Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या छोट्याशा रोपालासुद्धा लगडतील लालबुंद टोमॅटो! ३ उपाय- खा ताजे रसरशीत टाेमॅटो

कुंडीतल्या छोट्याशा रोपालासुद्धा लगडतील लालबुंद टोमॅटो! ३ उपाय- खा ताजे रसरशीत टाेमॅटो

How To Take Care Of Tomato Plant: कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या रोपाची पुढील पद्धतीने काळजी घ्या, जेणेकरून त्याला भरपूर टोमॅटो येतील.. (gardening tips for tomato plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 19:47 IST2025-05-03T15:51:01+5:302025-05-03T19:47:32+5:30

How To Take Care Of Tomato Plant: कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या रोपाची पुढील पद्धतीने काळजी घ्या, जेणेकरून त्याला भरपूर टोमॅटो येतील.. (gardening tips for tomato plant)

how to take care of tomato plant, gardening tips for tomato plant, tips and tricks for the fast growth of tomato plant | कुंडीतल्या छोट्याशा रोपालासुद्धा लगडतील लालबुंद टोमॅटो! ३ उपाय- खा ताजे रसरशीत टाेमॅटो

कुंडीतल्या छोट्याशा रोपालासुद्धा लगडतील लालबुंद टोमॅटो! ३ उपाय- खा ताजे रसरशीत टाेमॅटो

Highlightsटोमॅटोच्या रोपाला पुरेपूर प्रमाणात कॅल्शियम मिळावे यासाठी बाजारातून कोणतेही महागडे खत विकत आणण्याची गरज नाही.

सध्या किचन गार्डनिंगचा ट्रेण्ड खूप वाढला आहे. यामध्ये अनेक लोक त्यांच्या बाल्कनीमध्ये, गच्चीवर फळभाज्या, पालेभाज्या लावतात. त्यात टोमॅटो तर अगदी बहुतांश घरांमध्ये रोजच लागतो. वेगवेगळे पदार्थ करताना हमखास टोमॅटोचा वापर केलाच जातो. एखादी भाजी कमी असेल तर तिच्यामध्ये एखादा टोमॅटो घालून ती अगदी सहज वाढवताही येते. म्हणूनच अनेक जण कुंडीमध्ये टोमॅटोचं रोप लावतात (how to take care of tomato plant?). त्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे (gardening tips for tomato plant). त्यासाठी नेमकं काय करायचं, टोमॅटो भरपूर यावेत आणि शिवाय ते आकाराने मोठे तसेच रसरशीत व्हावे यासाठी काय करायचं ते पाहूया..(tips and tricks for the fast growth of tomato plant)

 

कुंडीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपाची कशी काळजी घ्यावी?

१. टोमॅटोचं रोप मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये लावावं. यासाठी तुमची कुंडी कमीतकमी १२ इंची तरी असायला हवी.

२. टोमॅटोचं रोप लावण्यासाठी जी माती तयार कराल त्यामध्ये १० टक्के कोकोपीट, २० टक्के कंपाेस्ट खत, २० टक्के वाळू आणि ५० टक्के माती असं प्रमाण ठेवा.

तेल- शाम्पू बदलून थकलात तरी केस गळणं थांबेना? करा 'हा' उपाय- महिनाभरात केस वाढतील

३. टोमॅटोचं रोप अशा ठिकाणी ठेवावं जिथून त्याला ३ ते ४ तास चांगले ऊन मिळेल.

४. टोमॅटो भरपूर प्रमाणात यावे यासाठी रोपाला पोटॅशियमची गरज असते. पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत म्हणजे केळीची सालं.

काश्मिरी केशराच्या किंमतीत प्रचंड वाढ! १ किलोसाठी मोजावे लागत आहेत तब्बल ५ लाख

त्यामुळे हा उपाय करण्यासाठी केळीची सालं पाण्यामध्ये भिजत घाला. ८ ते १० तास चांगले भिजल्यानंतर पाणी गाळून घ्या. आता या पाण्यामध्ये थोडे साधे पाणी टाकून रोपाला द्या. टोमॅटोचा आकार वाढण्यासाठी हा उपाय चांगला आहे.

 

५. टोमॅटोच्या रोपाला पुरेपूर प्रमाणात कॅल्शियम मिळावे यासाठी बाजारातून कोणतेही महागडे खत विकत आणण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त १- २ खडू घ्या.

इंस्टाग्रामच्या सीईओंना भलतीच आवडली श्रद्धा कपूरने खाऊ घातलेली पुरणपोळी, पहिला घास घेताच म्हणाले.....

त्यांचे दोन तुकडे करा आणि ते कुंडीतल्या मातीमध्ये ठिकठिकाणी खोचा. जसे तुम्ही रोपाला पाणी घालाल तसे तसे खडू विरघळून त्यातील कॅल्शियम मातीत मिसळेल आणि रोपाच्या चांगल्या वाढीसाठी त्याचा फायदा होईल. 

 

Web Title: how to take care of tomato plant, gardening tips for tomato plant, tips and tricks for the fast growth of tomato plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.