीपत्त्याचं रोप नीट वाढत नाही, पाने पिवळी पडतात किंवा रोपाला हवी तशी दाट पानं येतच नाही अशा तक्रारी अनेकजण करतात. कडीपत्त्याच्या रोपाच्या या अनेक तक्ररींसाठी घरगुती उपाय करणं कधीही उत्तमच... रासायनिक खतांच्या वापरामुळे रोपाचं नुकसान होऊ शकतं, म्हणून नैसर्गिक पर्यायांचा वापर करणं कधीही उत्तम. या नैसर्गिक उपायांमध्ये, आपल्या फ्रिजमध्ये असलेल्या एका साध्या पदार्थाचा म्हणजेच ताकाचा वापर करणं फायदेशीर मानले जाते(how to use buttermilk for curry leaves plant growth).
ताक हे कडीपत्त्यासाठी एखाद्या टॉनिकसारखं काम करतं. कडीपत्त्याच्या रोपाला (how to make curry leaves plant bushy) केवळ पाण्याची नाही, तर योग्य पोषणाची गरज असते. स्वयंपाक घरातील 'आंबट ताक' हे या रोपासाठी अमृत ठरू शकतं. ताकाचा वापर केल्याने अवघ्या काही दिवसांत रोप पानांनी गच्च भरेल. ताकातील लॅक्टिक ॲसिड आणि पोषक तत्वं कडीपत्त्याच्या मुळांना नवसंजीवनी देतात. उन्हाळ्यात झाड वाळण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्याला हिरवंगार करण्यासाठी ताकाचा ( buttermilk fertilizer for curry leaf plant at home) उपयोग कसा करावा ते पाहूयात.
कडीपत्त्याच्या रोपासाठी ताकाचा वापर फायदेशीर...
कडीपत्त्याच्या झाडाला चांगली वाढ होण्यासाठी नायट्रोजन आणि कॅल्शिअमची मोठ्या प्रमाणावर गरज असते. ताकामध्ये हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात, जे रोपाच्या मुळांना पोषण देऊन त्याला मजबुती देतात.
शेवग्याच्या शेंगांचं भरीत करा आणि खा चमचमीत पौष्टिक पदार्थ, गावरान चवीचा ठसका - पाहा रेसिपी...
कडीपत्त्याच्या रोपासाठी ताक कसे वापरावे ?
कडीपत्त्याच्या रोपाला थेट ताक कधीही घालू नका. यासाठी नेहमी आंबट ताकाचा वापर करावा. एक कप आंबट ताक घ्या आणि त्यात साधारण ४ ते ५ कप पाणी मिसळा. हे मिश्रण पातळ ताकासारखे तयार होईल. मिश्रण अधिक फायदेशीर करण्यासाठी तुम्ही त्यात चिमूटभर हिंग किंवा तांब्याचे एखादे भांडे रात्रभर बुडवून ठेवू शकता. यामुळे रोपाला सूक्ष्म पोषक तत्वे मिळतात.
खत देण्याची योग्य पद्धत...
हे तयार केलेले ताकाचे पाणी आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा कडीपत्त्याच्या मुळाशी घालावे. ताक घालण्यापूर्वी झाडाची माती थोडी उकरून घ्यावी, जेणेकरून पोषक तत्वे थेट मुळांपर्यंत पोहोचतील. उन्हाळ्याच्या दिवसात ताकाचा वापर केल्याने मातीतील ओलावा टिकून राहण्यास आणि थंडावा मिळण्यास मदत होते.
एकदा माठ भरला की किती दिवस तुम्ही त्यातलं पाणी पिता? ‘एवढ्या’ तासांनी पाणी बदला कारण...
कीटकनाशक म्हणून ताकाचा वापर...
अनेकदा कडीपत्त्याच्या पानांवर पांढरे ठिपके पडतात किंवा बारीक किडे लागतात. अशा वेळी ताक एक उत्तम 'नॅचरल पेस्टीसाईड' म्हणून काम करते. एका स्प्रे बॉटलमध्ये ताक आणि पाण्याचे मिश्रण भरा. हे पाणी पानांवर दोन्ही बाजूंनी स्प्रे करा. ताकातील लॅक्टिक ॲसिड बुरशी आणि कीड नष्ट करण्यास मदत करते, ज्यामुळे पाने स्वच्छ आणि चमकदार होतात.
ताकाचे इतर फायदे...
ताकामुळे मातीचा पोत सुधारतो. कडीपत्त्याच्या रोपासाठी थोडी अम्लीय (Acidic) माती फायदेशीर ठरते आणि ताक मातीचा पीएच (pH) संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे झाडाची पाने पिवळी पडत नाहीत आणि रोपाला नवीन फुटवे फुटण्यास सुरुवात होते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. ताक आंबट किंवा खूप जुने नसावे.२. जास्त प्रमाणात ताक वापरल्यास माती चिकट होऊ शकते, त्यामुळे प्रमाण मर्यादित ठेवा.३. ताक वापरण्यापूर्वी माती कोरडी असेल तर हलकं पाणी द्यावं.४. रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणंही तितकंच गरजेचं आहे.
Web Summary : Buttermilk acts as a tonic for curry leaf plants, promoting lush growth. Dilute buttermilk with water and apply to the soil every 1-2 weeks. It provides essential nutrients like nitrogen and calcium, strengthens roots, acts as a natural pesticide, and balances soil pH.
Web Summary : छाछ करी पत्ता के पौधों के लिए एक टॉनिक के रूप में काम करता है, जो भरपूर विकास को बढ़ावा देता है। छाछ को पानी में पतला करें और हर 1-2 सप्ताह में मिट्टी में डालें। यह नाइट्रोजन और कैल्शियम जैसे आवश्यक पोषक तत्व प्रदान करता है, जड़ों को मजबूत करता है, एक प्राकृतिक कीटनाशक के रूप में कार्य करता है और मिट्टी के पीएच को संतुलित करता है।